आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • You Have To Apply Tape To Close Your Eyes While Sleeping At Night, You Have To Blink Your Eyelids With Your Fingers! | Marathi News

रात्रीची झोप:रात्री झोपतेवेळी डोळे बंद करण्यासाठी टेप लावावी लागते, पापण्यांची बोटांनी उघडझाप करावी लागते!

लंडन7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध गायक जस्टिन बीबरने अलीकडेच सोशल मीडियावर आपली छायाचित्रे व काही व्हिडिओ शेअर केले होते. एका गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे त्यात बीबरने स्पष्ट केले होते. बीबरला झालेल्या आजाराला रामसे हंट सिंड्रोम असे संबोधले जाते. प्राथमिक पातळीवर त्याचे निदान झाले नाही तर त्याच्या गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागते. बेडफोर्डमध्ये राहणाऱ्या स्टेज मॅनेजर मॅट कार्नी यांनादेखील बीबरसारखा आजार झाला होता. मॅट म्हणाले, मी काहीतरी गूढ असलेला पहिला घटनाक्रम अनुभवला. तेव्हा कानात वेदना सुरू झाल्या. अशा प्रकारची वेदना कधीही अनुभवली नव्हती. वेदनाशामक औषधींचा काही उपयोग झाला नाही. परंतु एके दिवशी घरी जाताना माझा चेहरा एकदम लटकल्यासारखा झाला होता. दोन दिवसांत माझा चेहरा लकवाग्रस्त झाला होता. रामसे हंट सिंड्रोम एक प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन आहे. तो व्हॅरिसोला विषाणूमुळे होतो. या विषाणूमुळे चिकनपॉक्सदेखील होतो. हा विषाणू कानामधील चेहऱ्याच्या पेशींवर परिणाम करणारा असतो. त्यामुळे फेशियल पॅरालिसिस होण्याची भीती असते. त्याशिवाय व्हर्टिगो किंवा कानात घावदेखील होऊ शकतात.३३ व्या वर्षी कार्नी यांना सर्वात कठीण गोष्ट पापण्यांची हालचाल होती. विशिष्ट वेळेनंतर हातांनी पापण्या खालीवर कराव्या लागत होत्या. दर २० मिनिटाला डोळे बंद करून टेप लावावा लागत होता. हवेमुळे डोळे लगेच कोरडे पडत होते.

रामसे हंट सिंड्रोम एक लाखामागे ५ जणांना होण्याची शक्यता असते. ब्रिटनमध्ये एक वर्षात चेहऱ्याच्या पक्षाघाताचे २५ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती चार्ल्स नदुका ईस्ट ग्रिन्स्टेड क्वीन व्हिक्टोरियातील शल्यचिकित्सकांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...