आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लंडन:ब्रिटन मुस्लिम परिषदेची पहिली महिला सरचिटणीस झाली झारा; आता महिलांना घेऊन पुढे जाण्याची वेळ असल्याचे मत

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजेंडा: लसीकरणात सहभागासाठी मुस्लिमांना प्रेरित करणे

जगातील सर्वच देशांमध्ये मुस्लिम संस्थांमध्ये महिलांचा सहभाग कमीच आहे. या दिशेने इंग्लंडने दुसऱ्यांच्या तुलनेत मोठे पाऊल टाकले आहे. इंग्लंडच्या मशिदी, मदरसे आणि मुस्लिम संघटनांमध्ये सर्वात मोठी संस्था ब्रिटन मुस्लिम परिषदेने (एमसीबी) झारा मोहंमद यांना महासचिव निवडले आहे. २२ वर्षे जुन्या परिषदेत या पदावर येणारी झारा पहिली महिला आहे. २९ वर्षांची झारा व्यवसायाने प्रशिक्षण आणि विकास सल्लागार आहे. ग्लासगोत राहणारी झारा मानवाधिकार कायद्यात पदव्युत्तर पदवीधारक आहे. तिचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. सरचिटणीसपदाची निवडणूक एमसीबीच्या वार्षिक संमेलनात झाली. या पदासाठी त्यांची लढत अजमल मसरूर यांच्याशी होती. ते इमाम तसेच शिक्षक आणि प्रचारकही आहेत. लंडनचे महापौर सादिक खान यांनी सांगितले की, माझा हेतू स्पष्ट आहे. परिषद सर्वसमावेशक आणि प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने वैविध्यपूर्ण असायला हवी. चांगल्यासाठी ब्रिटिश मुस्लिमांना प्रेरित करण्याची गरज आहे. यासाठी झारा यांनी सरचिटणीस होणे खूपच चांगले आहे.

महामारीचा सामना करण्यात मदत करणे पहिले काम : घोषणापत्रात झाराने आधीच म्हटले आहे की, पारंपरिक विचारांऐवजी त्या कोरोना महामारीचा व्यावहारिक तोडगा काढण्यात मदत करतील. त्यांनी सांगितले की, चुकीच्या बातम्या रोखणे आणि देशाच्या एकतेसोबत कोरोना गाइडलाइनचे पालन करण्यास मदत करणार. मुस्लिम समुदायाला कोरोनापासून वाचण्यासाठी लसीकरणात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम नक्कीच करणार.

महिला नेतृत्व करण्यात घाबरतात : झारा
झारा यांनी सांगितले, एवढी मोठी भूमिका व संस्थेला पुढे घेऊन जाण्यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी एमसीबीला धन्यवाद. संस्थेने महिलांना संधी देणे व भविष्यात त्यांच्योबत पुढे जाण्यासाठी माझ्यासारख्या तरुणीची निवड केली आहे. आता पुढे जायची गरज आहे. महिलांमध्ये योग्यता असली तरी कधी कधी नेतृत्वाच्या भूमिकेत संकोच करतात. परिषदेच्या कामात वैविध्याच्या दृष्टीने युवक, विशेषत: महिलांचा सहभाग आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...