आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआतापर्यंत तुम्ही धूळ व पाण्याला टिकू न देणाऱ्या पेंटविषयी ऐकले असेल. पण संशोधकांनी आता एक असा पेंट तयार केला आहे, जो उष्णतारोधी असेल. म्हणजेच यात रिपेलंट गुण आहेत. सोबतच हा जगातील सर्वात हलका पेंट असल्याचे सांगितले जात आहे. फ्लोरिडातील एका भारतवंशीय संशोधकाने हा पेंट तयार केला आहे.
भारतवंशीय संशोधकाने बनवला पेंट
युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडातील नॅनोसायन्स टेक्नोलॉजी सेंटरमधील प्राध्याप देबाशीश चंद यांनी एक खास प्रकारचा पेंट तयार केला आहे, जो फुलपाखरांपासून प्रेरित असल्याचे सांगितले जात आहे. एका वृत्तानुसार, या पेंटविषयी असे बोलले जात आहे की तो अनेक शतके टिकू शकतो. सोबतच हा जगातील सर्वात हलका पेंट असल्याचे सांगितले जात आहे. सायंस अॅडव्हान्सेस मध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.
एका बोईंगसाठी 1.3 किलो पेंट पुरेसा
प्रा. चंद यांच्यानुसार, निसर्गात अगणित रंग उपलब्ध आहेत. जे फूल, पक्षी, फुलपाखरे आणि माशांमध्ये दिसतात. त्यांचे म्हणणे आहे की स्ट्रक्चरल कलर्समध्ये त्यांचा रस फुलपाखरांमधून आला आहे. त्यांना बालपणापासूनच एक फुलपाखरू बनवण्याची इच्छा होती. पेंटबद्दल सांगताना ते म्हणाले की, हा पेंट इतका हलका आहे की याच्या केवळ 1.3 किलो पेंटद्वारे एक बोईंग 747 विमान पूर्णपणे रंगवता येईल. तर यासाठी तब्बल 453 किलो सामान्य पेंट लागते.
सध्या प्रायोगिकच
आपल्या संशोधनाविषीय सांगताना ते म्हणाले की, त्यांना एक अशी गोष्ट बनवण्याची इच्छा होती, जी विषारी नसावी, जिच्यात थंडावा राखण्याचे गुण असावे आणि जी वजनातही खूप हलकी असेल. जसे की इतर पेंट नसतात. तथापि, सध्या हा पेंट प्रयोगशाळेतच तयार करण्यात आला आहे. व्यावसायिक वापराइतक्या प्रमाणात तयार करण्यासाठी खूप वेळ लागू शकतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.