आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना परिणाम:3 % घटला जागतिक व्यापार; जून तिमाहीत मोठी घसरण : संयुक्त राष्ट्र

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • कोरोना संकटामुळे आर्थिक उत्पादन ठप्प झाल्याने आली घट

कोरोना विषाणू महारोगराईमुळे या वर्षाच्या पहिल्या तिमाही(जानेवारी-मार्च)त आंतरराष्ट्रीय व्यापार तीन टक्के घटला आहे. ही बाब संयुक्त राष्ट्राची व्यापार संघटना युनायटेड नेशन्स काॅन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट(अंकटाड)ने आपल्या एका अहवालात नमूद केली आहे. अंकटाडनुसार, एप्रिल-जून तिमाहीत आंतरराष्ट्रीय व्यापार मार्च तिमाहीच्या तुलनेत २७ टक्के घटू शकतो. आंतरराष्ट्रीय व्यापारात जिथे घसरण नोंदली आहे तिथे कमोडिटीच्या किमतीतही घट आली आहे. गेल्या डिसेंबरपासून आतापर्यंत कमोडिटीच्या किमतीत मोठी घसरण आली आहे. अंकटाडने हा अहवाल आंतरराष्ट्रीय सांख्यिकी संघटना आणि अनेक देशांच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालये आणि प्रणालीच्या मदतीने तयार केली आहे. अंकटाडचे सरचिटणीस मुखिसा कित्युई म्हणाले, प्रत्येक देशाचवर कोविड-१९ महारोगराईनंतर दूरगामी परिणाम होईल.

कमोडिटीच्या किमतींमध्ये घसरण

अहवालानुसार, फ्री मार्केट कमोडिटी प्राइस इंडेक्स(एफएमसीपीआय)चे मूल्य जानेवारीत १.२%, फेब्रुवारीत ८.५% आणि मार्चमध्ये २०.४% घसरण आली आहे. हा निर्देशांक विकसनशील अर्थव्यवस्थांद्वारे निर्यात केल्या जाणाऱ्या प्राथमिक कमोडिटीच्या किमतीतील बदल दर्शवतो. या घसरणीत सर्वात मोठी भूमिका इंधन किमतींनी बजावली. यामध्ये मार्चमध्ये ३३.२% घसरण राहिली. खनिज,धातू, खाद्यपदार्थ आणि कृषीसंबंधी कच्च्या मालात ४ टक्क्यांपेक्षा कमी घसरण राहिली.

बातम्या आणखी आहेत...