आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना महामारी:ब्रिटनमध्ये 97 दिवसांनी अनलॉक; जगातील सर्वात मोठा व कडक लॉकडाऊन हळूहळू मागे

लंडन9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात बहुतांश राज्यांत रात्रीची संचारबंदी, शाळा-कॉलेज बंद; ब्रिटनमध्ये दररोजचे नवे रुग्ण 4 हजारांहून कमी
  • शाळा-कॉलेज बंद, आर्थिक व्यवहार चालू, इतर राज्यांतील वाहतूक सुरू ठेवणार

ब्रिटन ९७ दिवसांनंतर पूर्ववत होत आहे. जगातील सर्वात लांब व कडक लॉकडाऊन सोमवारपासून अनलॉक होण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना अनियंत्रित झाल्याने ५ जानेवारीपासून ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू होता. डिसेंबरपासून ब्रिटनमध्ये अनेक प्रकारचे निर्बंध लागू होते. आता पुन्हा अनेक महिन्यांनंतर शेकडो जिम, हेअर सलून, रिटेल दुकाने सुरू झाली. नियोजित योजनेनुसार २१ जूनला पूर्णपणे लॉकडाऊन हटवला जाईल.

४ जानेवारी रोजी जॉन्सन यांनी नवीन निर्बंधांची घोषणा केली होती. तेव्हा प्रत्येक गोष्ट स्पष्ट होती. कोणते क्षेत्र कधी बंद असेल व कोणते सुरू होईल, हे जाहीर होते. त्यामुळे लोकांमध्ये गोंधळाची स्थिती नव्हती. एकीकडे लॉकडाऊन आणि दुसऱ्या बाजूने लसीकरण करून ब्रिटनने कोरोनाचा वेग नियंत्रित केला. युरोपला मंदगतीने लसीकरण व लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची वेळ आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये दररोज ५५ हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळत होते. आता नव्या रुग्णांची संख्या ४ हजारांहून खाली आहे. ब्रिटनने आपल्या ४८ टक्के लोकसंख्येला लस दिली आहे.

भारतात बहुतांश राज्यांत रात्रीची संचारबंदी, शाळा-कॉलेज बंद

पंजाब : राज्यात संचारबंदी - राजकीय, धार्मिक आयोजन बंद, शाळा-कॉलेज बंद

हिमाचल : शाळा-कॉलेज १५ एप्रिलपर्यंत बंद. कार्यक्रमांत ५० लोकांची परवानगी.

मध्य प्रदेश: भोपाळ, छिंदवाडा, कटनी, बैतूल, खरगोनसह अनेक शहरांत १९ एप्रिलपर्यंत संचारबंदी.

कर्नाटक: बंगळुरूसह ७ शहरांत रात्री १० ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी.

तेलंगण: शाळा-कॉलेज पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.

छत्तीसगड: रायपूरमध्ये १७ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन. शहरी भागात संचारबंद. ५० टक्के सवारीची परवानगी.

चंदीगड: रात्री १० ते सकाळी पाचपर्यंत संचारबंदी. १० पर्यंत शाळा बंद

जम्म्ू-काश्मीर: १८ एप्रिलपर्यंत शाळा बंद. इनडोअर क्रीडा आयोजने बंद.

ओडिशा: १२ पर्यंत सर्व शाळा पुढील आदेशापर्यंत बंद, असे स्पष्ट केले.

तामिळनाडू : धार्मिक आयोजनांवर बंदी. क्लबमध्ये ५० टक्के लोकांना परवानगी.

केरळ: परदेशातून आल्यावर सात दिवसांचे क्वाॅरंटाइन. विशेष जजची नियुक्ती

गोवा: लोकांच्या फिरण्यावर बंदी नाही. शाळा बंद. १४४ लागू.

उत्तर प्रदेश: लखनऊसह अनेक जिल्ह्यांत रात्रीची संचारबंदी १७ पर्यंत.

महाराष्ट्र: एप्रिलपर्यंत सर्व बीच बंद. आठवडाअखेरीस लॉकडाऊन, संचारबंदी

झारखंड : रांचीमध्ये धार्मिक आयोजनाची परवानगी नाही. प्राथमिक शाळा बंद.

गुजरात : २० शहरांत रात्री ८ ते स. ६ पर्यंत संचारबंदी. विवाहासाठी १०० ची परवानगी.

बिहार : शाळा-कॉलेज ३० एप्रिलपर्यंत बंद. लग्नासाठी २०० जणांची परवानगी.

राजस्थान : १० शहरांत ९ ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी. शाळा-कॉलेज बंद.

दिल्ली : एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी. विवाहात १०० लोकांना परवानगी

हरियाणा : शाळा-कॉलेज सुरू, विवाहात ५०० लोक सहभागी होऊ शकतात.

उत्तराखंड : १२ राज्यांतून येणाऱ्यांना काेरोनाचा अहवाल अनिवार्य

बातम्या आणखी आहेत...