आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • World Favorite Pasta During The Epidemic, Exports From Italy Increased By 30 Percent; Pizza Is Becoming Popular

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फूड ट्रेंड:महामारीच्या काळात पास्ताला जगाची पसंती, इटलीतून निर्यात 30 टक्के वाढली; पिझ्झासारखा होतोय लोकप्रिय

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • युरोप-अमेरिकेसह आफ्रिका, आशियातही पास्ता खाणाऱ्यांची संख्या वाढतेय

कोरोनाकाळात जगभरात लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल झाला आहे. इटलीच्या लोकांना जगात सर्वाधिक पास्ता आवडतो. इटलीत दरवर्षी प्रत्येक व्यक्ती २३ किलो पास्ता खाते. मात्र, नुकतीच लॉकडाऊनच्या काळात जगभरात त्याची मागणी वेगाने वाढली आहे. इटलीतून जगभरात पास्ता जातो. येथे जेवढ्या पास्ताचे उत्पादन होते त्याच्या ६०% निर्यात होते. येथून युरोप व अमेरिकेत पास्ता जातो. इटलीची सांख्यिकी कंपनी आयएसटीएटीनुसार यंदा पहिल्या सहा महिन्यांत पास्ताची निर्यात ३०% वाढली आहे.

सर्वात नामांकित पास्ता कंपनी बॅरिलाने मागील १२ महिन्यांत जगभरात एकूण ४.२ बिलियन डॉलरची विक्री केली आहे. कंपनी मुख्यालयातून रोज एक हजार टन उत्पादन सुरू आहे. कडक लॉकडाऊनमध्येही ते सुरू होते. तिकडे जर्मनीत बॅरिलाचे बॅस्टियन डायगेल सांगतात की, बॅरिलाच्या कारखान्यात आधीपेक्षा जास्त पास्ताचे उत्पादन केले आहे. वर्ल्डवाइड पास्ता ऑर्गनायझेशनचे लुइगी क्रिस्टियानो लॉरेंजा सांगतात की, महामारीनंतरही लोकांमध्ये पास्ताची लोकप्रियता वाढली आहे. जगभरात पास्ताची विक्री १९९९ मध्ये ७० लाख टन होती, जी मागील १२ महिन्यांत वेगाने वाढून १६० लाख टन झाली. ते म्हणतात, पास्ता स्वस्त व मस्त आहे. ती सर्वांची पसंत होत आहे. मुलांमध्ये वेगाने त्याची लोकप्रियता वाढत आहे. आफ्रिका आणि आशियातही त्याला पसंत करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. विशेषत: महामारीच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांमध्ये वेगाने वाढत आहे.

भारतात लाॅकडाऊनमध्ये विक्री तिप्पट-चौपट वाढली
मार्केट रिसर्च कंपनी आयएमएआरसीच्या अहवालानुसार भारतीय पास्ता बाजार २०१९ मध्ये ३९१.५ मिलियन अमेरिकी डॉलरवर गेला, जो २०२४ पर्यंत ८२१.९ यूएस डॉलर इतका होण्याचा अंदाज आहे. तो या काळात वार्षिक १६% वेगाने वाढेल. एका अहवालानुसार पास्ताबाबत भारतातही लॉकडाऊन काळात रस वाढला आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या तीन-चार महिन्यांतच भारतात त्याची विक्री तीन ते चार पट वाढली होती. आपल्याकडे तो पिझ्झासारखा लोकप्रिय होत आहे.

बातम्या आणखी आहेत...