आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:जगातील सर्वात मोठे जहाज ‘वंडर ऑफ सीज’ चे बुकिंग सुरू; 10 मजली, क्रूझमध्ये प्रवासी क्षमता 7 हजार!

शांघाय22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मार्च 2022 मध्ये शांघाय व हाँगकाँगपासून विविध देशांसाठी सुरू करणार सफर
  • जहाजात क्रीडा विभाग, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल कोर्ट, जिमची सुविधाही

क्रूझ यात्रा आणि सागर भ्रमंतीची आवड असल्यास तुम्हाला जगातील सर्वात माेठ्या जहाजातून सागरी सफरीत सहभागी हाेण्याची संधी आहे. मार्च २०२२ पासून ‘वंडर आॅफ द सीज’ पहिल्या सफरीवर िनघेल. त्यासाठी नाेंदणी सुरू झाली आहे. हे जहाज शांघायमधून प्रवास सुरू करेल. जहाजाची मालक कंपनी राॅयल कॅरेबियन इंटरनॅशनलने त्याची छायाचित्रे जाहीर केली आहेत. दाेन हजारांहून जास्त आरामदायी खोल्या व सुइट असलेल्या या जहाजातून सुमारे ७ हजार प्रवासी सफरीवर जाऊ शकतात. एका व्यक्तीचे भाडे सुमारे दीड लाख रुपये ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत आहे. चारसदस्यीय कुटुंबासाठी सुइटच्या भाड्यापाेटी सुमारे २७.५ लाख रुपये माेजावे लागतील.

कंपनीच्या म्हणण्यानुसार मार्च २०२२ पासून नाेव्हेंबर २०२२ दरम्यान प्रवासी शांघाय ते जपानच्या राउंड ट्रिपवर जाऊ शकतील. ९ रात्री व ८ दिवसांची ही सागरी भ्रमंती असेल. टाेकियाे, माउंट फुजी, कुमामाेटाे, कागाेशिमा, इशिगाकी, मियाजाकी इत्यादी बंदरांवरून हे जहाज जाणार आहे. त्याशिवाय आशियातील पर्यटकांच्या पसंतीच्या ठिकाणांनाही जहाज भेट देईल. त्यात दक्षिण काेरिया, व्हिएतनाम, चीन, हाँगकाँगही सामील आहेत. नाेव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान नाताळ, नूतन वर्ष व इतर सुट्यांचा विचार करून व्हिएतनामच्या चानमध्ये दक्षिण काेरियात बुसान-जेजू याव्यतिरिक्त चीनच्या तैपेईलादेखील हे जहाज भेट देईल.

भाडे १.५० लाखांहून ३.५० लाखांपर्यंत
१० मजली जहाजात ६ हजार ९८८ लाेक प्रवास करू शकतात. त्यात १८ डेक व २८६७ स्टेट रूम्स म्हणजे आलिशान सुइट्स असतील. जहाजाची लांबी ११८८ फूट, रुंदी -२१० फूट, वजन सुमारे २.३७ लाख टन आहे. त्याशिवाय पूल, क्रीडा विभाग आहे. त्यात जिम, बास्केटबाॅल, व्हाॅलीबाॅलसह गाेल्फ काेर्टही असेल. जहाजाचे सर्वात कमी भाडे प्रतिव्यक्ती १.५० लाख रुपये ते ३.५० लाख रुपये आहे. महागड्या सुइटसाठी चार जणांचे २७.५० लाख रुपये भाडे द्यावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...