आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वधर्मसमागम केंद्र:कझाकिस्तानमध्ये जागतिक धर्मगुरू परिषद, शांतीचे आवाहन

नूर सुलतान25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र मुस्लिमबहुल कझाकिस्तानच्या नूर सुलतान शहरातील आहे. येथील इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर एक्स्पोमध्ये बुधवारपासून ७ व्या आंतरराष्ट्रीय सर्वधर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्यासह मुस्लिम, बौद्ध तसेच इतर धर्मांचे ६० देशातील धार्मिक नेते सहभागी होतील. महामारीनंतर जगभरातील आंतरधर्मीय संवाद वाढवण्याच्या उद्देशाने याचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच रशिया-युक्रेन युद्ध लक्षात घेऊन वैश्विक धर्मगुरू एका स्वरात शांतीचे आवाहन करतील. या परिषदेला २००३ पासून सुरुवात झाली होती. तेव्हापासून कझाकच्या राजधानीत दर तीन वर्षांनी परिषद आयोजित होते. आधीचे संमेलन २०१८ मध्ये झाले होते.

संमेलनाचे महत्त्व काय ? : कझाकिस्तानच्या संमेलनाचे महत्त्व लक्षात घ्यावे लागेल. कारण या देशाची सीमा रशिया व दुसरी चीन लगत आहे. कझाकिस्तानमध्ये १३० जाती आहेत. देशाच्या परराष्ट्र धोरणातही बहुसंस्कृती दिसून येते. त्यामुळेच पूर्व व पश्चिममधील एक प्रमुख थांबा असे देशाचे महत्त्व आहे.

बातम्या आणखी आहेत...