आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझांबिया-झिम्बाब्वे सीमेवरील 350 फूट उंच व्हिक्टोरिया फॉल्सच्या माथ्यावर पाण्यात झोपलेल्या तरुणीचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये अतिशय वेगाने कोसळणाऱ्या पाण्यावर ही तरूणी झोपलेली आहे. हा व्हिडिओ पाहूनच मनाचा थरकाप उडत असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर नागरिकांनी दिली आहे. आत्तापर्यंत हा व्हिडिओ सुमारे दोन कोटी लोकांनी पाहिला आहे.
लोकल गाईड पाय धरून ठेवतात, ज्यामुळे जीव वाचतो
धबधब्याच्या माथ्यावरती 'डेव्हिल्स पूल' नावाचा उथळ स्वरूपाचा नैसर्गिक बनलेला छोटा तलाव आहे. साहसी पर्यटनासाठी लोक या ठिकाणी येतात. ते तलावात उड्या मारतात. धबधब्याच्या टोकापर्यंत जातात आणि वाहत्या पाण्यावर झोपतात, या दरम्यान, लोक पाण्याच्या प्रवाहाने खाली पडू नयेत, म्हणून स्थानिक गाईड त्या पर्यटकांचे पाय धरून उभे राहतात.
लोक फक्त कंबरेच्या वरच्या भागाचा या माथ्याव बसून व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करतात. जे पाहून लोकांना असे वाटते की, ती व्यक्ती कोणत्याही आधाराविना अतिशय वेगात असलेल्या पाण्यात झोपलेली आहे. ज्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, तिनेही असेच काहीसे केले असावे. या धबधब्याच्या उतारावर जाण्याची परवानगी जून ते डिसेंबर दरम्यानच मिळते. जेव्हा नदीचा प्रवाह मंद आणि कमकुवत असतो.
व्हिक्टोरिया फॉल्सवरून पडून अनेकांचा मृत्यू झाला
व्हिक्टोरिया फॉल्सवरून पडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. 2021 मध्ये, नवीन वर्षाच्या निमित्ताने, झिम्बाब्वेच्या तिनाशे देकन्या व्हिक्टोरिया फॉल्सला भेट देण्यासाठी गेली होती. धबधब्याच्या काठावर फोटोशूटसाठी उभा असताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. पोलीस, हवाई दल आणि गोताखोरांच्या अथक परिश्रमानंतर त्याचा मृतदेह सापडला.
2019 मध्ये झांबेझी नदीत बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झाला होता. 2009 मध्ये एका पर्यटकाला वाचवताना एक गाईड पडून त्याचा मृत्यू झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.