आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • World Corona Outbreak : Sudden Increase In Patients In 73 Countries, Panic Attacks Due To Cold; The World Is Preparing To Cross The 10 Million Death Mark

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसर्ग अनियंत्रित:73 देशांमध्ये अचानक रुग्णांत वाढ, थंडीमुळे घाबरगुंडी; जग 10 लाख मृत्यूंचा आकडा पार करण्याच्या तयारीत

वॉशिंग्टन8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनसारखे उपाय सरकारे टाळताहेत

जगातील ७३ देशांत कोरोनाचे नवे रुग्ण अचानक वाढत आहेत. द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात हा दावा करण्यात आला आहे. या देशांमध्ये अमेरिका, भारत व दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांचा समावेश आहे. वृत्तानुसार संसर्गाच्या पहिल्या लाटेच्या वेळी विविध देशांनी मोठे प्रतिबंध लादले होते. तेव्हा ४०० कोटींपेक्षा जास्त जणांनी घरातून निघणे बंद केले होते. आता बहुतांश देश अशा प्रकारचे उपाय टाळत आहेत. अर्थव्यवस्थेचे नुकसान होण्याची चिंता सतावत आहे. थंडी येणाऱ्या देशांबाबत तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. या वातावरणात फ्लू वाढेल असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे कोरोना जास्त वाढेल. अनेक देशांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत, मात्र तेथे कोरोना नियंत्रणात येत नाही. जगात कोरोनामुळे मृत्यूचा आकडा लवकरच १० लाख ओलांडण्याच्या तयारीत असताना ही स्थिती आहे. सध्या जगात कोरोनाचे ३ कोटी १२ लाख ७४ हजार ८६१ रुग्ण तर ९ लाख ६५ हजार ६३६ मृत्यू झाले आहेत.

युरोप : डब्ल्यूएचओ म्हणाली- आता विकली डेटा धडकी भरवतोय

डब्ल्यूएचओचे युरोपाचे संचालक हॅन्स क्लूज यांनी सांगितले, स्थिती खूप गंभीर आहे. युरोपीय देशांमध्ये मार्चमध्ये संसर्ग वरच्या पातळीवर होता. तेव्हा लाॅकडाऊन करुन कोरोना रोखता आला. सुट वाढताच रुग्ण वेगाने वाढू लागले. आता संसर्गाचे साप्ताहिक आकडे तेव्हापेक्षाही जास्त आहेत. हे भीतीदायक आहे.

द. अमेरिका : आरोग्य संघटना म्हणाली - गर्दीचे कार्यक्रम महागात पडले

पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशनच्या संचालक डॉ. कॅरिसा इटिने यांनी सांगितले, दक्षिण अमेरिकी देशांत जेव्हा जास्त सावध गरजेचे असताना तेव्हा गर्दीचे कार्यक्रम होत हाेते. हेच महाग पडले. या खंडात कोरोनाने ३ लाख १० हजार मृत्यू झाले आहेत. यातील सुमारे ७०% मृत्यू दोन देश ब्राझील व मेक्सिकोत झाले आहेत.

अमेरिका : ट्रम्प म्हणाले- आम्ही चांगले काम केले, अन्यथा ३० लाख मृत्यू असते

अमेरिकेत कोरोनाचे आतापर्यंत ७०,०५,६८६ रुग्ण आढळले आहेत. २,०४,१२२ मृत्यू झाले आहेत. चार महिन्यांत मृत्यू दुप्पट झाले. ही संख्या व्हिएतनाम व कोरिया युद्धात मारले गेलेल्या अमेरिकेच्या सैनिकांपेक्षा अडीच पट जास्त आहे. ती अॅक्रोन व ओहियो राज्यांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. तरीही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांना सांगितले की, त्यांच्या प्रशासनाने कोरोना नियंत्रणात चांगले काम केले. जर प्रशासनाने चांगले काम केले नसते तर देशात ३० लाख मृत्यू झाले असते.

बातम्या आणखी आहेत...