आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरात युद्धामुळे लाखो अनाथ, PHOTOS:युक्रेनच्या 13 हजार मुलांचे रशियाने केले अपहरण, सोमालियात चिमुकल्यांच्या हाती शस्त्रे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युद्धामुळे दरवर्षी लाखो मुले अनाथ होतात. संघर्षामुळे आपले पालक गमावलेल्या मुलांच्या दुर्दशेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 6 जानेवारी रोजी 'जागतिक युद्ध अनाथ दिवस' पाळला जातो. सध्या रशिया, युक्रेन, इस्रायल, पॅलेस्टाईन, आर्मेनिया, अझरबैजान, सीरिया, सोमालिया आणि येमेन या देशांमध्ये युद्ध सुरू आहे. यामुळे अनेक मुलांनी आपले पालक गमावले आहेत.

युनिसेफच्या आकडेवारीनुसार, जगभरात 153 दशलक्ष अनाथ मुले आहेत. युद्ध, गरिबी, रोगराई किंवा आपत्तीमुळे दररोज 5 हजार 700 मुले अनाथ होत आहेत. युद्धाला सामोरे जाणाऱ्या निरपराधांची कहाणी सांगणारी छायाचित्रे पाहूया...

सोमालियामध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धाने मुलांचे बालपण हिरावून घेतले आहे. येथे दररोज लहान मुलांवर अत्याचार होत आहेत. त्यांच्या शाळांवर हल्ले होतात. युद्ध लढण्यासाठी त्यांना जबरदस्तीने शस्त्रे दिली जातात. मुलींची जबरदस्ती लग्न करून त्यांच्यावर बलात्कार केला जातो. एका अहवालानुसार येथे युद्धात मरणाऱ्या मुलांची संख्या जगातील कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे.

2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली. तेव्हापासून देशाची स्थिती बिकट होत चालली आहे. एका अहवालानुसार कोट्यवधी डॉलर्सची मदत राजधानी काबूलमध्ये येणे बंद झाले आहे. त्यामुळे अनाथांच्या जीवनावर वाईट परिणाम झाला आहे.

सीरियामध्ये गेल्या 12 वर्षांपासून युद्ध सुरू आहे. सध्या सुमारे 56 लाख मुलांना मदतीची गरज आहे. UN च्या अहवालानुसार 2.5 दशलक्षाहून अधिक मुलांना देश सोडावा लागला. यातील लाखो मुले त्यांच्या पालकांपासून विभक्त झाली होती. आजही त्यांच्यावर अमानुष पद्धतीने अत्याचार होत आहेत.

सीरियातील युद्धामुळे मुले तुर्कस्तानमध्ये राहत आहेत. इथे ना त्यांना योग्य आहार मिळतो, ना शिक्षणासारख्या सुविधा. अनेक मुलांना कुटुंबाचा उदरनिर्वाहात मदत करण्यासाठी अभ्यास सोडून नोकरी करावी लागते. हे छायाचित्र तुर्कस्तानच्या हाते प्रांतातील आहे. सीरियातील बहुतेक मुले येथे राहतात.

युक्रेनमधील अनाथाश्रमांमध्ये अपंग मुलांना अमानवी परिस्थितीत ठेवले जात असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दिला होता. एका अहवालानुसार, अशा मुलांची संख्या एक लाखापर्यंत आहे. युद्धामुळे अपंगत्व आलेल्या मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. हे चित्र अनाथाश्रमात राहणाऱ्या वेसिल वेलीचकोचे आहे. त्याला मिर्गीसह अनेक अपंगत्व आहेत. अनाथाश्रमाचे कर्मचारी वेलीचकोला उन्हात अनेक तास बेंचला बांधून ठेवतात.

येमेन हा देश 1945 नंतरच्या सर्वात वाईट मानवतावादी संकटाचा सामना करत आहे. अलीकडेच यूएनने आपल्या अहवालात खुलासा केला आहे की, येमेनमध्ये 2015 पासून 11 हजार मुले मारली गेली आहेत किंवा जखमी झाली आहेत. हा आकडा आणखी जास्त असू शकतो. येथे 20 लाखांहून अधिक मुलांचे शिक्षण थांबले आहे. 5 वर्षांखालील सुमारे दहा लाख मुले कुपोषणाला बळी पडू शकतात. हा फोटो 2015 मधला आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे अनाथ मुलांच्या अडचणी वाढल्या. गेल्या महिन्यात युक्रेनने दावा केला होता की, रशियाने युद्ध सुरू झाल्यापासून 13,000 मुलांचे अपहरण केले आहे. रशियन सैनिक अनाथाश्रमात घुसतात आणि मुलांचे अपहरण करतात. अशा स्थितीत येथील कर्मचाऱ्यांना मुलांना त्यांच्याच घरात लपवून ठेवावे लागत आहे. हे छायाचित्र युक्रेनमधील खेरसन जवळील एका अनाथाश्रमात राहणाऱ्या मिशीचे आहे. अपहरण होण्याच्या भीतीने त्याला दुसरीकडे हलवण्यात आले.

हे छायाचित्र अजरबैजानमध्ये राहणाऱ्या 5 वर्षाच्या हदीजाचे आहे. 2020 मध्ये आर्मेनिया आणि अजरबैजान यांच्यातील युद्धात ती अनाथ झाली. आर्मेनियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तिचे आई-वडील आणि मोठी बहीण मारली गेली. तिच्या घरावर हा हल्ला झाला. नागोर्नो-काराबाख प्रदेशावरून आर्मेनिया आणि अजरबैजान यांच्यात वाद आहे.

बातम्या आणखी आहेत...