Home >> International >> Other Country

Other Country News

 • केपटाउन - दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरात फक्त 92 दिवस चालेल इतकेच पाणी शिल्लक आहे. पाण्याच्या कमतरतेने येथे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही, तर येथील पाण्याची पातळी 13.5% पर्यंत घसरण्याची भिती आहे. यानंतर घरांमध्ये पुरवठा केले जाणारे पाणी बंद केले जाईल. लोकांना सार्वजनिक ठिकाणी एका रांगेत उभे राहून पाणी भरावे लागणार आहे. 200 केंद्रांवर मिळणार पाणी - प्रशासनाने 21 एप्रिल रोजी झीरो डे घोषित केला आहे. या तारखेनंतर लोकांच्या घरात पाणी पुरवठा बंद होईल. - शहरात 200...
  05:08 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - जगभरात आज (22 मार्च) वर्ल्ड वॉटर डे साजरा केला जात आहे. जगातील अनेक देश जल संकटाला सामोरे जात आहेत. काही ठिकाणी तर लोकांना पिण्याचे पाणी देखील उपलब्ध होत नाही. अशा देशांमध्ये आफ्रिकन देशांची नावे सर्वात पुढे आहेत. तरीही येथील लोकांनी जगण्याचे मार्ग शोधून काढले आहेत. आफ्रिकेत ठिक-ठिकाणी वॉटर टॉवर लावण्यात आले आहेत. या टॉवरच्या माध्यमातून हवेपासून पाणी तयार केले जाते. इटलीचे इंडस्ट्रियल डिझायनर अर्तुरो व्हिटोरी यांनी ते तयार केले आहे. असे काम करते हे टॉवर... - आफ्रिकेसाठी...
  04:56 PM
 • लंडन - फेसबुक डेटा लीकचा खुलासा करुन जगभरात खळबळ उडवून देणारा ख्रिस्तोफर वायली (28) सध्या वैश्विक मीडियामध्ये ट्रेंड करत आहे. ब्रिटीश कंपनी केम्ब्रिज अॅनालिटिकामध्ये वायली रिसर्च हेड पदावर कार्यरत होता. या पदावर असताना त्याने सायकोलॉजिक प्रोफायलिंग सिस्टम डेव्हलप केली होती. द ऑब्जर्व्हरला दिलेल्या मुलाखतीत वायलीने सांगितले आहे, की केम्ब्रिज अॅनालिटिकामध्ये जॉइन होण्यापूर्वी थोडाही अंदाज आला नव्हता की आपण एका महाजालात अडकत चाललो. तो म्हणाला, केम्ब्रिज अॅनालिटिका जॉइन करण्याचा आता...
  04:14 PM
 • पॅरिस - फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांची भ्रष्टाचार आणि पैश्यांच्या अपहार प्रकरणी तब्बल 2 दिवस कसून चौकशी झाली. फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस प्रश्न विचारून बुधवारी सोडले आहे. त्यांनी 2007 मध्ये झालेल्या फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत प्रचारासाठी मुअम्मर गद्दाफीकडून घेतलेला पैसा वापरला होता असे आरोप आहेत. 63 वर्षीय सार्कोझी यांनी चौकशीमध्ये आपल्यावर लावलेले आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. काय म्हणाले सार्कोझी......
  03:53 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - इराकमध्ये मोसूल शहराला जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना ISIS ने आपली राजधानी केले होते. याच ठिकाणी त्यांनी 39 भारतीय नागरिकांचा नरसंहार केला. तीन वर्षे दहशतवाद्यांच्या तावडीत राहिलेल्या इराकच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरास 9 महिन्यांपूर्वी आयसिसमुक्त करण्यात आले. इराकच्या स्पेशल फोर्सेसने ताबा मिळवल्यानंतर शहरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. त्यावेळी, दबा धरून बसलेल्या शेकडो दहशतवाद्यांना पकडून रस्त्यावर आणले. त्यापैकी काहींचे कपडे काढून धिंड देखील काढण्यात आली....
  12:58 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - सौदी अरेबियाचे राजा राहिलेले किंग फहाद बिन अब्दुल अजीज अल सौद यांची 16 मार्च रोजी जयंती होती. त्यांनी 1982 ते 2005 पर्यंत सौदीवर राज्य केले. किंगडममध्ये पायाभूत कायदे लागू करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. तरीही, सीक्रेट पत्नी आणि इतर प्रकरणांमुळे त्यांचे नाव वादांमध्ये जोडले गेले. त्यांनी ब्रिटनची झॅनान हर्ब हिच्याशी सीक्रेट विवाह केला होता. पण, ती एका ख्रिस्ती कुटुंबातून असल्याने जगाला या लग्नाबद्दल सांगितले नाही. तीन वेळा करायला लावला गर्भपात - पॅलेस्टीनमध्ये जन्मलेली आणि...
  12:44 PM
 • वॉशिंग्टन - फेसबूकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग (33) यांनी गुरुवारी म्हटले की, यूझर्सच्या डेटा सिक्रसीबाबत माझ्या कंपनीने चूक केली. लोकांच्या खासगी डेटाचा गैरवापर रोखण्यासाठी पावले उचलली जातील. सुमारे 5 कोटी फेसबूक यूजर्सचा डेटा चोरून अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत गैरवापर गेल्याच्या खुलाश्यानंतर अमेरिकेच्या राजकाणातील भूकंप भारतापर्यंत पोहोचला. कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आरोप केला की, 2019 च्या निवडणुकी जिंकण्यासाठी काँग्रेस डेटा चोरीचा आरोप असलेल्या रिसर्च फर्म...
  12:13 PM
 • न्यूयाॅर्क - महिलेचे लैंगिक शोषणाच्या एका जुन्या प्रकरणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आता खटला चालणार आहे. न्यूयॉर्कच्या न्यायालयाने या प्रकरणात राष्ट्राध्यक्षांविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. राष्ट्राध्यक्ष असले तरीही ते कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाहीत असेही कोर्टाने म्हटले आहे. 43 वर्षीय समर जेर्व्होस यांनी ट्रम्प विरोधात बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप लावला आहे. ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावणारी समर एकटी महिला नाही. त्यामुळे,...
  10:54 AM
 • काबूल- अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका मजारीजवळ झालेल्या बाँबस्फोटात २९ जणांचा मृत्यू झाला, तर ५२ लाख जखमी झाले. पारसी समुदायाचे लोक नवरोज साजरा करण्यासाठी जमले असताना हा हल्ला झाला. काबूल विद्यापीठ व अली आबाद रुग्णालयादरम्यानच्या गर्दीत झाला. याच परिसरात अल्पसंख्याक शिया समुदायाचे धार्मिक स्थळही आहे. येथे बाँबस्फोटावेळी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या धार्मिक स्थळावरील हा सात वर्षांतील तिसरा हल्ला आहे. अगोदर २०१६ मध्ये झालेल्या हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू झाला होता. सध्या...
  05:50 AM
 • यांगून- म्यानमारचे राष्ट्रपती आणि स्टेट कौन्सिलर आंग सान स्यू की यांचे विश्वासू सहकारी असलेल्या हातीन क्वा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या २ वर्षांपासून ते या पदावर होते. म्यानमार राष्ट्रपती कार्यालयाच्या फेसबुक पेजवर त्यांच्या राजीनाम्याची घोषणा करण्यात आली. आपल्याला विश्रांतीची गरज असल्याचे ७१ वर्षीय हातीन क्वा यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांना उपचारासाठी परदेशी जावे लागत आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा सादर केला असावा, असा अंदाज काही राजकीय नेत्यांनी...
  05:48 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - हे छायाचित्र ग्रीनलंडची राजधानी नूक येथे बनवल्या जाणाऱ्या जगातील सर्वात आधुनिक तुरुंगाचे आहे. विशेष म्हणजे, ही जेल एक खुले तुरुंग असून त्याला एन अॅनस्टेलट असे नाव देण्यात आले आहे. 2019 मध्ये जेल पूर्णपणे तयार होणार आहे. या तुरुंगात तीन स्टेज सुरक्षा यंत्रणा आहे. येथे सुरक्षा रक्षकांना बंदूक ठेवून पहारा देण्याची गरज भासणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे, यात कैद्यांना सुधरण्याची संधी दिली जाणार आहे. ते या तुरुंगातून एकटेच बाहेर ये-जा करू शकतील. - 86 हजार चौरस फुटांत...
  12:04 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - इंग्लंडमध्ये एका वयोवृद्ध दांपत्याची आयुष्यभराची कमाई, त्यांचे स्वतःचे घर पाण्यात वाहून गेले. 64 वर्षीय पॉल रे यांनी आपल्या निवृत्तीनंतर आयुष्यभराच्या सेव्हिंग्समधून एक घर बनवले. हे घर त्यांनी स्वप्नातील घर म्हणून सागरी किनाऱ्यावर बांधले होते. पण, या घराचा निम्माहून अधिक भाग सागरी किनाऱ्यावर खसकणाऱ्या माती आणि वाळूसह वाहून गेला आहे. हायटाइड (सागरातील उंच लहरी) मध्ये केवळ रे यांचेच नव्हे, तर त्यांच्यासह इतर 13 जणांचीही घरे वाहून निघाली. - ही घटना इंग्लंडच्या नॉरफ्लॉक...
  March 21, 03:56 PM
 • काबूल - पारशी नववर्षाच्या आनंदामध्ये असलेल्या नागरिकांना स्फोटाने हादरवून सोडण्याचा प्रकार काबूलमध्ये घडला आहे. अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये झालेल्या या आत्मघातकी स्फोटात 26 नागरिक ठार झाले असल्याची माहिती मिळाली आहे. तर 18 जखमी असल्याचेही समोर आले आहे. अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बुधवारी शहरामध्ये पर्शियन नववर्षाचा उत्सव साजरा करण्यासाठी हजारो नागरिक जमलेले होते. विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते....
  March 21, 03:20 PM
 • नायरोबी - जगातून डायनोसॉर प्रजातीचा अंत झाला तेव्हा माणसाला त्याची जाणीव नव्हती असे म्हटले जाते. पण, आधुनिक जगात इतका पुढारलेला असतानाही माणूस आणखी एका जनावराच्या प्रजातीचा अंत होताना फक्त पाहत होता. जगातील एकमेव अशा पांढऱ्या नर गेंड्याने केन्यातील अभायरण्यात शेवटचा श्वास सोडला. त्याच्या मृत्यूसह या पृथ्वीतलावरून व्हाइट ऱ्हायनो प्रजातीचाही अंत झाला आहे. केन्यातील ओआय पेजेटा अभयारण्यातील अधिकाऱ्यांनी बुधवारी ही दुखद वार्ता जगाला दिली. सुदान असे नाव असलेला हा गेंडा 45 वर्षांचा...
  March 21, 02:32 PM
 • वॉशिंग्टन - यूरोपीयन संघाने फेसबूक यूझर्सच्या खासगी माहितीच्या चोरी प्रकरणी फेसबूक विरोधात चौकशीची तयारी सुरू केली आहे. तर अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने अशा प्रकारची चौकशी सुरू देखील केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत फेसबूक आणि ट्रम्प यांच्या प्रचार संस्थेने 5 कोटी लोकांची खासगी माहिती चोरून त्याचा प्रचारासाठी दुरुपयोग केला असे आरोप आहेत. निवडणुकीत केम्ब्रिज अॅनलेटिका या संस्थेने ट्रम्प यांच्या प्रचारासाठी करार केला होता. त्याच कंपनीची सध्या चौकशी सुरू आहे. ही...
  March 21, 11:53 AM
 • बीजिंग - चीनच्या हेनान प्रांतात राहणारी लिऊ येलिन सध्या सोशल मीडियावर धूमाकूळ घालते आहे. तिने नुकतेच बर्फाळ भागात केलेला फोटोशूट इंटरनेटवर व्हायरल होत आहे. तिच्या फिटनेसबद्दल लोक चर्चा करत आहेत. विशेष म्हणजे, ती काही विशी किंवा तिशीतली मॉडेल नसून 51 वर्षांची आजीबाई आहे. या वयातही आपले फिटनेस मेनटेन करणारी लिऊ इंटरनेटवर आपल्या लाखो चाहत्यांना सल्ले देते. तिने आपल्या चिरतरुण सौंदर्याचे रहस्य देखील उलगडले आहे. हे आहे तिच्या चिरतारुण्याचे रहस्य... लिऊने आपल्या वीबो सोशल मीडियावर...
  March 21, 10:57 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - 2003 मध्ये अमेरिकेने इराक विरोधात युद्ध पुकारले. इराकचे नेते सद्दाम हुसैनवर अण्वस्त्र आणि रासायनिक शस्त्र बाळगल्याचे आरोप लावून अमेरिकेने सुळावर चढवले. पण, गेल्या 15 वर्षांपासून इराकमध्ये रासायनिक शस्त्र आणि शांतता दूर-दूर पर्यंत सापडलेले नाहीत. 20 मार्च रोजीच अमेरिकेने आपल्या सहकाऱ्यांसोबत इराकवर पहिला हल्ला केला होता. याच युद्धाच्या वेळी इटलीचे प्रसिद्ध फोटोग्राफर फ्रँको पगेटी यांनी युद्धग्रस्त क्षेत्रांमध्ये 6 वर्षे घालवली. तसेच तेथील क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपले....
  March 21, 10:25 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना आयसिसची सेक्स स्लेव्ह असणे काय असते हे या पीडित महिलेने सांगितले आहे. धर्माच्या आड जगभर दहशत पसरवणाऱ्या नराधमांना महिला सजीव आहेत याची मुळीच जाणीव नाही. इराकच्या सिंजर प्रांतात आयसिसच्या दहशतवाद्यांनी हजारो यझिदी महिलांचे अपहरण करून त्यांना सेक्स स्लेव्ह बनवले. त्यांना वेग-वेगळ्या घरांमध्ये ठेवून सेक्स स्लेव्हचे आयडी कार्ड देण्यात आले होते. वाट्टेल तो दहशतवादी वाट्टेल त्या महिलेवर बलात्कार करायचा. विरोध करणाऱ्या आणि पळून...
  March 21, 10:24 AM
 • बीजिंग - चीनने ज्या भूप्रदेशांवर दावा सांगितला आहे त्यातील इंचभर भूमीसाठीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी रक्तपात करावा लागला तरीही चीन सज्ज आहे. इतरांनी तसे सज्ज राहावे, अशा शब्दांत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनने इशारावजा धमकी दिली आहे. राष्ट्राध्यक्षपदी आजीवन राहण्याची सोय करून घेतल्यानंतर जिनपिंग यांचे हे पहिलेच आक्रमक वक्तव्य आहे. नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये जिनपिंग यांनी ३० मिनिटांचे भाषण केले. त्यात त्यांनी ही भूमिका मांडली. ग्रेट चीनचे स्वप्न आपण उराशी...
  March 21, 06:08 AM
 • आबुजा - पश्चिम आफ्रिकेतील नायजेरियामधील एका शहरात दहशतवादी संघटना बोको हरमने ११० शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण केले. याबाबतची शक्यता अगाेदरच व्यक्त करण्यात आली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे दहशतवाद्यांनी अपहरण केले. डापची भागात १९ फेब्रुवारी रोजी ११ त १९ वर्षीय शालेय विद्यार्थ्यांचे बोको हरमच्या दहशतवाद्यांनी सामूहिक अपहरण केले होते. २०१४ मध्ये चिबोक शहरातून २७६ विद्यार्थ्यांचे सामूहिक अपहरण झाल्यानंतर नायजेरियात बोकोहरमच्या कारवायांवरून जागतिक...
  March 21, 02:52 AM
 
जाहिरात

RECOMMENDED