आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • World Water Day Water Is Precious, Save It ... Americans Pay A Water Bill Of 60,000 Rupees Every Year

आज जागतिक जल दिन:पाणी अनमोल आहे, ते वाचवा... अमेरिकी दरवर्षी भरतात 60 हजार रुपये पाण्याचे बिल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पाणी सहज मिळणे कठीण झाले आहे. आज जागतिक जल दिनानिमित्त काही आकडेवारीवर नजर टाकू, त्यातून पाणी किती अनमोल आहे याची जाणीव होईल.

अमेरिकेत दरमहा सुमारे ८७ हजार रुपये पाण्याचे बिल भरताहेत लोक
अमेरिकेत १० वर्षांत पाण्याचे दर ५०% वाढले. ही वाढ वीज व नैसर्गिक वायूच्या दरापेक्षा जास्त आहे. एक कुटुंब दरवर्षी ६० हजार रु. खर्च करत आहे.

गरीब देशांत पाणी सर्वात महागडे, आपण उत्पन्नाचा ६% खर्च करतो
गरीब देश पाण्यावर जास्त पैसे खर्च करतात. भारतीय उत्पन्नाचा ६% पाण्यावर खर्च करतात, तर अमेरिकी १%... काही देशांत उत्पन्नाच्या ५०%पर्यंत पाण्यावर खर्च.

पाणी, शौचालयावर केलेला खर्च चौपट परतावा देतो
वॉटरएडच्या अहवालानुसार पाणी आणि शौचालयाच्या मूलभूत सुविधेसाठी एका व्यक्तीमागे सुमारे ७ हजार रु. खर्च येतो. ही गुंतवणूक कामाचे तास आणि उत्पादकता वाढवण्यासोबत चांगले आरोग्य देते. ही गुंतवणूक विविध रूपात चौपट परतावा देते.

ओस्लोत जगात सर्वात महाग पाणी, २०२५ पर्यंत २२ हजार कोटी रु.चा असेल बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय
जगात नॉर्वेतील ओस्लोत बाटलीबंद पाणी सर्वात महाग. १२० मुख्य पर्यटन शहरांच्या तुलनेत पाण्याचे दर तिप्पट. नंतर तेल अवीव, न्यूयॉर्क, स्टाॅकहोम, हेलसिंकी, लाॅस एंजलिस, फीनिक्स, सॅन फ्रान्सिस्को आहेत. २०२५ पर्यंत बाटलीबंद पाणी व्यवसाय २२ हजार कोटी रु.चा असेल.

- 400 कोटी लोक म्हणजे प्रत्येक दुसरी व्यक्ती वर्षभरात कमीत कमी ३० दिवस पाणी -टंचाई सहन करत आहे.

- दररोज १००० मुलांचा मृत्यू जगात दूषित पाणी व स्वच्छतेशी संबंधित आजारांमुळे होतो.

- इथिओपियात घरपोच पाण्यासाठी १० पट पैसे द्यावे लागू शकतात.

- कॅलिफोर्नियात लोकांना ६० हजार गॅलन पाण्यासाठी दरमहा ८१२१२ रुपये भरावे लागतात.

- दक्षिण आफ्रिकेत ६०% घरांमध्ये पाणी पुरवठा अनियमित, २-३ दिवसांनी मिळते पाणी.

बातम्या आणखी आहेत...