आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:अपात्र, अकुशल उमेदवारांसाठी अमेरिकेत वर्कव्हिसा केला रद्द; 76 टक्के कर्मचारी परदेशी, अमेरिकेत परदेशातील अस्थायी राहणारे, काम करणाऱ्यांवर नियम लागू

अमेरिकाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत परदेशी नागरिकांना आता अस्थायी स्वरूपात राहणे किंवा काम करण्यावर वर्षाखेरपर्यंत स्थगिती लावण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी यासंबंधीच्या आदेशावर स्वाक्षरीही केली. बुधवारी हा आदेश लागू झाला. त्यानुसार ट्रम्प प्रशासनाने वर्ष २०२० च्या अखेरपर्यंत एच-१ बी व्हिसासह सर्व प्रकारच्या परदेशी वर्क व्हिसांना स्थगिती दिली आहे. त्यामागे निवडणुकीच्या वर्षात अमेरिकेतील लोकांना रोजगाराच्या जास्त संधी देणे असा उद्देश आहे. परंतु अमेरिकन उमेदवारांत पुरेशी पात्रता नसतानाही परदेशींना रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात संगणक, आयटी, अभियांत्रिकी व आर्किटेक्चरशी संबंधित जास्त रोजगार आहेत. या क्षेत्रात ७६ टक्के कुशल कर्मचारी परदेशातील आहेत. परदेशींनी सवलत दिलेल्या क्षेत्रात बाहेरील लोकांचे प्रमाण ४ टक्के आहे.

यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेज व लेबर ब्यूरोच्या आकड्यानुसार २०१९-२० साठी जारी एच-१बी व्हिसामध्ये सर्वाधिक संगणक, आयटीशी संबंधित अर्ज होते. तेव्हा २.५० लाखाहून जास्त अर्जांना मंजुरी देण्यात आली. इतर कोणत्याही क्षेत्राच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. दीर्घकाळापासून ट्रम्प यांनी एच-१ बी व्हिसा कार्यक्रमावर जाहीरपणे टीका केली आहे.

बातम्या आणखी आहेत...