जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Other Country

Other Country News

 • इसिसविरोधात झाली शेवटची कारवाई - सिरियाच्या पूर्वेकडील डीर-अल-जोर भागात निर्वासितांच्या शिबिरांना लक्ष्य बनवून सातत्याने हल्ले करण्यात आले. - अमेरिकी राष्ट्रपती ट्रम्प म्हणाले की, आमच्या सैन्याने इराक व सिरियाचे १००% भाग दहशतवादमुक्त केले आहेत. - सिरियात कुर्द बंडखोरांशी २०११ मध्ये सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत ३.६० लाखांहून जास्त लोक मारले गेले आहेत. दमास्कस- सिरियात अमेरिकेने इसिसच्या खात्म्यासाठी शेवटच्या टप्प्यातील हल्ला केला आहे. मंगळवारी अमेरिकेचे पाठबळ असलेल्या...
  February 13, 09:45 AM
 • बुडापेस्ट- हंगेरी हा युरोपातील देश घटती लोकसंख्या आणि प्रवाशांच्या वाढत्या संख्येने त्रस्त आहे. देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी पंतप्रधान ने व्हिक्टर ऑर्बन यांनी नव्या धोरणाअंतर्गत महिलांना अनेक सवलती देण्याची घोषणा केली. व्हिक्टर म्हणाले की, चारपेक्षा जास्त मुले झाल्यावर महिलांना आयुष्यभर प्राप्तिकर द्यावा लागणार नाही. ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना पहिल्यांदा लग्न केल्यावर २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी मिळेल. तिसरे मूल होताच तिचे कर्ज माफ होईल. त्याशिवाय जे लोक...
  February 12, 10:08 AM
 • न्यूयॉर्क- अमेरिकेत राहणारा विल्यम गेलेघर काही दिवसापूर्वीच हत्येच्या गुन्ह्यात २० वर्षाची शिक्षा भोगून तुरुंगातून सुटला होता. इतर कैद्याप्रमाणे त्यालाही नव्याने आयुष्य सुरू करण्याची इच्छा होती. परंतु बाहेरच्या जगाशी जुळवून घेणे त्याला इतके अवघड झाले की, पुन्हा चोरी करून तुरुंगात परतणेच त्याला योग्य वाटले. न्यू जर्सीच्या तुरुंगातून सुटलेला विल्यम पुन्हा चोरी करण्याच्या उद्देशाने यावेळी चोरी करण्यासाठी विस्कोंसिनला गेला. कारण त्याला कोणीतरी सांगितले होते की, या परिसरातील...
  February 12, 10:06 AM
 • माद्रिद- स्पेनमध्ये बायो-इंजिनिअरींगचा विद्यार्थी डेव्हीड अगिलर (१९) याने लेगो विटांपासून स्वत:साठी कृत्रिम हाथ बनवला आहे. अनुवंशीक कारणामुळे डेव्हीडला जन्मापासून डावा हात नाही. मित्रांनी लेगो विटा आणून दिल्यानंतर जवळपास एका वर्षात मी रोबोटिक हात बनवल्याचे डेव्हीड सांगतो. इलेक्ट्रीक मोटारचा वापर करून सांध्यापासून हाताची हालचाल करता येते. तसेच विविध वस्तू पकडता येतात. बालपणी इतर मुलांपेक्षा वेगळा असल्याने मी खूप निराश व्हायचो; पण स्वप्न पाहणे मी कधी थांबवले नाही आणि अखेर हात...
  February 11, 10:43 AM
 • लंडन- ब्रिटनमधील एका महिलेने ३३ वर्षांपूर्वी १० पाऊंडमध्ये (९२५ रुपये) एक नकली हिऱ्याची अंगठी विकत घेतली होती. परंतु प्रत्यक्षात ही अंगठी खरोखरच्या हिऱ्याची असून याची किंमत ६ कोटींवर असल्याचा उलगडा झाला. ५५ वर्षांच्या डेब्रा गोडार्ड यांना हिऱ्याच्या अंगठीचा मोह असल्याने त्यांनी नकली हिऱ्याची अंगठी घेतली. पण डेब्रा ज्वेलर्सने त्यांना ही अंगठी खरी असल्याचे सांगितले. २६.२७ कॅरेटच्या हिऱ्याची ही अंगठी होती. त्यांचा विश्वास बसत नव्हता त्यामुळे त्या हिरे व्यापाऱ्याकडे गेल्या व त्याने...
  February 11, 10:39 AM
 • दुबई- अबुधाबी प्रशासनाने इंग्लिशनंतर हिंदीला न्यायालयाच्या तिसऱ्या अधिकृत भाषेचा दर्जा देऊन न्यायालयीन कामकाजात तिचा समावेश केला आहे. हिंदी भाषिक लोकांपर्यंत न्याय पोहोचवणे सुलभ व्हावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. अबुधाबीच्या न्याय विभागाचे (एडीजेडी) सचिव युसूफ सईद अल अब्री याबद्दलची माहिती दिली. अरबी, इंग्लिश व हिंदी भाषेला न्यायदान प्रक्रियेतील भाषेच्या माध्यमांत स्थान दिले आहे. यांनी सांगितले की, न्यायदानाला अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न आहे.अबू धाबी संयुक्त...
  February 11, 10:29 AM
 • नामपेन्ह- कंबोडियामध्ये वार्षिक मासेमारीचा उत्सव साजरा केला जात आहे. कंबोडियाच्या टबोंग खमूम राज्यातील चोम क्रोव्हेन कम्युनमध्ये आयोजित मासेमारी उत्सवात नागरिकांची मासे पकडण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. पूर्व कंबोडियातील या चिखलयुक्त सरोवरात शेकडो लोक बांबूची बास्केट, जाळे घेऊन आले होते. मासेमारीच्या या उत्सवात केवळ पारंपरिक पद्धतीचाच वापर केला जातो. मासेमारीची ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी कापणीच्या हंगामानंतर हा उत्सव साजरा केला जातो. नामपेन्हपासून २५० किमी अंतरावर चोम...
  February 11, 09:54 AM
 • एडन- यमनमध्ये एका चिमुरड्यावर अत्याचार करुन त्याची हत्या केल्याची घटना उघड आहे. या गुन्ह्याखाली दोन आरोपींना अटक झाली असून त्यांना सर्वांसमोर गोळी घालुन मारण्याची शिक्षा सुनवण्यात आली आहे. या प्रकरणात शरीया अदालतने एका महिलेलादेखील मृत्यूची शिक्षा सुनावली आहे. परंतू ती प्रग्नेंट असल्यामुळे तिची शिक्षा टाळण्यात आली आहे. वादाह रफत (वय 29) आणि मोहम्मद खालिद (वय 31) असे या आरोपींचे नाव असून त्यांनी एका 12 वर्षीय चिमुरड्यावर बलात्कार करुन हत्या केली होती. त्यानंतर मिलिट्रीच्या जवानांनी...
  February 10, 03:00 PM
 • लंडन- इंग्लंडमध्ये लवकरच रोबोट डिमेन्शियाने (विसरण्याचा आजार) पीडित रुग्णांवर उपचार करताना दिसणार आहेत. यासाठी त्यांना टीव्हीवरील कार्यक्रम दाखवून या आजाराची लक्षणे ओळखण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. टीव्हीवरील कार्यक्रम पाहून चेहऱ्यावरील हावभाव ओळखणारा हा पहिलाच रोबोट असल्याचा दावाही करण्यात आला आहे. या रोबोटचे नाव रॉबी असून, त्याला इमरडेल हा टीव्ही कार्यक्रम दाखवला गेला. त्यात अॅशले थॉमस नावाचे पात्र डिमेन्शियाने ग्रस्त असते. एज हील विद्यापीठाचे संगणक वैज्ञानिक डॉ.एर्डेन्डू...
  February 10, 10:33 AM
 • न्यूयॉर्क- अमेरिकेतील मॉडेल आयरिस अॅफ्फेल यांनी वयाच्या ९७ व्या वर्षी जगातील सर्वात मोठी मॉडेल मॅनेजमेंट कंपनी आयएमजीसोबत करार केला आहे. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, मला खूप आनंद झाला आहे. या वयात असे काही घडेल याची कल्पनाही केली नव्हती. सुरुवातीला मी यासाठी तयार नव्हते. पण अचानक असे काही घडले की, एका मासिकाच्या मुखपृष्ठावर माझे छायाचित्र दिसेल याचा कोणी विचारही केला नसेल. कोणत्याही व्यक्तीने निवृत्ती घ्यायलाच नको, असे मला वाटते. निवृत्ती मृत्यूपेक्षाही वाईट असते. मला काम करणे...
  February 10, 10:30 AM
 • वॉशिंग्टन- अमेरिकेतील अल्बामा येथे मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या मुस्लिम कैद्याच्या शिक्षेस शेवटच्या क्षणी स्थगिती देण्यात आली. कारण त्याला फाशीच्या ठिकाणापर्यंत आणण्यासाठी प्रशासनाने इमाम दिला नव्हता. यावरून अटलांटाच्या न्यायालयाने डॉमिनिक रे (४२) याच्या फाशीस बुधवारी स्थगिती दिली. त्याला एका १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. १९९५ मध्ये ही घटना घडली होती. रे याने तुरुंगात असताना धर्मांतर केले होते. न्यायालयाने...
  February 10, 10:25 AM
 • बँकॉक - थायलंडच्या राजकुमारी उबोलरत्न यांनी शाही परंपरा मोडीत काढून पंतप्रधान पदासाठी मार्चमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत उतरणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय झाला आहे. थायलंडचे राजा भूमीबोल अतुल्यतेज यांची मुलगी व विद्यमान राजा महा वजिरलोंग्कोर्न यांची मोठी मुलगी ६७ वर्षीय राजकुमारी उबोलरत्न यांना थाई राक्सा चार्ट पार्टीकडून (टीआरसीपी) पंतप्रधान पदासाठी उमेदवारी मिळाली आहे. या घोषणेमुळे थायलंडच्या राजेशाही कुटुंबात नवा इतिहास...
  February 9, 10:24 AM
 • वॉशिंग्टन - अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या धर्तीवर भारताचे पंतप्रधान व राष्ट्रपतींना हवाई क्षेत्रात क्षेपणास्त्रसज्ज सुरक्षा मिळणार आहे. करारानुसार भारत अमेरिकेकडून दोन बोइंग खरेदी करणार आहे. अमेरिका व भारत यांच्यात यासंबंधीच्या एका करारास मान्यता मिळाली आहे. शत्रूच्या कोणत्याही हालचालींना टिपण्याची क्षमता या विमानातील अत्याधुनिक प्रणालीत आहे. त्यामुळे पंतप्रधान व राष्ट्रपतींच्या सुरक्षा खऱ्या अर्थाने कडेकोट होणार आहे. अमेरिकेच्या प्रशासनाकडून या व्यवहारास हिरवा कंदील...
  February 8, 09:55 AM
 • वॉशिंग्टन - इस्लामिक स्टेटचे (आयएसआयएस) इराक व सिरियात आठवडाभरात समूळ उच्चाटन होईल, असा विश्वास अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. आपल्या प्रशासनाने दहशतवादी संघटनेच्या क्रूर विचारसरणीचा सामना करावयाचे ठरवले आहे, याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी या वेळी केला. इराक व सिरियात इसिसच्या ताब्यात केवळ १ टक्का जमीन आहे, असा दावा करण्यात आला आहे. गेल्या वर्षी इसिसविरुद्ध लढा पुकारण्यासाठी जागतिक आघाडी उघडण्यात आली. असे असले तरी इसिसचे अफगाणिस्तान, लिबिया, सिनाई व...
  February 8, 09:29 AM
 • स्टॉकहोम - स्वीडनच्या शाही परिवाराचे मुकूट आणि तलवारींसह इतर दागिने नुकतेच एका डस्टबिनमध्ये सापडले आहेत. सहा महिन्यांपूर्वी हे सर्व साहित्य चोरीला गेले होते. डस्टबिनमध्ये एका बॉक्समध्ये हे दागिने ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, त्यावर बॉम्ब असे लिहिले होते. स्थानिकांनी बॉम्ब समजून वेळीच पोलिसांना फोन लावला आणि घटनास्थळी बॉम्बशोध पथकासह दाखल झालेल्या पोलिसांनी सत्य समोर आणले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही साहित्ये आणि दागिने किंग कार्ल्स-IX च्या काळातील आहेत. फ्यूनरल...
  February 8, 12:01 AM
 • न्यूयॉर्क - युनायटेड एअरलाइन्सची अटेंडंट सबरिना स्वॅनसनने काही दिवसापूर्वी विमानाच्या विंगवर हवेत चालून दाखवले आणि कसरती केल्या. ही माहिती तिने युनायटेड एअरलाइन्सच्या वेबसाइटवर लिहिलेल्या ब्लॉगवर दिली आहे. फ्रँकफर्टच्या सबरिनाने सांगितले, आपल्या ५० व्या वाढदिवसानिमित्त चालण्याची कसरत केली. अाठ वर्षांपूर्वी लंडनमध्ये एअरक्राफ्टच्या बाहेर विंगवर काही वेळासाठी उभी होती. आता बोइंग स्टिअरमॅन बी प्लॅनच्या टॉपवर उभी राहिले होते. सबरिना म्हणते, हवाई कसरती करण्याचे प्रशिक्षण...
  February 7, 10:22 AM
 • बीजिंग | जगातील दुसऱ्या सर्वात माेठ्या चिनी नूतन चांद्रवर्ष सणाला प्रारंभ झाला अाहे. हा उत्सव १४ दिवस चालेल. यास (लुनर) स्प्रिंग फेस्टिव्हल नावाने अाेळखले जाते. चीनसह जगातील सुमारे ४० देशांतील जवळपास ३ अब्ज लोक हा सण साजरा करत अाहेत. या देशांत जगातील सुमारे ३० % लाेक राहतात. त्यापैकी १४० काेटी म्हणजे १९ % लोक चीनचे अाहेत. लुनर फेस्टिव्हलमध्ये १ अब्जहून जास्त नागरिक एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. त्यातील बहुतांश जण त्यांच्या होम टाऊनमध्ये जाणारे अाहेत. जगात एकाच वेळी इतक्या...
  February 7, 09:24 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - क्वालालंपूरच्या एका बाजारात पर्यटनासाठी आलेल्या कपलचे कृत्य पाहून सर्वांना धक्का बसला. टूरिस्ट प्लेसवर या कपलने अचानक एका तान्ह्या बाळाला त्याच्या पंजांपासून पकडले आणि जोर-जोरात हवेत फेकण्यास सुरुवात केली. 90 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी एकानंतर एक कधी पाय धरून तर कधी हात धरून त्या बाळाला अतिशय अमानुष पद्धतीने झटकले. याच शनिवारी हा व्हिडिओ Zayl Chia Abdulla नावाच्या व्यक्तीने आपल्या फेसबूक अकाउंटवरून शेअर केला आहे. सोशल मीडियावर सुद्धा त्यांच्या कृत्यावर संताप उमटला....
  February 7, 12:06 AM
 • न्यूयॉर्क - अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलीना प्रांतात एक अजब घटना समोर आली आहे. ग्रीन्सबोरो शहरात एक तरुणी आपल्या अपार्टमेंटमध्ये घडणाऱ्या विचित्र घटनांमध्ये भयभीत होती. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे आपल्या घरात नक्कीच भूत असल्याचे तिला वाटत होते. काही दिवसांतच तिला आपल्या कपाटातून कपडे गायब होत असल्याचे दिसून आले. एक दिवस तर तिला आपल्या बाथरुममध्ये अनोळखी व्यक्तीच्या हातांचे ठसे सापडले. दिवसेंदिवस या घटना वाढत गेल्या आणि तिने वैतागून अखेर या कथित भूताशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला....
  February 7, 12:02 AM
 • वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सुप्रीम लीडर किम जोंग उन 27-28 फेब्रुवारी रोजी व्हिएतनाममध्ये भेटणार आहेत. 8 महिन्यांत किम आणि ट्रम्प यांची ही दुसरी भेट आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या स्टेट ऑफ द युनियन भाषणात यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. यापूर्वी जगातील सर्वात कट्टर शत्रू राष्ट्रांचे नेते 12 जून 2018 रोजी को सिंगापूरमध्ये एकमेकांना भेटले होते. दोन्ही नेत्यांमध्ये 90 मिनिटे चर्चा झाली, परंतु, काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे,...
  February 6, 11:35 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात