आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये वर्कशॉपला आग, 36 जणांचा मृत्यू:दोन जण गंभीर जखमी, दोघांचा शोध सुरूच; हेनान प्रांतातील एनयांग शहरातील घटना

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमधील एका वर्कशॉपला लागलेल्या आगीत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. AP या वृत्तसंस्थेने चीनमधील सरकारी वृत्तवाहिणीच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल चीनच्या हेनान प्रांतातील एनयांग या शहरात हा अपघात झाला आहे. या घटनेमागिल कारण अद्याप समजू शकलेले नाही.

कारखान्याला लागलेल्या आगीत 36 जणांचा मृत्यू

चीनमधील मध्य हेनान प्रांतातील एका कारखान्याला आग लागली आहे. यात काम करित असलेल्या 36 कामगारांचा मृत्यू झाला. एनयांग शहरात सोमवारी दुपारी ही घटना घडली आहे. चीन सरकारच्या माध्यमांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. या आगीच्या घटनेत आणखी दोन जण जखमी झालेले आहेत. तर दोन जणांचा अद्याप शोध लागलेला नाही.

सोमवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ही आग लागली होती. असे माध्यमांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तासनतास परिश्रम घेतले. 200 हून अधिक कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले होते. त्यांनी अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. माध्यमांकडून सांगण्यात आले की, एनयांग शहरातील हाय-टेक झोन वेनफेंग जिल्ह्यातील कैक्सिंडा ट्रेडिंग कंपनी लिमिटेडला ही आग लागली. या घटनेनंतर परिसरात काही तास गोंधळ उडाला होता.

अग्निशमन दलाच्या 63 गाड्या घटनास्थळी दाखल

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाने घटनेची माहिती मिळताच पथकाच्या घटनास्थळी 63 गाड्या पाठवल्या होत्या. दुपारी लागलेली आग रात्री सुमारे 8 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली गेली. रात्री 11 वाजेपर्यंत पूर्णपणे ते आटोक्यात आणली गेली. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला. दोघांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाखल झालेल्यांची प्रकृती सद्या चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...