आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तुमचे मेसेज-फोटो अन् व्हिडिओ काहीच सुरक्षित नाही, एंड टू एंड एन्क्रिप्शन केवळ देखावा; 200 कोटी व्हॉट्सॲप युजर्सचा फेसबुककडून विश्वासघात

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रोपब्लिकाचा दावा : युजर्सचा डेटा ट्रॅक करतात १००० हून अधिक कंत्राटी कर्मचारी

‘तुमची गोपनीयता आणि सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही व्हॉट्सॲप मेसेंजरमध्ये एंड टू एंड एन्क्रिप्शन फीचर लाँच केले आहे. एंड टू एंड एन्क्रिप्ट झाल्याने तुमचे मेसेज, फोटो, व्हिडिओ, व्हॉइस मेसेज, डॉक्युमेंट, स्टेटस आणि कॉल सुरक्षित होतात आणि ते कोणी पाहू, ऐकू किंवा वाचू शकत नाही, स्वत: कंपनीही नाही...’ हा दावा फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग करत आले आहेत. पण हे पूर्णपणे खोटे आहे. व्हॉट्सॲपच्या २०० कोटींपेक्षा जास्त युजर्सना कंपनी दीर्घ काळापासून धोका देत आहे. प्रोपब्लिका या वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात हा दावा केला.

या वृत्तानुसार, व्हॉट्सॲपच्या ऑस्टिन, टेक्सास, डबलिन आणि सिंगापूरच्या कार्यालयात १००० पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी युजर्सच्या कंटेंटच्या प्रत्येक मुद्द्याची तपासणी करतात. पॉड्समध्ये संगणक घेऊन बसलेले हे कंत्राटी कर्मचारी युजरचे खासगी मेसेज, फोटो आणि व्हिडिओ स्ट्रीम करण्यासाठी फेसबुकचे विशेष सॉफ्टवेअर वापरतात. युजर्सच्या स्क्रीनवर काय फ्लॅश व्हायला हवे, हे हेच कर्मचारी ठरवतात. स्पॅम कंटेंट असो की, दहशतवादी कट किंवा चाइल्ड पोर्न, त्यासाठी त्यांना एक मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो. प्रोपब्लिकाला कंपनीचे ४९ स्लाइडचे इंटर्नल प्रेझेंटेशन मिळाले आहे. त्यात मार्केटिंग, प्रेझेंटेशन आणि गोपनीयतेच्या खोट्या प्रचारावर कसा भर द्यायचा, यावर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

‘प्रोपब्लिका’नुसार, फेसबुकने व्हॉट्सअॅप युजर्सच्या गोपनीयतेशी समझोता केला आहे, हे कंटेंटचा रिव्ह्यू करणाऱ्यांच्या तैनातीवरून स्पष्टपणे कळते. ते कायद्याचे उल्लंघन करून, आपल्या फायद्यासाठी कधीही युजरचे ट्रॅकिंग करू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, फेसबुकने २०१४ मध्ये १.३३ लाख कोटी रुपयांत व्हॉट्सॲप खरेदी केले होते. जी सेवा ग्राहकांकडून एक पैसाही घेत नाही अशा सेवेकडून नफा कसा कमावला जावा हे जाणून घेण्याचा प्रयत्न तेव्हापासूनच सुरू आहे. बहुधा युजर्सच्या गोपनीयतेशी समझोता करण्याचे हेही एक मोठे कारण असू शकते.

प्रत्येक मॉडरेटर ६०० तिकिटे पाहतो, म्हणजे एक मिनिटापेक्षाही कमी वेळ मिळतो व्हॉट्सॲपचे कंटेंट मॉडरेटर इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या मॉडरेटर्सप्रमाणेच आहेत. बहुतांश जण २० ते ३० वर्षांचे आहेत. त्यांना क्लर्क, ग्रोसरी चेकरचा किंवा कॉफी शॉपमध्ये कामाचा अनुभव असतो. त्यांना ॲसेंचरद्वारे नियुक्ती मिळते. नियुक्तीच्या वेळी कंटेंट रिव्ह्यूचे काम असल्याचे सांगतात. फेसबुकमध्ये काम करायचे आहे की व्हॉट्सपमध्ये याचा उल्लेख नसतो. त्यांना ताशी १२०० रुपये मिळतात. प्रत्येक मॉडरेटरला दिवसभरात ६०० तिकिटे पाहावी लागतात. एका तिकिटासाठी १ मिनिटापेक्षाही कमी वेळ मिळतो. अशा स्थितीत ते किती कंटेंट वाचत असतील किंवा गुणवत्तेत सुधारणा करू शकत असतील हे कळते.

बातम्या आणखी आहेत...