आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • World Corona Outbrek: The Vaccine Reduced 80% Of Deaths, With Only 1879 Patients In Britain Of 6 Million People; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:​​​​​​​लसीमुळे 80% मृत्यू घटले, 6 कोटी लोकांच्या ब्रिटनमध्ये फक्त 1879 रुग्ण; युरोपात सर्वाधिक प्रभावित ब्रिटनने कसा रोखला संसर्ग

लंडन23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाळा सुरू झाल्यानंतर रुग्णवाढीमुळे सावध झाले, बंदी कठोर

एक वर्षाच्या कडक आणि सुनियोजित लॉकडाऊननंतर ब्रिटन मोकळ्या हवेत श्वास घ्यायला सज्ज आहे. महामारीतून बाहेर पडणाऱ्या ब्रिटनच्या लोकांसाठी हे सुखद स्वप्न पूर्ण होण्यासारखेच आहे. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक बाधित झालेल्या इंग्लंडमध्ये एनएचएसच्या फक्त ६.४% खाटांवर कोरोना रुग्ण आहेत. दुसऱ्या लाटेतील पीकदरम्यान येथे ६०% खाटा भरल्या होत्या. येथील बहुतांश रुग्णालयांत क्षमतेच्या फक्त ५% च रुग्ण आहेत. आता येथे ६१० लोकांमध्ये एक कोरोनाबाधित आढळत आहे. गेल्या आठवड्यात ४८०पैकी एक बाधित होता.

इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी १० सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच बाधितांची संख्या एक लाखापेक्षा कमी होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, फिजिकल डिस्टन्सिंगचे कठोर पालन, शक्य असेल तेथे वर्क फ्रॉम होम, शाळा बंद, यशस्वी लसीकरण मोहिमेमुळे संसर्ग कमकुवत झाला. पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या ताज्या माहितीनुसार लसीकरणाने हॉस्पिटलायझेशन आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू ८०% घटले आहेत. एवढेच नव्हे तर लसीकरणामुळे लक्षण नसलेल्या संसर्गात ७०% तर लक्षणे असलेल्या संसर्गात ९०% घट झाली आहे. विशेष म्हणजे महामारी सुरू होण्यापासून आतापर्यंत ब्रिटनमध्ये कोरोनामुळे १२७३४७ मृत्यू झाले असून ४३९८४३१ बाधित झाले आहेत. सध्या ९९२२८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील फक्त १८७९ जण रुग्णालयात दाखल आहेत. इंग्लंड लोकसंख्येच्या हिशेबाने मृत्यूच्या बाबतीत ११ सर्वाधिक प्रभावित आणि युराेपातील सर्वात प्रभावित देश होता.

शाळा सुरू झाल्यानंतर रुग्णवाढीमुळे सावध झाले, बंदी कठोर

  • मार्च २० अखेरीस लॉकडाऊन लावला. कोरोना प्रोटोकॉल लागू करण्यासाठी कायदा केला. पोलिस व सरकारला आपत्कालीन अधिकार दिले, त्याचा वापर दुसऱ्या महायुद्धानंतर कधीच झाला नव्हता.
  • एनएचएसने तात्पुरते रुग्णालय बांधले, स्वत:ला तयार केले. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि चाचण्या केल्या. याचा परिणाम असा झाला की, मे- जूनमध्ये मृत्युदर घटला. जून-जुलैत सवलत दिली.
  • सप्टेंबरमध्ये शाळा सुरू झाल्याने रुग्ण वाढले. नोव्हेंबरमध्ये लॉकडाऊन. ख्रिसमसमध्ये सूट दिल्याने पुन्हा रुग्ण वाढू लागले. जानेवारीत पुन्हा लॉकडाऊन. लसीकरणाला वेग आल्यानंतर रुग्ण घटत आहेत.

१७ मेपासून ३० जणांना एकत्र येता येईल, जूनपर्यंत सर्व प्रतिबंध हटू शकतात
इंग्लंडमध्ये योजनाबद्ध पद्धतीने लॉकडाऊन हटवला जात आहे. जिम, सलून सुरू झाले. पबबाहेर बसण्याची परवानगी आहे. शक्यतो १७ मेपर्यंत एका ठिकाणी ३० जणांना एकत्र येण्याची सूट मिळू शकते. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, संग्रहालये सुरू होतील. जूनच्या अखेरपर्यंत सामाजिक कार्यक्रमांतील मर्यादाही हटवली जाईल. नाइट क्लबही सुरू केले जातील.

४.३ कोटी डोस दिले गेले, ५०पेक्षा जास्त वयाच्या ९५% लोकांचे लसीकरण
आतापर्यंत ब्रिटनमध्ये ३३०३२१२० जणांचे लसीकरण झाले आहे. यातील १०४२५७९० जणांना दुसरा डाेस दिला गेला आहे. एकूण ४३४५७९१० डोस दिले गेले आहेत. आतापर्यंत ५० वर्षांवरील ९५% जणांचे लसीकरण झाले आहे. दक्षिण पूर्वमध्ये ५० वर्षांवरील ९७% लोकांना लस दिली गेली आहे. लंडनमध्ये या वयाच्या ८७% जणांना लस दिली गेली आहे.

रेड लिस्ट प्रवासबंदी सुरू होण्याआधी हजारो भारतीय ब्रिटनमध्ये पोहोचले, गर्भश्रीमंत ८५ लाख भाडे देत चार्टर्ड प्लेनने जात आहेत
ब्रिटनमध्ये शुक्रवारपासून भारतातून येणाऱ्यांना रेड लिस्ट प्रवासबंदी लागू झाली आहे. बंदी सुरू होण्याआधी हजारो भारतीय इंग्लंडमध्ये पोहोचले. हे प्रवासी पाचपट महाग तिकीट घेऊन आले. भारतातील गर्भश्रीमंत १० हजार डॉलर म्हणजे तासाला ७५ हजार रु. भाडे देऊन चार्टर्ड प्लेनने इंग्लंडला येत आहेत. ६ हजार मैलांचा प्रवास १२ तासांचा म्हणजे पूर्ण भाडे ८५ लाख.

बातम्या आणखी आहेत...