आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • World Corona Outbreak Updates: 9 Countries Including Canada And The UAE Have Banned Indian Flights; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डबल म्युटंट व्हेरिएंटने जग धास्तावले:कॅनडा, यूएईसह नऊ देशांची भारतीय उड्डाणांवर बंदी

टोरंटो13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेची भारतासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी

कॅनडाने भारत व पाकिस्तानात कोविड-१९ ची वाढती लक्षणे लक्षात घेऊन या देशांंतील प्रवासावर ३० दिवसांसाठी बंदी आणली आहे. गुरुवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. ब्रिटनमध्ये भारतीय व्यक्तीच्या प्रवेशासाठी रेड लिस्ट नियम लागू केला जाईल. गुरुवारी ब्रिटनमध्ये इंडियन व्हेरिएंटचे ५५ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे भारतातून ब्रिटनमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे. दिल्लीहून मायदेशी जाणारे किंवा ब्रिटन किंवा आयर्लंडचे नागरिक १० दिवस हाॅटेलमध्ये क्वाॅरंटाइन राहतील.

दुबई, सिंगापूर, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आेमान, हाँगकाँग, फ्रान्सनेही भारताच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. अमेरिका, इस्रायलने भारतातून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सिंगापूरमध्ये १४ दिवस क्वाॅरंटाइन झाल्यानंतर सात दिवसांपर्यंत घरात अनिवार्य रूपाने राहावे लागेल.

दुबई : भारतातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशास दुबईत प्रवेश नाही. मनाई २५ एप्रिलपासून १० दिवसापर्यंत असेल. १४ दिवस इतर देशांत काढणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दुबईत प्रवेशाची परवानगी असेल.

सिंगापूर : भारतातून जाणाऱ्या लाेकांना पहिल्यांदा १४ दिवसांसाठी विशेष व्यवस्थेत व नंतर ७ दिवस घरात विलगीकरणात राहावे लागेल.

न्यूझीलंड : विमान प्रवास राेखणारा पहिला देश. न्यूझीलंडचे प्रवासीही ११ ते २८ एप्रिलदरम्यान परत येऊ शकत नाहीत.

हाँगकाँग : भारतातून येणारी-जाणारी विमान उड्डाणे ३ मेपर्यंत रद्द केली. या महिन्याच्या दाेन उड्डाणांदरम्यान ५० बाधित आढळले हाेते.

बातम्या आणखी आहेत...