आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या तिसऱ्या कार्यकाळावर आज अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. यासोबतच त्यांची ताकद आणखीन वाढली आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत त्यांची तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली होती. तेव्हा ते म्हणाले होते - जगाचा चीनला वगळून विकास होऊ शकत नाही आणि जगाला चीनची गरज आहे. चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या बैठकीत जिनपिंग यांच्या तिसऱ्या कार्यकाळावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
2012 पासून सत्तेवर
जिनपिंग 2012 मध्ये सत्तेवर आले होते. त्यांच्या पूर्वी राष्ट्राध्यक्ष पदावर राहिलेले सर्व नेते पाच वर्षांचे दोन कार्यकाळ किंवा 68 वर्षांचे झाल्यावर निवृत्त होत होते. 2018 मध्ये चीनने राष्ट्राध्यक्ष पदासाठी दोन कार्यकाळांची मर्यादा संपुष्टात आणली होती. यानंतर जिनपिंग आता चीनचे सर्वात शक्तीशाली नेते बनले आहेत.
माओनंतर सर्वाधिक काळ देशाचे नेते
तिसऱ्या कार्यकाळासाठीच्या नियुक्तीसोबतच जिनपिंग आता माओ त्से तुंग यांच्यानंतर देशाचे सर्वाधिक काळ नियुक्त असणारे नेते बनले आहेत. बीजिंगमध्ये नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या हजारो प्रतिनिधींनी शी यांच्या राष्ट्राध्यक्ष आणि पुढच्या पाच वर्षांसाठी सैन्य प्रमुख म्हणून नियुक्तीसाठी मतदान केले.
सर्व प्रतिनिधींचे मतदान
काँग्रेसच्या सर्व 2952 प्रतिनिधींनी जिनपिंग यांच्यासाठी एका नव्या ठरावाला मंजुरी देत मतदान केले. याआधी काँग्रेसने कार्यकाळ मर्यादेचे बंधन रद्द केल्याने जिनपिंग यांच्यासाठी आयुष्यभरासाठी शासन करण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
यावेळी हान झेंग यांची उपराष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती करण्यासाठीही प्रतिनिधींनी मतदान केले.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.