आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • World Corona Outbreak | World Corona Virus Cases And Deaths, Rapid Infection In 41 States In The US, Alert Warning; 40,000 Police In Spain

जगभरात कोरोना:अमेरिकेत 41 राज्यांत वेगाने संसर्ग, सतर्कतेचा इशारा; स्पेनमध्ये 40 हजार पोलिसांचा बंदोबस्त

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पेन : देशभरात कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांना श्रद्धांजली
  • आघाडीच्या 10 देशांत अनलॉकनंतर रुग्णसंख्येत वाढ, पुन्हा केली सक्ती

सात महिन्यानंतरही कोरोनाचा कहर थांबलेला नाही. जगबरात १.३७ कोटींहून जास्त लोक बाधित असून ५.८७ लाख लोकांनी प्राण गमावले. गेल्या चोवीस तासांत २.३४ लाख नवीन रुग्ण आढळून आले. सर्वाधिक ७१ हजार ७५० रुग्ण अमेरिकेत आहेत. येथे आठवड्यापासून दररोज ६० हजाराहून जास्त रुग्ण येत आहेत. नियंत्रणासाठी विविध देशांनी लॉकडाऊन केले. अत्यावश्यक गोष्टींना अनलॉक केल्यानंतर पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागला. आता अमेरिका, भारत, ब्राझील व रशिया हॉटस्पॉट ठरले आहेत. चला, कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या आघाडीच्या दहा देशांची दशा, आव्हाने आणि निपटारा तसे करताहेत, हे जाणून घेऊया...

स्पेन : संसर्ग वाढल्याचे पाहून पुन्हा १५ दिवसांचा लॉकडाऊन

१४ मार्चला आणीबाणी होती. २१ जूनला हटवली. पर्यटकही भेट देत होते. देशात रोज ७०० रुग्ण आढळले, कॅटेलोनियाच्या पायरेनीज पर्वत क्षेत्रात ८०० रुग्ण आढळले. कोर्टाच्या आदेशावर १५ दिवसांत दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू केला. निगराणीसाठी ४० हजारावर पोलिस तैनात.

रशिया : संसर्ग जास्त असूनही सलून, रेस्तराँ, उद्याने खुली

३० मार्चला देशव्यापी लॉकडाऊन जाहीर. या आदेशाला दोनवेळा ११ मे पर्यंत वाढवले. सतत संसर्ग वाढल्यानंतर ११ मे रोजी अनलॉक केले. ९ जून पासून मॉस्कोमध्ये सलून, रेस्तराँ, हॉटेल, उद्याने सुरू झाली.९ जुलैला सवलतीची कक्षा वाढवली. १ ऑगस्टपासून सिनेमा, कॉन्सर्टचीही परवानगी.

चिली : कमी संसर्ग असलेली ठिकाणे वगळल्याने जास्त फैलाव

येथे ३ मार्चला पहिला रुग्ण आढळला. २१ मार्चला पहिला मृत्यू. १५ जूनला सरकारने ९० दिवसांपर्यंत निर्बंध लागू केले. परंतु, बाधित भागात सक्ती केली नाही. त्यामुळे संसर्ग वाढला. आता मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे. बहुतांश सार्वजनिक ठिकाणे खुली. गेल्या २४ तासांत नवीन रुग्ण नाही.

पेरू : लॉकडाऊन शिथिल, तपासण्या वाढवल्याने संख्येत वाढ
१६ मार्चला लॉकडाऊन लागू. जूनपर्यंत चालले. या काळात बाजारपेठ होती. संचारबंदी असूनही संसर्ग थांबला नव्हता. २९ एप्रिलला चार टप्प्यांत लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. सप्टेंबरपर्यंत ९० टक्के अर्थव्यवस्था सुरू होणार. मेपर्यंत १० लाख तपासण्या. आता नवे रुग्ण कमी. मृत्यूंत वाढ झाली.

द. आफ्रिका : मद्यावरील निर्बंध हटताच सरासरी १२ हजार रुग्ण

२७ मार्चला लॉकडाऊन लागू. १ मे पासून अनलॉक. १ जूनपासून मद्यावरील बंदी हटताच कोरोना रुग्णांत वाढ. आठवड्याने दररोज सरासरी १२ हजार रुग्ण आढळले. १५ ऑगस्टपर्यंत आणीबाणीत वाढ. रात्री रोज संचारबंदी असेल. मद्य विक्री, सामाजिक कार्यक्रमांना पुन्हा मनाई केली.

ब्राझील : फैलाव वाढल्यानंतरही अर्थव्यवस्था सुरू करणे महागात

२७ मार्चला संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू. ९ मे रोजी राज्यांत अर्थव्यवस्थेतील २० क्षेत्र खुले. त्यामुळे रुग्णसंख्येत दहापटीने वाढ झाली. आता अनेक शहरांत पुन्हा लॉकडाऊनची तयारी. १० जुलैनंतर शहर बोलसोनरोमध्ये आर्थिक घडामोडी सुरू झाल्या. आता १० लाख लोकांवर २१३३ रुग्ण येताहेत.

मेक्सिको : लॉकडाऊनमध्ये विलंब, अनलॉकमध्ये घाई, तीनपट वाढ
२३ मार्चला लाॅकडाऊन, १८ मे पासून टप्प्याने अनलाॅक. १५ जूनपासून सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठ सुरू झाली. आठवड्याने दररोज सरासरी ७ हजारांवर रुग्ण आढळले. अनलॉकनंतर ३ पटीने रुग्णसंख्येत वाढ, माजी आरोग्यमंत्री ज्युलिया फ्रँको म्हणाल्या, विलंबाने लॉकडाऊन व अनलॉकच्या घाईने अडचणीत वाढ.

अमेरिका : बारा राज्यांनी सवलत घेतली मागे, ४१ राज्यांत इशारा

२८ मार्चपासून लॉकडाऊन, १० एप्रिलपासून ५० पैकी ४० राज्यांत अनलॉक. वाहतूक, सार्वजनिक ठिकाणे खुली. त्यामुळे संसर्ग वेगाने फैलावला. गेल्या २४ तासांत ७१ हजार ७५० रुग्ण आढळले. आतापर्यंत १२ राज्यांनी सवलत मागे घेतली. ४१ राज्यांत वेगाने फैलाव. तेथे आणीबाणी लागू.

ब्रिटनमध्ये दररोज सरासरी ५०० रुग्ण, इराणमध्ये २ हजारांहून जास्त रुग्ण

इराण : १४ मार्चला लॉकडाऊन लागू व ११ एप्रिलला हटवला. २.६७ लाख कोरोना रुग्ण असून १३ हजारांहून जास्त जणांचा मृत्यू. आठवड्यापासून २ हजारांहून जास्त रुग्ण आढळत आहेत. केवळ २९ दिवस लॉकडाऊन होता. अनलॉक लवकर केल्याने टीका होते.

ब्रिटन : २३ मार्चपासून लॉकडाऊन लागू. ३१ मेपासून अनलॉक. २.९१ लाख लोक बाधित. आतापर्यंत ४५ हजारांवर मृत्युमुखी. ४ जुलैपासून सिनेमा, पब, रेस्तराँ सुरू झाले. त्यानंतर दररोज सरासरी ५०० रुग्ण आढळून आले. लिसेस्टरमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू झाला.

बाकी देश 

> चीनमध्ये २० जुलैपासून सिनेमा हॉल सुरू होणे शक्य.

> कॅनडा-मेक्सिकोने अमेरिकेलगत सीमा बंद केली.