आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीन दशकांपूर्वी अपहृत मुलगा आईकडे पुन्हा परतला. आपल्या स्मरणशक्तीच्या जोरावर या तरुणाने गावाचा नकाशा तयार करून तो सोशल मीडियावर अपलोड केला. यातून त्याचे आयुष्य पालटले. तो आता आपल्या कुटुंबात परतला आहे. ही घटना चीनची आहे. १९८९ मध्ये चार वर्षांच्या ली जिंगवेईचे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने मानवी व्यापारासाठी अपहरण केले होते. या व्यक्तीला टक्कल पडलेले होते. त्याने या चिमुकल्याला गावापासून १८०० किमी दूर असलेल्या ग्वांगडाँग प्रांतातील एका दांपत्यास विकले होते. त्यानंतर लीचा आपल्या कुटुंबाशी असलेला संपर्क तुटला होता. वर्षानुवर्षे लाेटली. पण लीच्या मनातून आई आणि कुटुंबाच्या आठवणी पुसल्या नव्हत्या. त्याने आपल्या पालकांना देखील अनेकवेळा खऱ्या आईवडिलांना आणि गावाला नेऊन सोडण्यासाठी विनवण्या केल्या. त्याने अनेकवेळा विनंती करूनही निर्दयी पालकांनी त्यास दाद दिली नाही. परंतु आणखी काही वर्षे लोटल्यानंतर हळूहळू त्याने एक नकाशा तयार केला. त्यात लहानपणीच्या गावाचा तपशील मांडला. नंतर त्याला कुणीतरी इंटरनेटच्या मदतीने आई व गावाचा शोध घेण्याची कल्पना सुचवली. मग त्याने रेखाटलेला नकाशा इंटरनेटवर अपलोड केला. त्यासोबत मानवी व्यापाराची करुण कहाणी देखील जोडली होती. त्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याच्या आईपर्यंत ही माहिती पोहोचली. पोटचे हरवलेले लेकरू शोधात त्यांना कळले.
डीएनए चाचणीच्या मदतीने खऱ्या आईची आेळख
व्हिडिआे शेअरिंग अॅपच्या मदतीने गाव शोधून काढल्यानंतर ली आणि त्याच्या आईची भेट गेल्या वर्षी २४ डिसेंबरला झाली. आई-मुलाच्या भेटीनंतर दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. लीने केलेल्या दाव्याच्या पडताळणीसाठी डीएनए चाचणीची मदत घेण्यात आली. त्यात दोघांचे नमुने जुळले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.