आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Animals Were Injected With The Virus In China; Genes Of More Than 1000 Animals Were Also Changed In Wuhan Lab; News And Live Updats

कोरोनाच्या चिनी कनेक्शनवर आणखी एक दावा:वुहान लॅबमध्ये एक हजार प्राण्यांच्या जनुकात बदल - ब्रिटिश पत्रकार; प्राण्यांना विषाणूचे इंजेक्शन, माकड-सशावरही प्रयोग

वुहान14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हायराॅलाॅजिस्टने काेराेना बनवल्याचा दावा

कोरोना महामारीच्या उत्पत्तीवरुन चीन जगाच्या निशाण्यावर होते. यातच आता चीनच्या वुहान लॅबमध्ये एक हजार प्राण्यांच्या जनुकात बदल करण्यात आला असल्याचा दावा करण्यात येत आहे. चीनच्या वुहान शहरातील लॅबमध्ये जनुकीय अभियांत्रिकीच्या माध्यमातून माकड आणि सशासह जवळपास 1 हजारपेक्षा जास्त प्राण्यांच्या जनुकात बदल करण्यात आला.

वुहान येथूनच संपूर्ण जगभरात काेराेना विषाणूचा संसर्ग पसरल्याचे ‘डेली मेल’ या ब्रिटनमधील वर्तमानपत्राने चीनमध्येच प्रसिद्ध झालेल्या अनेक लेेखांच्या आधारावर एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. प्राण्यांच्या जनुकात बदल करण्यासाठी त्यांना चीनच्या प्रयाेगशाळेत इंजेक्शनही देण्यात आले.

इंजेक्शनमध्ये वापरण्यात आलेल्या सामग्रीमुळे काराेना विषाणूची उत्पत्ती झाली असावी अशी शंका शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. अन्य देशांमध्ये निर्बंध असलेले प्रयाेगही चीन या प्रयाेगशाळेत करीत असल्याचे म्हटले जात आहे. जागतिक जैव तंत्रज्ञान गुंतवणुकीचा वेग वाढल्यापासून चीनचे संशाेधक प्राण्यांवर प्रयाेग करण्याबराेबरच अन्य धाेकादायक जाेखीम पत्करत आहेत. इतकेच नाही तर ते आता माणसांवरही प्रयाेग करत आहेत. पण अन्य देशांमध्ये असे प्रयाेग करणे अनैतिक मानले जाते. या प्रयोगांद्वारे व्यावसायिक नफा वाढवण्याचा चीनचा प्रयत्न सुरू आहे.

चीन लष्कराची प्रयाेगशाळेवर नजर
पीपल्स लिबरेशन आर्मी चीनच्या बहुतांश धाेकादायक प्रयाेगशाळांवर देखरेख करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. लष्कर दाेन गाेष्टींवर लक्ष ठेवून आहे. त्यातील पहिली म्हणजे जनुकात असा बदल, ज्यातून चांगले सैनिक तयार हाेतील, दुसरी अशा सूक्ष्म जिवांचा शाेध, ज्यातून नवीन जैविक शस्त्र बनवण्यात त्याचे रूपांतर हाेऊ शकेल. जग सामना करू शकणार नाही, अशी ही शस्त्रे असतील.

जिवंत प्राण्यांवर प्रयाेग सुरू
वुहान किंवा अन्य ठिकाणी असलेल्या प्रयाेगशाळा या जैव सुरक्षिततेच्या शाेधांसाठी उभारण्यात आल्याचे दर्शवण्याचा चीन प्रयत्न करत आहे. पण हे करताना प्राण्यांच्या सुरक्षेची काळजी मात्र घेतली जात नाहीये. इतकेच नाही तर टेस्ट ट्यूबमध्ये ठेवण्यातआलेले राेगकारक जीव बघून माकडे पळू लागतात. चावणे आणि ओरखडण्यासारखेही प्रकार करत आहेत. येथे असे दिसून आले आहे की, चाचणी ट्यूबमध्ये ठेवलेल्या रोगजनक जीव पाहिल्यानंतर माकडे पळण्यास सुरुवात करतात.

व्हायराॅलाॅजिस्टने काेराेना बनवल्याचा दावा
चीनच्या शिक्षणतज्ज्ञांच्या मते वुहानमधील व्हायराॅलाॅजिस्ट शी झेंगली यांनी दूरवर असलेल्या गुहांना भेट दिली हाेती. ती येथील वाटवाघळांवर संशाेधन करत हाेती. चीनमध्ये झेंगली ‘बॅट वूमन’ म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे लॅबमध्ये झेंगलीनेच काेराेना विषाणू तयार केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. झेंगलीने उंदरांवरही संशाेधन केले. तिने अनेक उंदरांना विषाणूचे इंजेक्शन दिले हाेेते.

लॅबमध्ये 605 वाटवाघळे, हल्लाही करतात
चिनी शिक्षणतज्ज्ञांनी वुहान प्रयोगशाळेबद्दल बरेच लेख लिहिले आहेत. त्यातील एकाचे नाव “कोरोनाची संभाव्य उत्पत्ती’ असे आहे. वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने आपल्या प्रयाेगशाळेत आजारी प्राणी ठेवले आहेत. त्यामध्ये जवळपास 605 वाटवाघळे आहेत. ही वाटवाघळे संशोधकांवर हल्ला करतात. काेणत्याही सुरक्षात्मक उपाययाेजना न करता संशाेधक गुहेमधून ही वटवाघळे पकडतात, असे या लेखात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...