आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनच्या संसदेने शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग(६९) यांच्या तिसऱ्या कार्यकाळावर शिक्कामोर्तब केले. चिनी कम्युनिस्ट पार्टीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांची नेतेपदी निवड केली होती. तेव्हाच त्यांची राष्ट्राध्यक्षपदाच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी निवड होणे निश्चित झाले होते. यासोबत त्यांना आजीवन राष्ट्रपती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
माओ त्से तुंग यांच्यानंतर तिसऱ्यांदा राष्ट्रपती होणारे ते पहिलेच नेते आहेत. मात्र, त्यांच्या पक्षाचे संस्थापक माओ यांच्यापेक्षाही ते जास्त शक्तिशाली झाल्याचे मानले जात आहे. चीनमध्ये सत्तेचे तीन अंग, पक्ष, लष्कर, राज्यावर त्यांची संपूर्ण पकड आहे. त्यांना प्रतिस्पर्धी वा संभाव्य उत्तराधिकारी नाही. ऑक्टोबरमध्ये पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीत त्यांनी निकटवर्तीयांची वर्णी लावली. १९९० च्या दशकात पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीत ४ महिला होत्या. आता २४ सदस्यांत एकही महिला नाही.
आरोप अडचणीचे मूळ ठरवत आहे चीन संसदेच्या बैठकीत अमेरिकेवर टीका करताना त्यांनी सांगितले की, तो देश चीनची घेराबंदी करत असून दबाव बनवत आहे. चीनच्या आर्थिक संकटासाठी पाश्चिमात्त्य देश जबाबदार आहेत. संसदेच्या बैठकीत तंत्रज्ञान आणि बँकिंग क्षेत्रात नियमांच्या दुरुस्तीला मंजुरी दिली. यातून अमेरिकेशी स्पर्धा करण्याचा उद्देश आहे.
अर्थव्यवस्थेचे आव्हान काेविडमधून सावरत असणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था ढासळली आहे. झीरो कोविड धोरणावरून देशात आंदोलन झाल्यामुळे सरकार झुकावे लागले आणि नियमात शिथिलता करावी लागली. यामुळे त्यांची जगभरात नाचक्की होत आहे. अशा स्थितीत त्यांच्यासाठी आव्हाने असतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.