आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2023 हे वर्ष अंतराळ तंत्रज्ञानासाठी सुवर्णवर्ष मानले जात आहे. कारण आहे 5 मोठ्या मोहिमा, ज्यांच्यामुळे लोकांचे अंतराळाविषयीचे आकलन वाढेल. हे आहेत-युरोपीय अंतराळ संशोधन संस्थेचे ज्युपिटर आईसी मून्स एक्सप्लोरर आणि सुपर हेवी स्पेसएक्स स्टारशिपचे प्रक्षेपण. जपानच्या 8 सदस्यीय दलाचे मिशन डिअरमून. नासाच्या यानाचे सर्वात महत्वाचे लघुग्रहाचे नमुने पृथ्वीवर परत आणण्याचे आणि भारतीय खासगी अंतराळ कंपनी स्कायरूटच्या पहिल्या 3डी प्रिंटेड रॉकेटचे उपग्रहासह प्रक्षेपण.
स्पेसएक्सचे सुपरहेवी स्टारशिप
स्टारशिप एक लाख किलोचे कार्गो पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थापित करेल. यात दोन घटक असतील. अंतराळ यान आणि सुपर हेवी रॉकेट. 39 शक्तिशाली इंजिनांनी बनलेले रॉकेट 65 किमी उंचीवर नेले जाईल.
जपानचे डिअरमून मिशन
जपानच्या आठ अंतराळवीरांचे एक पथक स्पेसएक्सच्या स्टारशिपमधून चंद्रावर जाईल. हे पथक चंद्राभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करून त्यावर उतरेल. या यशातून सुदूर अंतराळातील पर्यटनाच्या भविष्याचारही अंदाज लावला जात आहे.
ज्युपिटर आईसी मून एक्सप्लोरर
जगातील पहिले रोबोटिक ज्युपिटर मिशन. चंद्राभोवती चार वर्ष फिरल्यानंतर 2031 मध्ये गुरू ग्रहावर पोहोचेल. याचे रडार तिथल्या पृष्ठभागावर गोठलेला बर्फ आणि वायूंचा शोध घेतील. प्रक्षेपण एप्रिल अखेरिस होईल.
लघुग्रहाचे मौल्यवान नमुने मिळतील
नासाचे ओसिरिस पृथ्वीजवळच्या बेन्नू लघुग्रहाचे नमुने घेऊन 24 डिसेंबर रोजी अमेरिकेतील युटा वाळवंटात परतेल. संशोधकांना असा विश्वास आहे की तिथे सोने, प्लॅटिनमसह अनेक मौल्यवान धातू मुबलक प्रमाणात आहेत. तिथे पाणी असण्याचाही अंदाज आहे.
स्कायरूटचे 3डी प्रिंटेड रॉकेट
भारताची पहिली खासगी कंपनी स्कायरूट यावर्षी आणखी एक उपग्रह प्रक्षेपित करेल. याचे लक्ष्य 3 डी प्रिंटेड रॉकेटचे उत्पादन वाढवून खासगी प्रक्षेपणाचा खर्च कमी करणे हे आहे. दोन खासगी कंपन्याही यावर्षी रॉकेट प्रक्षेपित करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.