आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • World Vaccination Updates: Rich Countries Have 53 Per Cent Vaccination; 60% Population Of 92 Poor Countries Will Not Get Vaccinated By 2023; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वास्तव:श्रीमंत देशांकडे 53 टक्के लस; जगाच्या 16 % लोकसंख्येला लाभ; 92 गरीब देशांतील 60 टक्के लोकसंख्येस 2023 पर्यंत नाही मिळणार लस

वॉशिंग्टन13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गरीब देशांतील लसीकरणास सुरुवात, अनेक देशांत लसीकरण सुरू होण्याची चिन्हे नाहीत

कोरोना महामारीमुळे लसीबाबत जगाची वाटणी तीन भागांत झाली असे म्हणावे लागेल. पहिल्या भागातील देशांकडे मूळ लोकसंख्येच्या अनेकपट जास्त लसींचा साठा आहे. कारण हे देश श्रीमंत आहेत. दुसऱ्या भागातील देशांकडे आपल्या लोकांसाठी पुरेसे डोस घेण्याइतपत पैसा नाही. तिसरा भाग म्हणजे अत्यंत गरीब देश. अशा देशांकडे लसीची केवळ मागणी करणे एवढाच पर्याय हाती आहे. श्रीमंत देशांनी जगात एकूण उत्पादित होणाऱ्या लसींपैकी ४८ टक्के भाग स्वत:कडे साठवून ठेवला आहे. वास्तविक अशा श्रीमंत देशांची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ १६ टक्के आहे.

या मूठभर देशांत अमेरिका, ब्रिटनसारखे देश आहेत, तर समस्येत अडकलेल्या देशांत सर्बिया, ब्राझील व भारतासारखे देश आहेत. अतिशय गरीब देशांची स्थिती लस मिळवण्याच्या बाबतीत वाईट आहे. त्यात घाना, नायजेरियासारखे देश आहेत. काही गरीब देशांत लसीकरणाला आता सुरुवात झाली आहे. काही देशांत अजूनही झालेली नाही. ड्यूक विद्यापीठातील ग्लोबल हेल्थ इनोव्हेशन सेंटरच्या अहवालानुसार श्रीमंत देशांनी सुमारे ५३ टक्के लसींचा पुरवठा निश्चित केला आहे. त्यामुळे ९२ गरीब देश २०२३ पर्यंतदेखील आपल्या लोकसंख्येच्या ६० टक्केदेखील लसीकरणाचे लक्ष्य गाठू शकणार नाहीत.

लसीकरणात इस्रायल पुढे, टांझानियाने आशा सोडली

श्रीमंत देश
इस्रायलमध्ये ६० % लोकांना पहिला डोस व ५८ % समुदायास दोन डोस देण्यात आले. ब्रिटनमध्ये ५० टक्के लोकांना पहिला डोस व १६ टक्क्यांहून जास्त लोकांचे दोन डोस झाले. अमेरिकेत ४१ टक्के लोकांना पहिला, २६ % दोन डोस पूर्ण झाले. चिलीत ४१ टक्के पहिला, २९ % दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण आहे.

संकटातील देश
सर्बियात २७ टक्के लोकांना दोन डोस दिले. ब्राझीलमध्ये महामारीमुळे मृतांची संख्या वाढत चालली आहे. तेथे १२ टक्क्यांहून कमी लोकांना हा डोस देण्यात आला. सर्वात मोठा लस निर्मात्या भारतातदेखील आतापर्यंत ८ टक्क्यांहून कमी लोकांना पहिला डोस व १ टक्क्याहून कमी लोकांना दोन डोस देण्यात आले.

गरीब देश
आरोग्य संघटनेच्या उद्दिष्टानुसार सदस्य देशांनी २० टक्के डोस वर्षाखेरीस वितरित करावे. परंतु ही उद्दिष्टपूर्ती शक्य दिसत नाही. घानाला फेब्रुवारीत लस मिळाली होती. तेथे केवळ ३ टक्के लोकांना लस मिळाली. नायजेरियात १ टक्क्यांहून कमी लोकांना डोस िदला. टांझानियाने आशा साेडली.

जग : काेरोनामुळे १४.५२ कोटी बाधित, ८.९६ लाख नवे रुग्ण
जगभरात कोरोना महामारीचा संसर्ग वेगाने वाढत चालला आहे. गेल्या चोवीस तासांत जगभरात ८.९६ लाख नवे रुग्ण आढळले. एका दिवसातील नवे रुग्ण आढळून येण्याचा हा विक्रम आहे. याआधी २२ एप्रिलला ८.९२ लाख व २१ एप्रिलला ८.८८ लाख बाधित आढळले होते. जॉन्स हापकिन्स विद्यापीठातील सेंटर फॉर सिस्टिम सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या म्हणण्यानुसार जगभरात कोरोनाची रुग्णसंख्या १४ कोटी ५२ लाख ७१ हजार २०८ झाली आहे. एकूण ३० लाख ८३ हजार २३५ मृत्यू झाले.

जपान : राजधानी टोकियोसह तीन प्रांतात आणीबाणीची घोषणा
जपानने राजधानी टोकियाेसह पश्चिमेकडील तीन प्रांतांत कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी तीन टप्प्यांत आणीबाणीची घोषणा केली. पंतप्रधान योशिहिदे सुगाने टोकियो, आेसाका, क्युटो, ह्योगोमध्ये २५ एप्रिलपासून ११ मेपर्यंत आणीबाणीची घोषणा केली आहे. त्यामुळे ऑलिम्पिक आयोजनावर संकट आहे. कारण, २३ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान जपानची राजधानी टाेकियोत समर ऑलिम्पिक होणार आहे. अंशत: आणीबाणी परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी पुरेशी नसल्याचे सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...