आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात कोरोना:दिवसभरात 6.23 लाख रुग्ण; निम्मे बाधित तर युरोपचे; जगभरात महामारीतील एकूण रुग्णसंख्या 5 कोटींहून जास्त

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटनसह युरोपच्या 10 हून जास्त देशांत घ्यावी लागतेय लष्कराची मदत
  • अमेरिकेत सलग तिसऱ्या दिवशी विक्रम मोडीत, 1.27 लाख रुग्ण आढळले

जगभरातील काेराेनाच्या नव्या रुग्णसंख्येचा विक्रम नाेंदला गेला. शुक्रवारी ६ लाख २३ हजार २६० नवे रुग्ण समाेर आले आहेत. एकाच दिवसातील ही आतापर्यंतची विक्रमी संख्या ठरली. या महामारीमुळे शुक्रवारी ९ हजार ८४ जणांना प्राण गमवावे लागले. एका दिवसात हे सर्वाधिक मृत्यूही ठरले आहेत.

काही दिवसांपूर्वी युराेपने काेराेनावर नियंत्रण मिळवले आहे, असे वाटत हाेते. परंतु, महामारीच्या दुसऱ्या लाटेने तेथील परिस्थिती आणखी स्फाेटक बनल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी जगभरात नवे रुग्ण व झालेल्या मृत्यूच्या संख्येत निम्मे युराेपातील असल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी युराेपात ३ लाख १७ हजार ३९१ रुग्ण समाेर आले तर ४ हजार ३७३ लाेकांना प्राण गमवावे लागले. सर्वाधिक ६० हजार ४८६ रुग्ण फ्रान्समध्ये आढळून आले. सर्वाधिक ८२८ मृत्यूही फ्रान्समध्येच झाले. इटली, पाेलंड, ब्रिटन, स्पेन, रशिया आणि जर्मनीत २० हजाराहून जास्त नवे रुग्ण आढळून आले. युराेपमध्ये फ्रान्सनंतर इटली दुसऱ्या स्थानी आहे. येथे ३७ हजार ८०९ रुग्ण आढळले तर ४४६ मृत्यू झाले. रोममध्ये संचारबंदी लागू झाली. युराेपात परिस्थिती आणखी वाईट आहे. ६ जुलै राेजी संपलेल्या आठवड्यात एकूण १.३२ लाख एवढे नवे रुग्ण युराेपात आढळले हाेते. २ नाेव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात युराेपात १७ लाखांहून जास्त नवे रुग्ण समाेर आले आहेत.

ब्रिटनसह युराेपच्या १० हून जास्त देशांत घ्यावी लागतेय लष्कराची मदत

युराेपात काेराेनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढत असल्याने लष्करी मदत घेण्यात आली आहे. ब्रिटन, स्लाेव्हाकिया, फ्रान्स, बेल्जियम, इटली, स्पेनसह १० हून जास्त देशांत सैन्याची मदत घ्यावी लागत आहे. तपासणीत वेग आणि तात्पुरत्या स्वरूपातील रुग्णालये कमीत कमी वेळेत साकारण्याच्या क्षमतेमुळे सैनिकांची मदत घेतली जात आहे. ब्रिटनने लिव्हरपूलच्या संपूर्ण लाेकसंख्येची तपासणी आगामी दहा दिवसांत पूर्ण करण्याची याेजना तयार केली आहे. त्यावरून समस्या गंभीर असल्याचे दिसून येते.

अमेरिकेत सलग तिसऱ्या दिवशी विक्रम माेडीत, १.२७ लाख रुग्ण आढळले

युराेपप्रमाणेच उत्तर अमेरिकेत देखील नव्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ हाेत आहे. राष्ट्राध्यक्ष निवडणूक निकालाच्या गदाराेळात अमेरिकेत शुक्रवारी १ लाख २७ हजार नवे रुग्ण समाेर आले. १ हजार १४९ लाेकांना महामारीने प्राण गमावावे लागले. व्हाइट हाऊसचे चीफ आॅफ स्टाफ मार्क मिडाेज देखील काेराेना पाॅझिटिव्ह आढळले. आतापर्यंत काेराेनाचा सर्वाधिक कहर अमेरिकेला साेसावा लागला आहे. तेथे आतापर्यंत ९७ लाखांहून जास्त लाेक पाॅझिटिव्ह असून एकूण २.३ लाखांहून जास्त लाेकांचा महामारीच्या काळात मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...