आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत सध्या प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सुतारकामाचे कौशल्य असणारे तरुण मिळत नाहीत. एवढेच नव्हे तर पारंपरिकदृष्ट्या जे लोक आधीपासून हे काम करत आहेत,त्यांची मुले आता पदवीनंतर व्हाइट कॉलरची नोकरी करू इच्छितात. त्यामुळे अशी पदे रिक्त आहेत. २०२१ मध्ये संबंधित पदांसाठी ४० ते ६० लाख रु. वार्षिक वेतनाची ऑफर दिली जात असतानाची ही स्थिती आहे. ऑनलाइन भरती प्लॅटफॉर्म हँडशेकच्या आकड्यांनुसार, २०२० च्या तुलनेत २०२२ मध्ये तांत्रिक नोकऱ्या उदा. प्लंबिंग, बिल्डिंग आणि इलेक्ट्रिकल कामाची मागणी करणाऱ्या तरुणांसाठी अर्ज दरात ४९% घसरण आली आहे. ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञ, उपकरण इन्स्टॉलर आणि श्वसन चिकित्सकासारख्या पदांसाठी २०२० मध्ये सरासरी १० अर्ज आले. हे २०२२ मध्ये घटून केवळ पाच राहिले. कंपनीचे मुख्य शिक्षण धोरण अधिकारी क्रिस्टीन क्रूजवर्गारा यांच्यानुसार, प्रत्येक कामासाठी केवळ १९ अर्ज आले आहेत. दुसरीकडे तंत्रज्ञांची पदे वरचेवर वाढतच आहेत. मात्र, अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढत नाही.जुन्या कार्यबलाच्या ऑटो टेक्निशियनसारख्या व्यवसायांत यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने २०२३ मध्ये कुशल कामगारांचा मोठा तुटवडा भासण्याचा इशारा दिला आहे. क्रूझवर्गारा म्हणाले, आम्ही मुलांना कौशल्य शिकण्याऐवजी महाविद्यालयात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.
ट्रान्झिट सिस्टिम अपग्रेड करतेय सरकार, लोकांची टंचाई रिक्त पदे भरण्याची तत्काळ गरज आहे. कारण, अमेरिकी सरकार देशात रस्ते व ट्रान्झिट सिस्टिमला अपग्रेड करण्यासाठी योजनांवर अब्जावधींचा खर्च होत आहे. असे असताना लोक मिळत नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.