आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Wuhan Corona Virus Updates: Undoing Public Life In The Viral City Of Wuhan In China; News And Live Updates

ग्राउंड रिपोर्ट:चीनमधील विषाणूचे शहर वुहानमध्ये जनजीवन पूर्ववत; सर्वत्र शांतता, बाजारपेठा फुललेल्या, वाहतूकही सुरळीत, रात्री क्रूझही जोरात

वुहान4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आधी भारतीयांमध्ये घबराट

२०२० च्या सुरुवातीला चीनच्या वुहानमध्ये काेराेना विषाणूचा संसर्ग झाल्याचे वृत्त आल्यानंतर ताे विषाणू जगभर पसरेल याची साधी कल्पनाही कुणी केली नसावी. िवषाणूने सुरुवातीला वुहानमध्ये तांडव केले. मग हळूहळू भारत, ब्राझील, ब्रिटन, अमेरिकेसह अनेक देशांत ताे पसरला आणि आतापर्यंत त्यामुळे लाखाे लाेकांना प्राण गमवावे लागले. मात्र आज वुहानमध्ये चित्र पालटल्याचे दिसते. लाेक अनेक महिने घरात कैद हाेते, हे आजची परिस्थिती पाहून मुळीच वाटत नाही. सुमारे १ काेटी १० लाख लाेकसंख्येच्या या महानगरीतील जनजीवन आता पूर्ववत झाले आहे. वुहानमध्ये अनेक दिवसांपासून नवा रुग्ण आढळलेला नाही. वुहानमध्ये लसीकरणाचा कार्यक्रमही जाेरदार राबवला. चीनमध्ये आतापर्यंत ८० काेटी डाेस देण्यात आले आहेत. २०२१ च्या अखेरीस ८० टक्के लाेकसंख्येला लस देण्याचे उद्दिष्ट आहे. चीनच्या इतर शहरांतही नागरिक सामान्य जीवन जगताना दिसतात. मात्र अजूनही लाेक मास्क घालूनच घराबाहेर पडतात.

माॅल किंवा बाजारात गेल्यावर तापमानदेखील तपासले जाते. चीनमध्ये आता काेराेना संसर्गाचे एकूण ३०० रुग्णदेखील नाहीत. त्यातही डझनावर स्थानिक रुग्ण आहेत. विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर वादाच्या केंद्रस्थानी वुहानची प्रयाेगशाळा व सीफूड मार्केट आहेत. प्रयाेगशाळा वुहान शहरातील केंद्रापासून दूर आहे. तेथे जाण्यासाठी दीड तास लागताे. तेथे कडक सुरक्षा व्यवस्थेत नियमित कामकाज सुरू आहे. हुआनान सीफूड मार्केटमध्ये विषाणू संसर्गाचा फटका पाहायला मिळाला हाेता. त्यामुळे हा बाजार गेल्या वर्षी बंद करण्यात आला हाेता. परंतु त्याच्याजवळील फळ बाजारपेठ खुली आहे. वुहानच्या मुख्य बाजारात आता वर्दळ आहे. लाेक भटकंती करताना दिसतात. आशियातील सर्वात लांब यांग्झी नदीत क्रूझदेखील सुरू झाल्या आहेत. बस, मेट्राे, रेल्वेत प्रवाशांची गर्दी दिसते.

काही लाेक विनामास्क दिसतात. गेल्या वर्षी वुहान महामारीमुळे बंद हाेते. त्याचबराेबर कडक लाॅकडाऊनमुळे टीकाही केली जात हाेती. मानवी हक्काच्या उल्लंघनाबाबतचे आराेपही झाले. चीन सरकार व प्रशासनाच्या कामाच्या पद्धतीवर जगभरातील चीनवर टीका झाली. तेव्हाचे ७५ दिवस वुहानमधील नागरिकांसाठी कठीण झाले हाेते. चीन संसर्गाला नियंत्रित ठेवेल, असे वाटले नव्हते. चीनच्या वागणुकीवर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे.

आधी भारतीयांमध्ये घबराट
वुहानमधील भारतीय याेग शिक्षक नरेश काेठारी व आशिष रावत, उद्याेजक गाेविंदा खत्री यांच्याशी चर्चा केली. महामारीच्या विराेधातील वुहान व चीनच्या यशामागील खरे कारण काय असू शकते, असे त्यांना विचारले. ते म्हणाले, कडक लाॅकडाऊन व लाेकांमधील शिस्त यातून ही गाेष्ट साध्य झाली. आम्हालाही घरी राहूनच खाद्यपदार्थ मागवावे लागत हाेते. त्याशिवाय तपासणीवरदेखील भर दिला जात हाेता. खरे तर मायदेशी जाण्याची मी तयारी केली हाेती, असे आशिष रावत यांनी सांगितले. मात्र एका मित्राने त्यांना वुहान साेडून जाऊ नकाे, असा सल्ला दिला हाेता. ताे रावत यांनी एेकला.

बातम्या आणखी आहेत...