आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोपीय देशाची सद्य:स्थिती:इटलीत बाजारपेठ उघडू लागली, लोक कर्जमाफियांच्या जाळ्यात; सरकारी कर्जफेडीबाबत व्यापाऱ्यांत संभ्रमाची स्थिती

रोमएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
छायाचित्र इटलीच्या कोडोग्नो शहरातील फूड मार्केटचे आहे. येथे लोक फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून खरेदी करतात - Divya Marathi
छायाचित्र इटलीच्या कोडोग्नो शहरातील फूड मार्केटचे आहे. येथे लोक फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून खरेदी करतात
  • लॉकडाऊनमध्ये सर्वात आधी सवलत देणाऱ्या युरोपीय देशाची सद्य:स्थिती

लॉकडाऊनमध्ये सवलत देणारा इटली हा युरोपातील पहिला देश आहे. येथे रेस्तराँ, बेकरी, किराणा, दुकाने पुन्हा सुरू झाली आहेत. इतर दुकाने १८ मे व हेअर ड्रेसर शॉप १ जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. दुसरीकडे बहुतांश उद्योगांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी व्यवहार केवळ २५ टक्क्यांवर आला आहे. सरकारने गरजू व्यावसायिकांना २१ लाखांपर्यंतच्या मदतीची घोषणा केली आहे.

फ्लोरेन्स शहरातील एका रेस्तराँचे मालक मगदा वर्गरी म्हणाले, लॉकडाऊनपूर्वी ते दररोज ८० ते १०० पेस्ट्रीजची विक्री करत होते. लॉकडाऊनमध्ये व्यापार ठप्प झाला होता. लॉकडाऊनमध्ये सवलतीनंतरही सध्या दररोज केवळ २० पेस्ट्रीज विक्री करणे शक्य होत आहे. कॉफीची विक्रीही घटली असून ती २५ टक्क्यांवर आली आहे. अद्यापही सोशल डिस्टन्सिंगचे पालन अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी लोक गटाने रेस्तराँमध्ये येत. आता तसे नाही. इटलीत ८ आठवड्यांपर्यंत कडक लॉकडाऊन लागू होता.

त्यामुळे आता लोकांना घरी राहणे सवयीचे बनले आहे. त्यांना उद्यानात जायला आवडू लागले आहे. परंतु रेस्तराँमध्ये ते येत नाहीत. लोकांना योग्य कारण सांगून इतर शहरांत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. सवलतीनंतरही रस्त्यावरील वाहतूक नाममात्र वाढली आहे. गरजू व्यापाऱ्यांना २१ लाख रुपयांची मदत दिली जाईल. परंतु दुकानात गर्दीच राहिली नाही तर व्यवसाय करायचा तरी कसा, असा प्रश्न व्यापारी विचारत आहेत. त्यामुळेच कर्जफेड शक्य होणार नाही. इटलीमध्ये ४ मेपासून लॉकडाऊनमध्ये सवलत देण्यात आली होती. उलाढाल ठप्प झाल्याने बाजारात चिंता आहे.

संसर्गाची स्थिती : ४२ दिवसांपासून घट

इटलीत आतापर्यंत कोरोनाचे २ लाख १४ हजार ४५७ रुग्ण आढळून आले. २९ हजार ६८४ जणांचा त्यात मृत्यू झाला. येथे आतापर्यंत ९३ हजार २४५ लोक बरे झाले आहेत. देशात ४२ दिवसांपासून अशा रुग्णसंख्येत घट झाली आहे. २६ मार्चला येथे ५ हजार ६३९ रुग्ण आले होते. त्यात घट होऊन ६ मे रोजी १ हजार ४४४ रुग्ण झाले.

नवे संकट : गरिबांना करू लागले लक्ष्य

इटलीत लॉकडाऊन सुरू होताच कर्जमाफिया सक्रिय झाले होते. त्यामध्ये कोसा नोस्त्रा हा संघटित गुन्हेगारी गट होता. हा गट पहिल्यांदा गरिबांना कर्ज देतो. त्यानंतर त्यांच्याकडून बेकायदा कामे करून घेतली जातात. लॉकडाऊनदरम्यान अशा कर्जमाफियांकडे कर्जासाठी धाव घेत आहेत. ही संख्या दुपटीवर पोहोचली आहे.

बातम्या आणखी आहेत...