आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा सर्वाधिक संसर्गजन्य व्हेरियंट:जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ओमायक्रॉनहून 43 टक्के जास्त वेगाने पसरतो XE व्हेरियंट, ब्रिटनमध्ये आढळले 500 हून अधिक रूग्ण

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोना रुग्णांत झपाट्याने घट होत असली तरी संकट अद्याप टळले नाही. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ओमायक्रॉनचा 'XE' नामक एक नवा व्हेरियंट आढळला आहे. हा व्हेरियंट 'बीए.2' हून 10 पट जास्त धोकादायक आहे. म्हणजे तो ओमायक्रॉन व्हेरियंटहून 43 टक्के जास्त संसर्गजन्य आहे. 'एक्सई' व्हेरियंटची निर्मिती ओमायक्रॉनच्या 'बीए.1' व 'बीए.2' या दोन उप प्रकारांपासून झाली आहे.

तथापि, डब्ल्युएचओने या व्हेरियंटच्या ट्रांसमिशनमध्ये एखादा विशेष बदल दिसून येईपर्यंत त्याकडे ओमायक्रॉनचा एक उपप्रकार म्हणूनच पाहिले जाईल असे स्पष्ट केले आहे.

ब्रिटनमध्ये आढळला पहिला रूग्ण
ओमायक्रॉनच्या 'XE'व्हेरियंटचा पहिला रूग्ण 19 जानेवारी रोजी ब्रिटनमध्ये आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत या व्हेरियंटचे 600 हून अधिक रूग्ण आढळलेत. याशिवाय हा व्हेरियंट फ्रांस, डेन्मार्क व बेल्जियममध्येही आढळला आहे.

ब्रिटनमध्ये 19 जानेवारी रोजी 'XE'व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला होता.

ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा एजंसीनुसार, हा व्हेरियंट किती धोकादायक आहे किंवा त्यावर लस परिणामकारक ठरेल किंवा नाही याचा पुरेसा डेटा अद्याप उपलब्ध नाही.

भारतातील कोरोनाची स्थिती

भारतात मागील 24 तासांत कोरोनाचे 1335 नवे रुग्ण आढळलेत. यामुळे एकूण रुग्णांची संख्या 43,025,775 वर पोहोचली आहे. देशात सध्या 13,678 सक्रिय रुग्ण आहेत. तर मागील 24 तासांत 1918 जण बरे होऊन घरी परतलेत. दुसरीकडे, नव्या 52 मृत्यूंमुळे देशातील कोरोना बळींचा आकडाही 5,21,181 वर पोहोचला आहे. मागील 24 तासांत 23,57,917 जणांनी लस घेतली आहे. देशात आतापर्यंत एकूण 1,84,31, 89, 377 जणांचे लसीकरण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...