आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगासमोर युक्रेनची कैफियतही मांडली:युद्धकाळात झेलेन्स्कींच्या पत्नीची मुले-महिलांच्या छावण्यांना भेट

वाॅशिंग्टन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा आेलेना झेलेन्स्की पती व दाेन मुलांसह राष्ट्रपती भवनात हाेत्या. प्रथम नागरिक असतानाच ओलेना लेखिका, संपादकही आहेत. त्यांनी जीवनभर एेषाेराम केला. परंतु युद्ध सुरू झाल्यावर मात्र त्यांनी युक्रेनच्या वेदना जगाला सांगण्याचा आणि लाेकांचा आवाज जगभर पाेहाेचवण्याचे प्रयत्न केले.

या युद्धामुळे ओलेना यांच्या आयुष्यातही बदल झाले. नेहमी पतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या ओलेना यांनी सामान्यांच्या समस्यांना वाचा फाेडली. रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सामान्य नागरिक व सैन्याच्या मदतीने रशियाचा सामना केला जाईल, असे जाहीर केले हाेेत. त्यावर ओलेना यांनी पतीला साथ देण्याचे ठरवले. युद्धात लाखाे महिलांनी शस्त्रे हाती घेतल्यानंतर ओलेना झेलेन्स्की यांनी राजकारण व कूटनीतीची धुरा सांभाळली. त्यामुळे पश्चिमेेकडील देशांकडून मदत मिळेल, अशी त्यांना अपेक्षा हाेती. झेलेन्स्की अलीकडेच वाॅशिंग्टन भेटीवर हाेत्या. तेथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन व पत्नी डाॅ. जिल बायडेन यांची भेट घेतली. या दाैऱ्यात त्यांनी काँग्रेसला मार्गदर्शनही केले.

युद्धात फोटोशूट केल्यावर दांपत्यावर टीकाही

युद्धाच्या प्रत्येक आघाडीवर नेहमी पुढे राहणाऱ्या झेलेन्स्की दाम्पत्याला एका मासिकासाठी केलेल्या फोटोशूटमुळे टीकेलाही तोंड द्यावे लागले. त्यांना सोशल मीडियातून ट्रोल केले जात आहे. युद्धकाळात एखादा राष्ट्रपती पत्नीसह ग्लॅमरसाठी वेळ कसा काढू शकतात? असा प्रश्न लोकांनी विचारला आहे.

बातम्या आणखी आहेत...