आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • World Blood Danar Day Updates: Blood Donation Possible After Vaccination In USA. Side Effects In India, 14 Days Interval For Safety; News And Live Updates

विश्व रक्तदान दिवस आज:अमेरिकेत लसीकरणानंतर रक्तदान शक्य.. भारतात साइड इफेक्ट्स, सुरक्षेसाठी ठेवले 14 दिवसांचे अंतर

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना महामारीत रक्तदानाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे..

रक्तदान जीवनदान आहे. तुमच्या रक्तामुळे दुसऱ्याचा जीव वाचू शकतो. त्यामुळे रक्तदान गरजेचेच आहे. तज्ज्ञांच्या मते, १८ वर्षांवरील निरोगी तरुण दर तीन महिन्यांनंतर रक्तदानास सुरुवात करेल आणि वयाच्या साठीपर्यंत तो रक्तदान करत राहिला तर त्याने ३० गॅलन (सुमारे ११६ लिटर) रक्त दिलेले असेल. या रक्ताद्वारे तो ५०० लोकांचा जीव वाचवू शकतो. १४ जून रोजी ब्लड डोनर डे’ आहे. कोरोना महामारीत रक्तदानाची गरज असून या विषयाशी निगडित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या...

आपण महामारीच्या काळात रक्तदान करू शकतो का?
होय, या काळातही नेहमीप्रमाणे रक्तदान केले जाऊ शकते. किंबहुना या काळात लोकांना रक्ताची अधिक गरज असते. यामुळे तुमची कोरोना प्रतिकारशक्तीही कमी होत नाही.

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर रक्तदान करू शकतो का?
‘एनबीटीसी’च्या सूचनांनुसार लसीच्या प्रत्येक डोसनंतर १४ दिवसांनी रक्तदान करू शकता.

कोरोना झाला असेल तर केव्हा करू शकतो रक्तदान?
कोरोना संक्रमणामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागल्यास ३ महिने रक्तदान करता येणार नाही.

तापाची लक्षणे असल्यास रक्तदान करू शकतो का?
ताप नसेल तर किमान २४ तासांनी लक्षणमुक्त होताच रक्तदान करू शकता. ताप असेल तर किमान १४ दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

रक्तदात्याची कोरोना चाचणी हाेते?
नाही. आजवरच्या अभ्यासात तसे आढळले नाही.

भारतात एवढे अंतर का ठेवले गेले?
केंद्रीय आरोग्य महासंचालक प्रा. सुनीलकुमार यांच्या मते आपल्याकडे अमेरिकी पद्धतीचा अवलंब होऊ शकत नाही. लसीचे दुष्परिणाम आणि सुरक्षा मानकांमुळेच १४ दिवसांचे अंतर ठेवले गेले.

लसीकरणानंतर प्रत्येक देशात रक्तदानासाठी प्रतीक्षा करावी लागते?
नाही. अमेरिकेत लासीकरणानंतर लगेच रक्तदान करता येते. यासाठी एकच अट, ती म्हणजे लाइव्ह व्हायरस तंत्रज्ञानाने बनवलेली लस दिली नसेल तर. अमेरिकेत दिल्या जाणाऱ्या तिन्ही लसी (फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन) लाइव्ह व्हायरस लसी नाहीत.


बातम्या आणखी आहेत...