आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान:इम्रान यांचा पक्ष फोडण्यासाठी झरदारी लाहाेरमध्ये मुक्कामी ; नॅशनल असेंब्लीतून बाहेर पडण्याची धमकी

इस्लामाबाद / नासिर अब्बास3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात आगामी काळात बदलत्या ऋतूनुसार राजकीय वातावरणही तापलेले दिसू शकते. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पीटीआयशासित राज्यांतील विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राने सार्वत्रिक निवडणूक घ्यावी अशी मागणी इम्रान यांनी सातत्याने केली आहे. सर्वात आधी पंजाबमधील विधानसभा विसर्जित केली जाईल, असा निर्णय इम्रान यांनी बुधवारी घेतला. दुसऱ्या टप्प्यात खैबर पख्तुनख्वाचा नंबर लागू शकताे. त्यानंतरही केंद्रातील सरकार एेकत नसल्यास पीटीआयचे खासदारही राजीनामा देतील. इम्रान खान यांची ही रणनीती त्यांच्या सर्वात माेठा डाव ठरू शकताे, असे मानले जाते.

त्यांच्यासाठी हा निर्णय लागू करणे तलवारीच्या धारेवरून चालण्याचा प्रकार ठरणार आहे. सत्ताधारी पीएमएल-एनने इम्रान यांच्या सहकारी पक्षांतील नेत्यांशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली. पंजाबमध्ये पीटीआय-पीएमएल-क्यू साेबत आघाडी सरकार चालवत आहे. इम्रान यांची साथ साेडून आमच्यासाेबत सरकारमध्ये सामील हाेण्याचे आमिष पीएमएलचे नेते देत आहेत. पीटीआयच्या खासदारांशीही चर्चा सुरू आहे. फाेडाफाेडीचे कसब असलेले माजी राष्ट्रपती आसिफ झरदारी या कामासाठी लाहाेर मुक्कामी आहेत. त्यांच्याकडे इम्रान यांच्या सहकाऱ्यांना फाेडण्याचे टास्क देण्यात आलेले आहे. राजकीय विश्लेषक नजम सेठी म्हणाले, इम्रान यांनी आपले सर्व राजकीय कार्ड खेळले आहेत. या वेळी मात्र हे कार्ड (विधानसभा भंग करणे) चालल्यास ते गेमचेंजर ठरेल. परंतु हा मार्ग सोपा नाही.. लष्करप्रमुख हे शरीफ यांचे निकटवर्तीय आहेत. म्हणूनच लष्करही पीएमएल-एनच्या समर्थनात उतरू शकते.

निवडणूक आयाेगाची इम्रान यांना हटवण्याची तयारी पाकिस्तानच्या निवडणूक आयाेगाने इस्लामाबाद उच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार ताेशखाना प्रकरणात इम्रान यांनी पीटीआय अध्यक्ष पदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आयाेगाचे प्रमुख माेहंमद अर्शद म्हणाले, पुढील सुनावणी २० डिसेंबरला हाेणार आहे. इस्लामाबादच्या अन्य एका जिल्हा व सत्र न्यायालयाने देखील इम्रान यांच्या विराेधात ताेशखाना प्रकरणी निवडणूक आयाेगाच्या याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला आहे.

माजी पंतप्रधान आपल्या खाेट्या वक्तव्यांतून सरकारवर दबाव आणू इच्छितात. इम्रान सत्तेवर येण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. परंतु आम्ही त्यांना यशस्वी हाेऊ देणार नाही. इम्रान खान यांना खराेखरच लवकरच निवडणूक हवी असल्यास त्यांनी आधी पंजाब व खैबर पख्तुनख्वामधील विधानसभा विसर्जित करून दाखवावी. - अयाज सादिक, केंद्रीय न्यायमंत्री

पाक सरकार इम्रान यांना चर्चेचे निमंत्रण देऊ शकते राजकीय वातावरण इम्रान खान यांच्या बाजूने आहे, असे विश्लेषकांना वाटते. त्यांना लाँग मार्चमुळे लाभ झाला. गाेळी लागल्याने सहानुभूतीही िमळाली. त्यांची स्थिती मजबूत आहे. शाहबाज सरकार मात्र तुलनेने कमकुवत दिसते. म्हणूनच सरकार त्यांना चर्चेसाठी निमंत्रण देऊ शकते. ५-६ महिन्यांत निवडणूक घेण्यासाठी इम्रान यांचे मन वळवले जाऊ शकते.

पीटीआय नेते म्हणाले, आधी विकासकामे पू्र्ण हाेऊ द्या.. पीटीआयच्या अनेक खासदारांनी इम्रान यांच्या निर्णयावर गंभीर चिंता व्यक्त केली. विधानसभा विसर्जित करण्याच्या अगाेदर विकास कामाच्या याेजना नीटपणे राबवाव्या. पंजाब सरकारने अनेक क्षेत्रातील विकास कामांसाठी अब्जावधी रुपयांचे टेंडर काढले आहेत. अनेक याेजना अंतिम टप्प्यात आहेत. तसे झाल्यास या याेजना ठप्प हाेतील, असा खासदारांचा तर्क आहे.

सतर्क : अंतिम शिक्कामाेर्तब करण्यापूर्वी सहकाऱ्यांना विश्वासात घेतले, पंजाब सीएमचे पाठिंब्याचे आश्वासन माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी विधानसभा विसर्जित करण्यापूर्वी आपले सहकारी व खासदारांची भेट घेऊन चर्चा केली हाेती. इम्रान यांच्या निर्णयावर पीएमएल-क्यूचे पंजाबचे मुख्यमंत्री चाैधरी परवेज इलाही यांनी चिंता व्यक्त केली आहे. परंतु पीटीआयच्या काेणत्याही निर्णयाला आमचा पाठिंबा असेल. वास्तविक या निर्णयावर पक्षात एकमत दिसत नाही. पक्षातील एका गटाने इम्रान यांच्या निर्णयावर नापसंती व्यक्त केली आहे. पीएमएल-एन या नाराज गटाला आपल्याकडे ओढण्याच्या प्रयत्नात आहे. दिशाभूल झालेल्या मित्रांना परत आणण्याचे काम करत असल्याचे सूचक वक्तव्य झरदारी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...