आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडनी:एक्स-रे व्हिजनमुळे कार अपघात टाळणे शक्य; ऑटोनॉमस, मॅन्युअल दोन्ही कारसाठी लाभदायी तंत्रज्ञान

सिडनी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार चालवताना एखाद्या इमारतीमागून व्यक्ती अचानक समाेर आल्यास किंवा एखाद्या ट्रक किंवा बसमागील सायकलस्वार, पादचारी दिसले नाही तर अपघाताची शक्यता असते. आॅटाेनाॅमस कारसाठी ही गाेष्ट आणखीनच कठीण असते. ही समस्या दूर करण्यासाठी आॅस्ट्रेलिया इनाेव्हेटर्सने एक ग्राउंड ब्रेकिंग टेक्नाॅलाॅजीचा शाेध घेतला आहे. याच्या मदतीने आॅटाेनाॅमस कारमुळे हाेणाऱ्या दुर्घटनांना राेखणे शक्य हाेऊ शकते. हे नवे तंत्रज्ञान आॅटाेनाॅमस गाड्यांना एक्स-रे व्हिजन देऊ शकते. पादचारी किंवा सायकलस्वार वाहनांना ट्रॅक करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयाेग हाेऊ शकताे. रस्त्यावर अनेक गाेष्टी अस्पष्ट असतात. अशा वेळी एक्स-रे व्हिजन तंत्रज्ञान मदतीला धावून येऊ शकते. त्याला कलेक्टिव्ह तथा काे-आॅपरेटिव्ह परसेप्शन (सीपी) असे त्याला नाव देण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाच्या साह्याने इतर गाड्यांनादेखील डेटा शेअर केला जाऊ शकताे. त्यामुळे दुर्घटना राेखण्यास मदत मिळू शकेल. उदाहरणार्थ- ‘ए’ कार चाैकात उभी आहे.

दुसऱ्या बाजूने येणाऱ्या पादचाऱ्याला ही गाडी पाहू शकत नाही, परंतु त्याच मार्गे येणारी ‘बी’ कार पादचारी येत असल्याची कल्पना ‘ए’ कारला देऊ शकेल. त्यामुळे ए कार सतर्क राहील. आयमूव्ह प्रकल्पांतर्गत वाहतूक कंपनी काेडा वायरलेस व सिडनी विद्यापीठाच्या टीमने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. प्रकल्पाशी संबंधित प्राे. एडुआर्डाे नाेबेट म्हणाले, हे तंत्रज्ञान मानवी चालक असलेल्या आणि आॅटाेनाॅमस अशा दाेन्ही प्रकारच्या वाहनांसाठी गेमचेंजर ठरेल. सीपी स्मार्ट वाहन परसेप्शन सेन्सर्समुळे भाैतिक व व्यावहारिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन काम करण्याची क्षमता निर्माण हाेते. प्राे. नेबाेट म्हणाले, सीपी असलेले वाहन एका माेठ्या इमारतीच्या मागून येणाऱ्या दिव्यांग व्यक्तीला ट्रॅक करण्यात यशस्वी ठरले.

दुर्घटना झाल्यास आयफाेन, घड्याळाद्वारे काॅल
अॅपलच्या आगामी आयफाेन व घड्याळात क्रॅश डिटेक्शन फीचर देण्यात आले आहे. दुर्घटना हाेताच अॅपल आयफाेन व वाॅच हेल्पलाइनला (९११) आपाेआेप काॅल जाईल. या डिव्हाइसमध्ये एक्सलराेमीटर चिप दिली जाईल. काेणत्याही प्रकारच्या असामान्य बदलाला ते सहजपणे आेळखू शकेल. अॅपलने आयफाेन व वाॅच युजर्सचा डेटा गाेपनीयपणे जमा केला आहे. त्यात एक काेटी वाहनांची माहिती घेण्यात आली आहे. त्याचबराेबर ९११ ला देण्यात आलेल्या माहितीचादेखील सविस्तर डेटा कंपनीकडे उपलब्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...