आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Worldwide Agitation After The Death Of The Black George Floyd; Statue Smashed In Britain, Police Attacked In Germany

परिवर्तनाची मागणी:कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूनंतर जगभरात आंदोलन; ब्रिटनमध्ये पुतळा तोडला, जर्मनीत पोलिसांवर हल्ला

वॉशिंग्टन | लंडन2 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत शांतता मोर्चा, जगभरात आक्रोश, फ्लॉइड यांच्यावर आज ह्यूस्टनमध्ये अंत्यसंस्कार, जो बिडेन घेणार भेट
Advertisement
Advertisement

जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा अमेरिकेत मृत्यू झाल्यानंतर जगभरात आंदोलने सुरू झाली आहेत. अमेरिकेच्या सर्व भागांशिवाय ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, इटली, ऑस्ट्रेलिया, जपान, डेन्मार्क, नेदरलँड्स, फिनलंडमध्ये हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे जॉर्ज फ्लॉइडच्या कुटुंबाने आणि मित्रांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली आहे. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी फ्लॉइड यांच्या कुटुंबांची भेट घेणार असल्याचे सांगितले. आंदोलनात सिनेटर मिट रोमनी यांनीदेखील सहभाग नोंदवला. कर्फ्यूमध्ये सूट दिल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये शांततेसाठी मोर्चा काढण्यात आला.

मिनेपोलिस येथे पोलिस विभाग बरखास्त करण्याचा विचार :

अमेरिकेतील मिनेपोलिस नगरपालिका येणाऱ्या काही महिन्यांत पोलिस विभाग बरखास्त करू शकते. सिटी पार्कमध्ये रविवारी पालिकेच्या सदस्यांची बैठक पार पडली. यात सुरक्षेसंबंधित नवीन धोरण तयार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यादरम्यान सदस्य म्हणाले की, अनेक दशकांपासूनच्या प्रयत्नांनतरही मिनेपोलिस सुधारणार नाही हे सिद्ध झाले आहे. पोलिस विभाग बरखास्त करण्याचा आमचा विचार आहे. दुसरीकडे न्यूयॉर्कचे मेयर बिल डे ब्लासियोंनीदेखील न्यूयॉर्क पोलिस विभागाचा निधी कमी केला आहे.

जर्मनी : १५ हजार लोकांची रॅली, हिंसाचार

बर्लिनमध्ये आंदोलन केल्याने पोलिसांनी ९३ जणांना ताब्यात घेतले. यातील बहुतांश जणांना १५ हजार लोकांचा मोर्चा संपल्यानंतर ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, आंदोलकांना शहरातील अॅलेक्झांडर या ठिकाणाहून जाण्यास सांगितले होते. यानंतरही आंदोलकांनी पोलिसांवर बाटल्या आणि दगड फेकले. यात काही पोलिस कर्मचारी जखमी झाले.

कॅनडा : सलग दुसऱ्या आठवड्यात आंदोलन

कॅनडामध्ये फ्लॉइड यांच्या मृत्यूनंतरच आंदोलनाला सुरुवात झाली होती. रविवारी वर्णभेद, पोलिसांविरोधात मोर्चे काढण्यात आले. यानंतर मौन पाळून फ्लॉइड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दुसरीकडे फ्रान्समधील मार्शिले या शहरात पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आंदोलकांनीही पोलिसांवर बाटल्या आणि दगड फेकले.

नेदरलँड्स : फिजिकल डिस्टन्सिंगसह विरोध

नेदरलँड्समधील मास्ट्रिच या प्रमुख शहरातील पार्कमध्ये लोकांनी आंदोलन केले. यादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंगचेदेखील पालन करण्यात आले. याशिवाय रोममधील पीपल्स स्क्वेअर येथे शांततेत रॅली काढण्यात आली. या वेळी उपस्थित आंदोलकांनी वर्णभेदाविषयी भाषणे ऐकली. रोमशिवाय मिलानमध्येही मोर्चा काढण्यात आला. या वेळी निषेध नोंदवण्यात आला.

डेन्मार्क : अमेरिकी दूतावासाबाहेर आंदोलन

डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगनमध्ये अमेरिकी दूतावासाबाहेर १६ हजार लोकांनी रॅली काढली. पीएम मँटे फ्रॅडरिकनस यांनी या आंदोलनात सहकार्य केल्याने आंदोलकांचे कौतुक केले. दुसरीकडे स्पेनच्या बार्सिलोना आणि माद्रिदमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला. दरम्यान यावेळी पोलिसांचीही उपस्थिती होती.

लंडन : तस्कर एडवर्ड कॉल्स्टनचा पुतळा तोडून नदीत फेकला

लंडनमध्ये आंदोलकांनी १७ व्या शतकातील ब्रिटिश मानवी तस्कर एडवर्ड कॉल्स्टन याचा पुतळा तोडून नदीत फेकून दिला. यापूर्वी फ्लॉइड यांच्या मानेवर पोलिसाने ज्याप्रमाणे पाय ठेवला होता त्याचप्रमाणे या पुतळ्याच्या मानेवर पाय ठेवण्यात आला. हा पुतळा ब्रिस्टल येथे लावण्यात आला होता. कॉल्स्टन १७ व्या शतकामध्ये आफ्रिकी लोकांना अमेरिका आणि इतर देशांमध्ये विकत होता. मात्र नंतर त्याने चांगले काम सुरू केले, ज्यामुळे त्याला सन्मान मिळाला. तसेच सेंट्रल लंडनमध्ये नागरिकांनी कृष्णवर्णीयांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. आंदोलन पार्लियामेंट स्क्वेअर येथील विन्स्टन चर्चिल याच्या पुतळ्याची मोडतोड केली. यानंतर आंदोलकांनी चर्चिलच्या पुतळ्यावर ते वर्णद्वेषी असल्याचे लिहिले. यादरम्यान पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.

Advertisement
0