आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानोकरीतून घेतलेली विश्रांती (ब्रेक) लपवण्याची चर्चा आता जुनी झाली आहे. जनरेशन झेडची तरुण पिढी बिनदिक्कतपणे करिअर ब्रेक घेत आहे. त्यांच्या रेझ्युममध्ये ते लपवण्याचा प्रयत्नही केला जात नाही. त्याऐवजी, नियोक्त्याने याबद्दल त्यांच्याशी खुली चर्चा अशी त्यांची अपेक्षा आहे. प्रत्येकाने आपापल्या करिअरमध्ये ब्रेक घेतला पाहिजे, असे त्यांचे मत आहे. हे जीवनासाठी चांगले आहे. त्यामुळे करिअर वृद्धिंगत हाेण्यास मदत होते. त्यांचा तर्क आता कंपन्याही स्वीकारत आहेत. काही कारणास्तव कंपन्या त्यांच्या करिअरमध्ये गॅप घेणाऱ्यांपासून दूर पळत नाहीत. जेन झेड तरुणांना प्रवास, आराम व करिअरच्या चांगल्या संधी शोधण्यासाठी काही महिने किंवा कधी कधी वर्षांचा कालावधी लागतो.
नोकरदारांना पूर्वी करियर ब्रेक घेणारे लोक आवडत नव्हते. त्यामुळे कौशल्य कमी होते, असा त्यांचा विश्वास होता. ते कंपन्यांसाठी अद्ययावत किंवा विश्वसनीय नाहीत. नियोक्त्यांना वाटले की ते एका कामात जास्त काळ टिकणार नाहीत. नोकरी कधीही सोडू शकतात. म्हणूनच पूर्वीच्या कंपन्यांना असे कर्मचारी नेमायचे नव्हते, पण आता विचार व वातावरण बदलले आहे.
जॉब्ज प्लॅटफॉर्म कंपनी अप्लाइडच्या सर्वेक्षणानुसार, इंग्लंडमध्ये २५ वर्षांखालील ४७ टक्के तरुणांनी त्यांच्या नोकऱ्यांमध्ये ६ महिने किंवा त्याहून अधिक िवश्रांती घेतली आहे. तर, एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत, ३३ जणांनी त्यांच्या कारकीर्दीत असा ब्रेक घेतला आहे. लिंक्डइन सर्वेक्षणानुसार, ६२% कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कारकीर्दीत कधी ना कधी हे अंतर राखले आहे. १९७० ते २०१० या काळात दाेन नाेकऱ्यांमध्ये जास्त कालावधी ठेवण्याची प्रवृत्ती १४ पट वाढली. आता हा कल आणखी वाढला आहे. अप्लाइडच्या सर्वेक्षणानुसार, ३८ टक्के स्त्रिया आणि ११ टक्के पुरुषांनी मुलांची काळजी घेण्यासाठी करिअरमध्ये ब्रेक घेतला. २०% लोकांनी आजारपण किंवा मानसिक शांतीसाठी कामापासून काही काळ दूर राहणे पसंत केले.
नवा पैलू - ब्रेक न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपन्यांची पहिली पसंती रेझ्युम कन्सल्टिंग सर्व्हिस कंपनी रेझ्युमेगोच्या सर्वेक्षणानुसार, ज्या उमेदवारांच्या सीव्हीमध्ये अंतर दिसते, त्यांना मुलाखतींच्या संधी ४५% कमी मिळतात. अंतर नसलेल्या अर्ध्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की ब्रेक नसल्यामुळे त्यांना आत्मविश्वास वाटतो. त्यांना नोकरी मिळण्याचा आत्मविश्वास जास्त असतो. नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीच्या २०२० मधील संशाेधनानुसार जे कर्मचारी करिअरमध्ये अंतर घेतात ते अंतर न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत दीर्घकाळात ४०% कमी पगार गमावतात. करिअरमध्ये लवकर गॅप घेणाऱ्यांकडे कंपन्या संशयाने पाहतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.