आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागत 24 फेब्रुवारी रोजी सुरू झालेले रशिया-युक्रेनचे युद्ध अद्याप सुरू आहे. या युद्धावर चर्चा करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांची भेट घेतली. एका संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी युक्रेनला यूरोपियन संघात सहभागी होण्यासाठी कोणत्याही कराराची गरज नसल्याचे स्पष्ट केले.
दुसरीकडे, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनच्या मदतीसाठी जवळपास 3.11 लाख कोटींची (40 अब्ज डॉलर्स) वाढीव मदत करण्याची घोषणा केली आहे. तसेच ते युक्रेनला 20 अब्ज डॉलर्सची लष्करी मदतही करणार आहेत. यात युद्धग्रस्त देशाला अनेक अत्याधूनिक यंत्र सामग्री पुरवण्यात येईल. यापैकी 8 अब्ज डॉलर्सचा निधी सर्वसामान्य आर्थिक मदतीसाठी असतील. तर 5 अब्ज डॉलर्स युक्रेन संकटामुळे जगभरात निर्माण झालेल्या अन्नधान्याचे संकट दूर करण्यासाठी असतील. 1 अब्ज डॉलर्सचा निधी शरणार्थींसाठी राखीव असेल.
तत्पूर्वी शुक्रवारी अमेरिकन परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी जगभरातील अन्नधान्याचा तुटवडा दूर करण्यासाठी 2.3 अब्ज डॉलर्सचा निधी देण्याची घोषणा केली होती.
पुतीन म्हणाले -रशियावर होत आहेत सायबर हल्ले
रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी पाश्चिमात्य देशांकडून रशियावर सायबर हल्ले होत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले -रशिया पाश्चिमात्य देशांचे सायबर हल्ले यशस्वीपणे परतावून लावत आहे.
रशियाने फिनलँडचा गॅस पुरवठा रोखला
रशियाने शनिवारी शेजारच्या फिनलँडला करण्यात येणाऱ्या गॅसच्या निर्यातीवर बंदी घातली. फिनलँडने काही दिवसांपूर्वीच नाटोत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर पुतीन यांनी ही कारवाई केली आहे. नाटोत गेल्यामुळे रशियाचा तिळपापड होणार असल्याची कल्पना फिनलँडला यापूर्वीच होती.
जेव्हा एक युक्रेनी महिला म्हणाली -स्टॉप रेपिंग अस
फ्रान्समध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू आहे. शनिवारी या सोहळ्यात अचानक एक महिला रेड कार्पेटवर येऊन टॉपलेस झाली. यावेळी ती आमच्यावरील बलात्कार थांबवा असे जोरजोरात ओरडत होती. या महिलेचे संपूर्ण अंग युक्रेनच्या झेंड्याने रंगले होते. ती कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध करत होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.