आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजपानच्या होक्काइडो प्रांतातील डोंगरात निशेको शहर आहे. २०१९ च्या ख्रिसमस आणि नूतन वर्षानिमित्त येथील सर्व हॉटेल्स, लक्झरी व्हिला व इतर सर्व थांबण्याची-फिरण्याची ठिकाणे भरली होती. येथे पडणारा बर्फ मऊ असल्याने जगभरातील श्रीमंत येथे स्कीइंग आणि हिमवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी येतात. या मखमली बर्फाला जपानी भाषेत ‘जापो’ म्हणतात. मात्र, कोरोनामुळे जपानमध्ये पर्यटकांना येण्याची बंदी झाल्याने निशेकोतील पर्यटन उद्योग उद्ध्वस्त झाला आहे. सध्या १३०८ मीटर उंच माउंट निशेको अनुपुरीच्या डोंगरात स्कीइंग करण्यासाठी मोजकेच लोक दिसत आहेत. जानेवारी २०२० मध्ये होक्काइडोत २ लाख पर्यटक आले होते. फेब्रुवारी येईपर्यंत ते घटून निम्मे झाले आणि एप्रिल ते डिसेंबरदरम्यान फक्त १२ परदेशी पर्यटक येथे आले.
मात्र, लवकरच एवढे पर्यटक दिसतील की जेवढे यापूर्वी दिसले नव्हते, अशी आशा अल्ट्रा लक्झरी हॉटेल संचालकांना आहे. या भागात एच- २ गटाचे १५० हॉटेल्स आहेत. या हाॅटेल्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल चेन यांनी “भास्कर’ला सांगितले की, गेल्या वर्षी फेब्रुवारीत त्यांच्या सर्व खोल्या भरल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे रात्रीतच चित्र बदलले. सरकारने गो टू ट्रॅव्हल मोहीमही रद्द केली. याअंतर्गत जपानच्या लोकांना हिंडण्या-फिरण्यासाठी अनुदान दिले जाते. एच-२ गटाचे ग्राहक जगभरातील श्रीमंत आहेत. येथील लक्झरी सूटमध्ये एका रात्रीसाठी श्रीमंत लोक सुमारे २१ लाख रुपये खर्च करतात आणि तरीही येथील सूट भरलेले असतात. चेन सांगतात की, त्यांचे ग्राहक सिलिकॉन व्हॅलीतील अब्जाधीशांपासून ते युरोप आणि आशियातील अनेक श्रीमंत लोक आहेत. लेडी गागाचे हेलिपॅडही जवळच आहे. ते तिला गोपनीय ठेवायचे आहे. चेन यांचे म्हणणे आहे की, जगभरात कोठेही स्कीइंग केल्यानंतर जेव्हा एखादा निशेकोत पहिल्यांदा येतो तेव्हा तो पावडरसारख्या मखमली हिमवृष्टीसह येथील संस्कृती, व्यंजन व वातावरणाच्या प्रेमात पडतो. यामुळेच एच-२ गटाला वाटते की निशेको खूप काळ सामसूम राहणार नाही.
पर्यटकांनी यावे म्हणून तैवान-हाँगकाँगमध्ये मोहीम
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.