आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • World Coronavirus Outbreak; 41 Per Cent Increase In Patients On Ventilators In Britain, News And Live Updates

कोरोना महामारी:ब्रिटनमध्ये व्हेंटिलेटरवरील रुग्णांत 41 टक्के वाढ, रुग्णालयांवर दबाव; रुग्णसंख्या दररोज आठ हजारांवर, मोसमी आजारांमुळे संकट दुप्पट

लंडन, वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फ्लू व न्यूमोनियामुळे मृतांचे प्रमाण तुलनेने 10 पट जास्त

ब्रिटनमध्ये मंगळवारी कोरोनाचे ११ हजार ६२५ नवे रुग्ण आढळून आले. एका आठवड्यापूर्वी येथे रोज ८ हजारांहून कमी रुग्ण आढळून येत होते. परंतु आठवड्यात व्हेंटिलेटरवरील रुग्णांचे प्रमाण ४१ टक्क्यांनी वाढले आहे, असे राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) या संस्थेने म्हटले आहे. एनएचएसचे उपकार्यकारी प्रमुख कॅसर कॉर्डरी म्हणाले, परिस्थिती वाईट हाेत चालली आहे. रुग्णालयांवर दबाव आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आकडे जाहीर केले आहेत. त्यानुसार फ्लू, न्यूमोनियामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या आता कोरोनाच्या मृत्यूच्या तुलनेत १० पट जास्त आहे. इम्पीरियल कॉलेज लंडनचे महामारी विज्ञानाचे प्रोफेसर नील फर्ग्युसन म्हणाले, कोरोना लस घेऊन लोकांचा बचाव केला जाऊ शकतो. व्हेंटिलेटर लावलेल्या रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे. हे चित्र तिसरी लाट संपेपर्यंत राहू शकते.

फ्रान्स : संचारबंदी हटताच सांगीतिक महोत्सव सुरू
छायाचित्र फ्रान्सची राजधानी पॅरिसचे आहे. येथे राष्ट्रीय संचारबंदी नियोजित वेळापत्रकाच्या १० दिवस आधी संपुष्टात आणण्यात आली. त्यानंतर येथे
संगीतोत्सव साजरा झाला.

इस्रायल : लस घेतल्यावर अधिकाऱ्यास क्वाॅरंटाइन करावे लागेल
लस घेतल्यानंतरही अधिकाऱ्यास क्वाॅरंटाइन करावे लागेल. डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग असल्यास त्यांनी क्वॉरंटाइन व्हायला हवे. तज्ज्ञांनी पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना डेल्टा व्हेरिएंटच्या धोक्याबद्दल सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

कोलंबिया : तिसऱ्या लाटेत ४० हजारांवर मृत्यू, आयसीयू ९७ टक्के भरले
दक्षिण अमेरिकेतील देश कोलंबियात कोरोनाची तिसरी लाट आहे. मध्य मार्चपासून येथे कोरोनामुळे ४० हजारांहून जास्त मृत्यू झाले. राजधानी बगोटा येथील डॉक्टर मारिसोल म्हणाले, आमचे रुग्णालयांचे जाळे कोसळले आहे. देशात दररोजच्या नव्या रुग्णांत सरासरी २५ हजार रुग्णांची भर पडत आहे.

अमेरिका : तज्ज्ञ फॉसी म्हणाले, डेल्टा व्हेरिएंट आपल्या सर्व पेशींवर भारी
अमेरिकेतील संसर्गरोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फॉसी यांनी डेल्टा व्हेरिएंटला आव्हानात्मक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, विषाणूच्या या स्वरूपामुळे कोरोनाचे उच्चाटन करण्याचे आमचे प्रयत्न कमी पडतील. त्याचा संसर्ग मुळात विषाणूतून आहे. फॉसी यांनी डेल्टा व्हेरिएंट अत्यंत घातक आहे.

बातम्या आणखी आहेत...