आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • World Happiness Index । Finland World's Happiest Country For Fifth Time । India World Happiness Ranking

फिनलंड जगातील सर्वात आनंदी देश:भारताचे रँकिंग 139 व्या वरून 136व्या स्थानावर, पाकिस्तान 121व्या रँकसह आपल्यापेक्षा उत्तम

न्यूयॉर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक हॅपीनेस इंडेक्समध्ये फिनलंडला सलग पाचव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश म्हणून निवडण्यात आले आहे. तर अफगाणिस्तान जो तालिबानी राजवटीचा सामना करत आहे, सर्वात दु:खी देश ठरला आहे.

डेन्मार्क, आइसलँड, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड हे टॉप 5 मध्ये सर्वात आनंदी देश आहेत. तर अमेरिका 16व्या आणि ब्रिटन 17व्या क्रमांकावर आहे. या यादीत भारत 136व्या क्रमांकावर आहे. गेल्या वेळी भारताचा क्रमांक 139 वा होता, म्हणजेच भारताच्या क्रमवारीत तीन स्थानांनी सुधारणा झाली आहे. दुसरीकडे, शेजारी पाकिस्तान 121व्या क्रमांकासह भारतापेक्षा चांगल्या स्थितीत आहे.

शुक्रवारी जाहीर झालेल्या या यादीत सर्बिया, बल्गेरिया आणि रोमानिया या देशांत चांगले जीवन जगण्यात सर्वाधिक वाढ झाली आहे. वर्ल्ड हॅपीनेस टेबलमध्ये सर्वात मोठी घसरण लेबनॉन, व्हेनेझुएला आणि अफगाणिस्तानमध्ये झाली आहे.

दु:खी देशांची सद्य:स्थिती

लेबनॉनचा क्रमांक 144 असून हा देश आर्थिक मंदीचा सामना करत आहे. तर झिम्बाब्वे 143व्या क्रमांकावर राहिला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबान पुन्हा सत्तेवर आल्यापासून युद्धग्रस्त अफगाणिस्तान यादीत तळाशी आहे. युनिसेफचा अंदाज आहे की, पाच वर्षांखालील दहा लाख मुले या हिवाळ्यात मदत न दिल्यास उपासमारीने मरू शकतात.

रशिया-युक्रेन युद्धापूर्वी तयार झाला होता अहवाल

गेल्या दहा वर्षांपासून वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट तयार केला जात आहे. ते तयार करण्यासाठी लोकांच्या आनंदाचे मूल्यांकन करण्याबरोबरच आर्थिक आणि सामाजिक डेटादेखील पाहिला जातो. तीन वर्षांच्या सरासरी डेटावर आधारित आनंदावर शून्य ते 10 स्केल दिले जाते. मात्र, युक्रेनवर रशियाच्या आक्रमणापूर्वी संयुक्त राष्ट्रांचा हा ताजा अहवाल तयार करण्यात आला होता. म्हणूनच युद्ध लढणाऱ्या रशियाचा क्रमांक 80 आणि युक्रेनचा क्रमांक 98 आहे.

कोणत्या निकषांवर तयार झाली यादी

अहवालाचे सहलेखक जेफ्री सॅक्स यांनी लिहिले की, जागतिक हॅपिनेस रिपोर्ट तयार केल्यानंतर अनेक वर्षांनी असे समजले आहे की समृद्धीसाठी सामाजिक समर्थन, औदार्य, सरकारची प्रामाणिकता खूप महत्त्वाची आहे. जागतिक नेत्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. अहवाल तयार करणाऱ्यांनी कोरोना महामारीच्या आधी आणि नंतरचा वेळ वापरला. त्याच वेळी, लोकांच्या भावनांची तुलना करण्यासाठी सोशल मीडिया डेटादेखील घेण्यात आला. 18 देशांमध्ये चिंता आणि दुःखात जोरदार वाढ झाल्याचे दिसून आले. पण रागाच्या भावना कमी झाल्याचे दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...