आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • World Heritage Site | Turkey President Recep Tayyip Said Prayer Will Be Held In Istanbul's Hagia Sophia From July 24, Its Doors Will Be Open For All

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक वारसास्थळ:तुर्कीतील संग्रहालय 86 वर्षानंतर मशिदीत बदलले : 24 जुलैपासून येथे नमाज पठण होईल, 1500 वर्षांपूर्वी हे एक चर्च होते

इस्तंबूल10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1483 वर्षांची इमारत, चर्च-संग्रहालय आता पुन्हा मशीद!
  • ही इमारत युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत समाविष्ट आहे

तुर्कीच्या इस्तंबूल शहरातील हगिया सोफिया संग्रहालयाचे रूपांतर ८६ वर्षांनंतर पुन्हा मशिदीत झाले आहे. राष्ट्रपती रेसिप तय्यप एर्दोगन यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर शनिवारी अधिकृत घोषणा केली.

युनेस्कोने मशिदीच्या आतील भागातील छायाचित्र ट्विटर अकाउंटवरून जारी केले. ही इमारत युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत समाविष्ट आहे. सरकारने १९३४ मध्ये संग्रहालय बनवले होते. ५३७ मध्ये बायजेंटाइन सम्राट जस्टिनियनने त्यास चर्चचे रूप दिले होते. उस्मानिया सल्तनतने १४५३ मध्ये मशीद बनवली होती. ही ग्रीक स्थापत्यशैलीतील इमारत आहे. राष्ट्रपती एर्दोगन यांनी गेल्या वर्षी निवडणुकीत ही मशीद बनवण्याचे आश्वासन दिले होते. तत्पूर्वी, लोक संग्रहालयाबाहेर नमाज पढत.

बातम्या आणखी आहेत...