आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘मी शाळेत असताना आईला अंतराळ आणि अंतराळवीरांबाबत खूप प्रश्न करत होते. डॉ. कलाम यांचे पुस्तक ‘विंग्ज ऑफ फायर’नेही मला एअरोस्पेस इंजिनिअरिंगला जाण्यासाठी प्रेरणा मिळाली.’ अमेरिकी अंतराळ संस्था नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबमध्ये स्पेस सिस्टिम इंजिनिअर प्रियंका श्रीवास्तव यांनी ही गोष्ट आयआयटी गांधीनगरच्या ‘क्युरोसिटी लॅब’ कॅम्पमध्ये सायन्सचे विद्यार्थी आणि शिक्षकांना सांगितली. ते या इव्हेंटमध्ये ऑनलाइन सहभागी होत्या. प्रियंका म्हणाल्या की, त्यांनी कल्पना चावलांविषयी खूप माहिती गोळा केली आणि मोठे होऊन त्यांच्यासारखेच अंतराळवीर बनण्याचे उद्दिष्ट ठेवले.
त्या विद्यार्थ्यांना म्हणाल्या की, प्रश्न विचारायला घाबरू नये. जसजसे तुम्ही प्रश्न विचाराल तसतसा तुम्ही पद्धतशीर विचाराचा पॅटर्न जाणू शकाल. यासोबतच शिकण्याच्या प्रक्रियेत आपले वीक आणि स्ट्राँग पॉइंट लिहीत राहावे, जेणेकरून कुठे फोकस करायचा हे समजेल. या सत्रात इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीच्या चंद्रिमा
शहा म्हणाल्या की, विद्यार्थ्यांकडे खूप सारे प्रश्न असावेत, ज्याचे उत्तर शोधण्यासाठी प्रेरणा देणारे ठरतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.