आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Wuhan Lab Updates: Find Out Why There Is So Much Talk About The Virus Coming Out Of Wuhan's Lab; News And Live Updates

भास्कर EXPLAINER:वुहानच्या प्रयोगशाळेतून विषाणू निघाल्याची चर्चा का जोर पकडतेय जाणून घ्या

लंडन21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगभरातून पुन्हा होत आहे विषाणूच्या उत्पत्तीच्या चौकशीची मागणी
  • गुप्तचरांकडून बायडेन यांनीही मागवला 90 दिवसांत अहवाल; यामुळे भडकला चीन

कोरोनामुळे जगभरात १७ कोटींपेक्षा जास्त जण बाधित झाले तर ३५ लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले. मात्र, चीनच्या वुहानमध्ये त्याची माहिती होणे आणि जगभरात पसरल्याच्या दीड वर्षांनंतरही अखेर हा विषाणू आला कोठून याचे उत्तर मिळालेले नाही. वुहानच्या प्रयोगशाळेतून आल्याची सर्वाधिक चर्चा झाली. आता अमेरिका, ब्रिटनसह जगभरातून पुन्हा चौकशीची मागणी होत आहे. यात लॅब लीक थिअरी पुन्हा जिवंत झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी गुप्तचर यंत्रणांकडून ९० दिवसांत याबाबत अहवाल मागवला आहे, तर चीनने लॅब थिअरी पुन्हा नाकारली आहे. यामुळे ही थिअरी काय आहे आणि ती पुन्हा का चर्चेत आली, हे जाणून घेणे आवश्यक आहे.

विषाणूचा स्रोत जाणणे का गरजेचे?
पुन्हा असा िवनाश होऊ नये म्हणून आवश्यक. पशंूमधून संसर्गाची थिअरी खरी ठरली तर शेती व पशुपालनावर परिणाम होईल. फ्रोझन फूड वा लॅब लीक थिअरी खरी ठरली तर संशोधन व आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होईल. चीनबाबत दृष्टिकोनही बदलेल.

वुहान लॅब लीक थिअरी काय आहे?
कोरोना विषाणू चीनच्या वुहानमधील एका प्रयोगशाळेतून चुकीने निघाला याबाबत शंका घेतली जाते. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीचा समावेश जगातील निवडक जैविक संशोधन केंद्रांत होतो. तेथे मानवाला बाधित करणाऱ्या धोकादायक विषाणूंवर संशोधन केले जाते. ही प्रयोगशाळा पशू व गुरांच्या बाजाराजवळच आहे. याच बाजारात संसर्गाचे जगातील पहिले प्रकरण आढळले होते.

ही थिअरी जगात कशी आली?
कोरोना जगभरात पसरला आणि मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊ लागल्याने चीनवर संशय वाढला. मात्र लॅब थिअरी सुरुवातीलाच समोर आली होती. मात्र तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याला चालना दिली. त्यांनी याला चायनीज विषाणू म्हटले. जैविक शस्त्र म्हणून वापर करण्यासाठी विषाणूत बदल केले असतील, असे अनेकांचे म्हणणे होते. तेव्हा लक्ष देण्यात आले नाही, मात्र आता सर्व शंकांदरम्यान लॅब लीक थिअरीला बळ मिळत आहे.

विषाणू उत्पत्तीबाबत तज्ज्ञांना काय वाटते?
चीनच्या दौऱ्यावर गेलेल्या डब्ल्यूएचओच्या पथकाचे सदस्य प्रा. डेल फिशर यांनी सांगितले, लॅब लीक थिअरी नाकारण्यात आली नव्हती, मात्र ती सिद्ध करण्यासाठी खूप कमी पुरावे होते. ती संपलेली नाही, त्यावर आणखी संशोधनाची गरज आहे. तर वाॅर्विक वैद्यकीय शाळेचे व्हायरॉलॉजिस्ट प्रा. लॉरेन्स यंग सांगतात, वुहान लॅबमधील सर्व कागदपत्रे डब्ल्यूएचओला उपलब्ध असणे गरजेचे आहे.

लॅब थिअरी पुन्हा का आली?
याचे कारण आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी गुप्तचर अधिकाऱ्यांना चौकशीचे सांगितले आहे. ९० दिवसांत अहवालही मागितला आहे की, विषाणू चीनच्या प्रयोगशाळेतून निघाला की नाही. तर तज्ज्ञांना लॅब लीक थिअरीबाबत शंका होती तेच आता स्पष्टपणे बोलत आहेत. व्हाइट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार अँथोनी फाउची यांनी सिनेटसमाेर सांगितले की, विषाणू प्रयोगशाळेतून लीक झाल्याची शक्यता असू शकते. खरेच असे झाले का, याचा शोध घेण्याच्या बाजूने मी आहे.

लॅब लीक थिअरीच्या चौकशीबाबत ब्रिटन सरकारनेही सांगितले आहे?
ब्रिटनचे लस मंत्री नदीम जहावी यांनी सांगितले, आपण सर्वांना पुरावे गोळा करायचे असून पुन्हा काम करायचे आहे. डब्ल्यूएचओला कोणत्याही दबावाशिवाय चौकशीची परवानगी देण्यात यावी हे खूप गरजेचे आहे. हे फक्त सध्याच्याच नव्हे तर भविष्यातील महामारीसाठी जगाला सज्ज ठेवण्यासाठीही आवश्यक आहे.

चीनचे याबाबत काय म्हणणे आहे?
ही बदनामीची मोहीम असल्याचे चीनने म्हटले आहे. त्याचा दुसऱ्या थिअरीवर भर आहे. त्याचे म्हणणे आहे की, विषाणू एखाद्या आग्नेय आशियायी देशातून फ्रोझन फूडद्वारे आला असेल. त्याने वटवाघळांवर झालेल्या ताज्या संशोधनाचाही हवाला दिला आहे. तो चीनच्या प्रमुख व्हायरॉलॉजिस्ट आणि बॅटवुमन नावाने प्रख्यात प्रा. शी जेंग ली यांनी गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केला आहे. त्यांच्यानुसार २०१५ मध्ये खाणीतील वटवाघळांमध्ये कोरोना विषाणूच्या ८ प्रजाती आढळल्या होत्या. त्याच्या तुलनेत पँगोलिनमध्ये आढळलेले विषाणू मानवासाठी जास्त धोकादायक आहेत. अमेरिका आणि पश्चिमेतील देशातील माध्यमे अफवा पसरवत असल्याचा चीनचा आराेप आहे.

‘नॅचरल ओरिजिन थिअरी’ काय?
यानुसार विषाणू नैसर्गिकदृष्ट्या प्राण्यांमधून पसरतो. कोविड-१९ आधी वटवाघळांमध्ये, नंतर मानवात आला. बहुतेक तो इतर पशू किंवा ‘इंटरमीडियरी होस्ट’द्वारेही पसरला असेल. डब्ल्यूएचओच्या अहवालातही या थिअरीचे समर्थन करण्यात आले होते. मात्र त्याचे पुरावे सापडले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...