आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्लेषण:प्रभावी प्रतिमा निर्मितीसाठी तैवानवर हल्ला करू शकतात शी जिनपिंग

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर चीन तैवानवर हल्ला करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाचे विश्लेषण तैवानच्या नौदलाचे माजी अॅडमिरल ली सी मिन आणि वॉशिंग्टन थिंक टँक प्रोजेक्ट २०४९ संस्थेचे संचालक एरिक ली करत आहेत.

रशियाचा युक्रेनवरील हल्ल्याने तैवानसाठी धोक्याची घंटा वाजली होती. चिनी कम्युनिस्ट पार्टीने (सीसीपी) अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली तैवानवर हल्ला करण्यासाठी सैन्य तयार केले आहे. नोव्हेंबरमध्ये बीजिंगमध्ये सीसीपीच्या संभाव्य बैठकीनंतर यावर्षी तैवानविरुद्ध चीनची आक्रमकता आणखी तीव्र होऊ शकते. शी जिनपिंग यांना त्यांच्या नेतृत्वाचा समृद्ध वारसा सोडायचा आहे. त्यांनी मोठी उद्दिष्टे ठेवली आहेत. तरीही माओ झेडांग आणि डेंग सियाओ पिंग यांच्यासारख्या बड्या नेत्यांइतकी कामगिरी आणि दर्जा त्यांना मिळवता आलेला नाही. तैवान काबीज करून पक्षाच्या कोणत्याही नेत्याने आतापर्यंत साध्य केलेले नाही असे यश मिळवण्याचा प्रयत्न जिनपिंग करू शकतात. जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) मध्ये प्रचंड सुधारणा केल्या आहेत. पूर्ण युद्ध झाल्यास चिनी सैन्य तैवानच्या आखातातून हल्ला करेल. सतत क्षेपणास्त्रे डागली जातील. जनतेचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी महत्त्वाचे राजकीय आणि लष्करी तळ नष्ट करण्याचे उद्दिष्ट असेल.

चीनने बनवली विशेष शस्त्रे राष्ट्राध्यक्षांनी चीनच्या संरक्षण उद्योगाला विशेषत: अमेरिकन सैन्याला तैवानला मदत करण्यापासून रोखू शकतील अशी शस्त्रे तयार करण्याचे निर्देश दिले. अशा शस्त्रांत अचूक व प्राणघातक बॅलिस्टिक व क्रूझ क्षेपणास्त्रे, हवाई संरक्षण यंत्रणा, उपग्रहविरोधी शस्त्रे यांचा समावेश होतो. पीएलए हल्ला करण्यास तयार झाल्यावर जिनपिंग अचानक हल्ला करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...