आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यमनच्या विमानतळावर बॉम्बस्फोट:केंद्रीय मंत्र्यांना घेऊन आलेल्या विमानाजवळ ब्लास्ट; आतापर्यंत 22 लोकांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

अदन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फुटीरतावाद्यांशी चर्चा करुन परतले होते मंत्री

अरबी देश यमनच्या अदन विमानतळावर बुधवारी मोठा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाच्या ठीक आधी नवीन कॅबिनेटच्या मंत्र्यांना घेऊन एक विमान आले होते. हे मंत्री विमानातून उतरताच स्फोट झाला. यादरम्यान गोळीबारही करण्यात आला. ब्लास्टमध्ये आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, विमानात पंतप्रधान मीन अब्दुल मलिक सईददेखील होते.

फुटीरतावाद्यांशी चर्चा करुन परतले होते मंत्री

यमनमध्ये मागील काही काळापासून गृहयुद्ध सुरू आहे. एका कराराअंतर्गत येथील पंतप्रधान सईद यांच्यासोबत अनेक मंत्री अदनला परतले होते. हा करार मागच्या आठवड्यात विरोधी गटातील फुटीरतावाद्यांशी झाला होता. मलिक यांच्या सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गृहयुद्धात ते बहुतेक काळ वनवासात राहिले. हे सरकार सौदी अरबची राजधानी रियाध येथून कार्यरत होते.

सौदी अरबमध्ये राहणा-या यमेनचे राष्ट्रपती अबेद रब्बो मन्सूर हाडी यांनी या महिन्याच्या सुरूवातीला मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची घोषणा केली होती. फुटीरतावाद्यांशी सुरू असलेली लढाई संपविण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल म्हणून पाहिले गेले.

बातम्या आणखी आहेत...