जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Other Country

Other Country News

 • कैरो | इजिप्तची राजधानी कैरोच्या दक्षिणेस पुरातत्त्व शास्त्रज्ञांना टॉलेमिक युगातील (३०५-३० इसपूर्व) ५० ममी सापडल्या. एका वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, पुरातत्त्व विभागाच्या मंत्रालयाने म्हटले, यात एक ममी १२ वर्षांच्या मुलाची आहे. त्यांना तुना एल गेबलमध्ये ९ मीटर खोल चार चेंबर्समध्ये दफन करण्यात आले होेते. काही ममींना कपड्यात लपेटले आहे. इतरांना दगडाचे ताबूत व लाकडी बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते.
  February 5, 10:35 AM
 • रोम - इटलीतील आल्प्स पर्वतावर थंडीच्या दिवसांत लोकांना राहणे कठीण होते. अशा थंडीतही एक बँड आपले उत्कृष्ट सादरीकरण करतो आहे. शनिवारी येथे आइस म्युझिक फेस्टिव्हल पार पडला. यात कलावंतांनी ८५०० फूट उंचीवर उणे १२ डिग्री तापमानात आपले उत्कृष्ट सादरीकरण पार पाडले. कलावंतांनी व्हायोलिन, ड्रमसेट, झायलोफोन व मेंडाेलिन यासारखी बर्फाची वाद्ये तयार केली होती. बँडचे सादरीकरण एका इग्लूमध्ये (लहान घरे) करण्यात आले. बँडचे सदस्य व अमेरिकेत राहणारे टिम लिनहार्ट यांनी सांगितले, उंचीवर दाब कमी असतो. यामुळे...
  February 5, 10:31 AM
 • न्यूयॉर्क - ५६ वर्षीय किम हॅरिस डॅनिकोलासोबत तीन महिन्यापूर्वी जे घडले ते फक्त चित्रपटात पाहण्यास मिळते. परंतु तिच्याबाबतीत हा प्रसंग सत्यात उतरला आहे. चर्च पार्कमध्ये गेलेल्या किम अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या. त्या शुद्धीवर आल्या तेव्हा १७ वर्षे वयाच्या मुलीसारखे वागू लागल्या. त्यांना मुलांचे व पतीचे नावही आठवत नव्हते. हे १९८० वर्ष आहे. त्यांचे वय १७ आहे व त्या सीनियर सेकंडरीच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांच्या शाळेचा शेवटचा दिवस होता. शाळेची बस पकडण्याची घाई होती आणि अचानक बेशुद्ध...
  February 5, 10:17 AM
 • अॅम्सटर्डम - गेल्या ९ वर्षंापासून नेदरलँडमध्ये राहत असलेल्या अार्मेनियन लोकांना देशाबाहेर काढण्यापासून रोखण्यासाठी बीथल चर्चमध्ये सलग २३२७ तास प्रार्थना करण्यात आली. जनतेच्या रेट्यापुढे सरकारने शरणागती पत्करली. निर्वासितांच्या सर्व अर्जांवर पुनर्विचार करण्याची घोषणा सरकारने केली. अार्मेनियातील ५ सदस्य असलेल्या कुटुंबास २५ ऑक्टोबर रोजी देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु या परिवारास देश सोडून जाण्याची इच्छा नव्हती. २६ ऑक्टोबर रोजी हेग येथील बीथल चर्चमध्ये त्यांना...
  February 4, 11:03 AM
 • बालाबाक - फिलिपाइन्सच्या पलवन येथील बालाबाक शहरात एका पित्याने मुलास वाचवण्यासाठी मगरीशी लढा दिला. मगरीने मुलास सोडावे म्हणून तिचे पाय पित्याने दाताने तोडले. मुलावर दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. १२ वर्षांचा दिएगो अबुलहसन लहान भावासोबत नदीत अंघोळीस गेला होता. तेव्हा त्याच्यावर मगरीने हल्ला केला. मगरीने दिएगोला ओढून पाण्यात नेले. दिएगो व त्याचा भाऊ मदतीसाठी ओरडत होते. त्याचे वडील तेजदा अबुलहसन यांनी लाकडी दांडक्याने मगरीवर...
  February 4, 10:56 AM
 • मनीला - फिलिपाइन्सचे उबे बेट. येथे दररोज सुमारे ४ तास भरती येते. यामुळे घरात गुडघाभर पाणी साचते. या बेटावर वर्षातील १३० दिवस अशीच परिस्थिती असते. तरीही लोक येथून जाण्यास तयार नाहीत. बेटावर २०० लोकवस्ती आहे. येथे खूप शांतता आहे. येथे राहिल्याने तणाव वाटत नाही. याबद्दल मारिया सावेद्रा म्हणाल्या, पाणी घरात शिरलेले असले तरी आरामात राहतो. बेटावर ताजे मासे मिळतात. ते विकून आम्ही गरजेच्या वस्तू आणतो. येथे आरामदायी जीवन व्यतीत करतो आहोत. यासारखे उत्तम ठिकाण दुसरे कोणते नाही. २०१३ मध्ये आलेल्या ७.१...
  February 4, 10:37 AM
 • पॅरिस - फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये वयाेवृद्ध नागरिक स्वत:च्या देखभालीसाठी त्यांचे नातेवाईक किंवा केअरटेकर-नर्सवर अवलंबून नसतात. कारण तेथे एका प्रकल्पांतर्गत वृद्धाश्रमांत व रुग्णालयांत ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एअाय) नेटवर्कपासून बनवलेले जोरा रोबोट ठेवण्यात अाले अाहेत. हे रोबोट सकाळी उठण्यापासून ते झाेेपण्यापर्यंतच्या सर्व शारीरिक क्रियांत वृद्धांना मदत करत अाहेत. ते ज्यांना ही सेवा देत अाहेत, त्यांना जौरे म्हटले जाते....
  February 4, 10:30 AM
 • न्यूयॉर्क - भविष्यात शेतकऱ्यांना दरमहा ५०० रुपयांपेक्षा जास्त मदत दिली जाऊ शकते, असे संकेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. मोदी सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात लहान शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये (५०० रु. महिना) देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेत उपचार घेत असलेले जेटली म्हणाले, भविष्यात सरकारच्या स्रोतांत वाढ झाल्यास रक्कम वाढवली जाऊ शकते. राज्य सरकारे आपल्याकडून अतिरिक्त रक्कम देऊ शकतात. जवळपास १५ कोटी भूमिहीन शेतकरी या योजनेच्या बाहेर राहतील. त्या संदर्भात जेटली म्हणाले,...
  February 4, 10:16 AM
 • सिडनी । ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमध्ये जलमय झालेल्या बिसेंटिनल पार्क परिसराचे दृश्य. दुष्काळानंतर ईशान्य ऑस्ट्रेलियात पुरामुळे लोकांचे संकट वाढले आहे. पुरामुळे हजारो लोकांना घर सोडणे भाग पडत आहे. येत्या काही दिवसांत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या शतकातील हा सर्वांत मोठा पूर असल्याचे सांगण्यात येते. ऑस्ट्रेलियातील या भागात मान्सूनमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र, नुकताच झालेला पाऊस सरासरीपेक्षा जास्त आहे. २० हजार घरे जलमय होण्याचा धोका ईशान्य...
  February 4, 10:05 AM
 • न्यूयॉर्क - केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान किसान योजनेत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदत निधीत वाढ होण्याचे संकेत दिले. शेतकऱ्यांना दरमहा मिळणाऱ्या 500 रुपयांच्या निधीमध्ये भविष्यात वाढ होऊ शकते असे ते म्हणाले. अरुण जेटली सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. भारतात त्यांच्या अनुपस्थितीमुळे काळजीवाहू अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यावर वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना जेटली बोलत होते. पंतप्रधान शेतकरी योजनेचा हा पहिलाच वर्ष आहे. येणाऱ्याकाळात...
  February 3, 06:04 PM
 • मुंबई - मुंबईतील सत्र न्यायालयाने पाकिस्तानी लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला आहे. 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. त्याच प्रकरणात पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक आणि लश्कर ए-तोयबाचा अतिरेकी डेव्हिड कोलमन हेडलीला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. त्याने अमेरिकेतील न्यायालयात पाकिस्तानी संरक्षण दलातील मेजर अब्दुल रहमान पाशा आणि मेजर इकबाल यांची नावे घेतली आहे. त्यांनी मुंबई हल्ल्याचा कट रचला होता असे त्याने सांगितले. त्यानंतरच मुंबई...
  February 3, 04:08 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - ब्राझीलच्या मिनास गेरैस शहरात 25 जानेवारी रोजी धरणफुटी झाली. या भयंकर अपघातात मृतांच्या आकडेवारीने शंभरी पार केली आहे. या परिसरातील शेकडो नागरिक अजुनही बेपत्ता असून रोज नवीन मृतदेह सापडत आहेत. ही घटना नेमकी कशी घडली याचा प्रत्यक्ष व्हिडिओ आता समोर आला आहे. व्हिडिओ पाहून तो क्षण किती भयंकर असेल याचा अंदाज लावता येईल. एका क्षणाला अख्खी जमीन फाटल्याचे भासत होते. एका झटक्यात चिखलाची सुनामी आली आणि आपल्यासोबत सर्व काही जमीनीत पुरले. पुढील स्लाइडवर पाहा, धरणफुटीचा व्हिडिओ...
  February 3, 02:21 PM
 • लंडन - ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वीतीय आणि त्यांच्या शाही कुटुंबाला इतर ठिकाणी हलवण्याची तयारी केली जात आहे. येत्या महिन्यात ब्रिटनच्या युरोपियन संघातून एक्झिट अर्थात ब्रेक्झिटचा अंतिम निर्णय समोर येणार आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या जनमत चाचणीत नागरिकांनी ब्रिटनला बाहेर पडण्यासाठी होकार दिला होता. परंतु, राजकीय डावपेचांमुळे त्याला मूर्त स्वरूप मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. अशात देशात मोठ्या प्रमाणात हिंसक निदर्शने आणि दंगली घडू शकतात. त्यामुळेच, ही व्यवस्था केली जात आहे असा...
  February 3, 12:12 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेत थंडीने आतापर्यंतचे सर्वच विक्रम मोडले आहेत. देशातील सरासरी तापमान -29 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. तर काही ठिकाणी तापमान -70 अंश सेल्सिअस असल्याची देखील नोंद झाली. या थंडीत लोकांचे घराबाहेर पडणे कठिण झाले. बाहेर असताना शरीराचा एक इंचही भाग उघडा असेल तर फ्रॉस्ट बाइट अर्थात शीतदंश बसण्याचा धोका आहे. परंतु, इतक्या जहरी थंडीतही लोकांनी एन्जॉय करण्याचा आप-आपला मार्ग निवडला आहे. यात सर्वाधिक व्हिडिओ गरम पाणी पाण्यात फेकण्याचे पोस्ट केले जात आहेत. गरम पाणी पाण्यात फेकताच...
  February 3, 11:21 AM
 • सिडनी- इलेक्ट्रिक कारचे फायदे सांगण्यास घराबाहेर पडलेले नेदरलँडचे वीब वेकर हे नुकतेच ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत. यासाठी त्यांनी गत ३ वर्षांत ८९ हजार किमी प्रवास केला व त्यात युरोप, मध्य-पूर्व व दक्षिण-पूर्व आशियातील ३३ देशांना भेटी दिल्या. ही कोणतीही साहसी मोहीम नाही, तर ऑस्ट्रेलियाच्या लोकांना इलेक्ट्रिक वाहनाचे फायदे सांगणे, हा या प्रवासाचा उद्देश आहे. जीवाश्म इंधनासाठी अशी वाहने एक चांगला पर्याय असल्याचे वीब यांचे मत आहे. ऑस्ट्रेलियात बहुतांश लोक इलेक्ट्रिक कारला महाग व...
  February 3, 10:47 AM
 • वॉशिंग्टन- अमेरिकेच्या दोन डिझायनर्सनी एका खासगी जेटला १२ वर्षे झटून कारमध्ये रूपांतरित केले. नाइट क्लबमध्ये तयार केलेल्या जेटला लेझर लेजर्टो लिमो असे नाव दिले आहे. डॅन हॅरिस व फ्रँक डीएंगलो यांनी याची किंमत ५ मिलियन डॉलर (३५ कोटी रुपये) ठेवली आहे. हॅरिस म्हणाले, अमेरिकेतील मिनिसोटाच्या एका हँगरमध्ये १२ वर्षे यावर काम केले. यात ८ लोक बसू शकतात. ४२ फूट लांबीच्या एका जेटमध्ये नाइट क्लबचीही सुविधा आहे.
  February 3, 10:42 AM
 • वॉश्गिंटन- अमेरिकेच्या पेमब्रोक पाइन्स शहरात एका रस्त्यावर खड्डा होता. लोकांना तो सिंक होल वाटला. पण तपासात तो १५० फूट लांबीचा सुरुंग निघाला. अमेरिकी तपास संस्था एफबीआयच्या मते, चोरट्यांनी हे भुयार बँकेच्या तळापर्यंत खोदलेले होते. या खड्ड्याची एका मोटारसायलस्वाराने तक्रार दिली होती. पोलिस याचा तपास करत आहेत. हा खड्डा भरण्यासाठी आलेल्या पथकाला संशय आला. त्यांनी पोलिस व एफबीआयला बोलावले. सुमारे २ ते ३ फूट रुंदीच्या या खड्ड्यात उतरल्यानंतर समजले की, हा खड्डा भुसभुशीत नव्हे, तर...
  February 3, 10:39 AM
 • ब्रसेल्स- बेल्जियममध्ये गुरुवारी पर्यावरण सुरक्षा मजबूत करण्यासाठी देशभरातील तब्बल ३५ हजार विद्यार्थ्यांची हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजीही सुरू होती. पर्यावरण संरक्षणासंदर्भात घोषणा फलकावर लिहिलेल्या होत्या. आकाश निळे राहावे असे वाटते की त्यातून रक्त टपकणारे दिसावे? असा प्रश्न त्यावर लिहिलेला होता. एका विद्यार्थ्याने लिहिले, अन्य बी विश्व नाही, आपल्याला येथेच राहायचे आहे. पोलिसांनी सांगितले, देशभरातील ३५ हजार विद्यार्थ्यांनी पर्यावरणासाठी निदर्शने केली. यात राजधानी...
  February 3, 10:38 AM
 • वॉशिंग्टन- तीन दशकांपूर्वीचा अण्वस्त्र प्रसारबंदी कराराला रशियाने शनिवारी मोडीत काढले. करार (आयएनएफ) रद्द करणारा रशिया हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश आहे. त्यामुळे जगभरात शस्त्र स्पर्धा वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी शनिवारी याबाबतची घोषणा केली. पुतीन म्हणाले, आमचा भागीदार अमेरिकेने आयएनएफ रद्द करत असल्याची भूमिका घेतली आहे. आता आम्हीही त्यातून बाहेर पडत आहोत. परराष्ट्र मंत्री सेर्जेई लावरोव्ह व संरक्षण मंत्री सर्जेई शोइगू यांच्याशी केलेल्या...
  February 3, 09:54 AM
 • बँकॉक- थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये प्रदूषणाचा कहर झाला असून त्यामुळे आणीबाणी निर्माण झाली आहे. एक आठवड्यापासून विषारी धूर पसरला आहे. शहरातील ४०० हून जास्त शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मास्क परिधान करूनच घराबाहेर पडण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले. प्रदूषणापासून सुटका करून घेण्यासाठी आतापर्यंत करण्यात आलेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. धूर व धुके घालवण्यासाठी विमान व ड्रोनद्वारे पाण्याचा शिडकावा करण्यात आला....
  February 3, 09:44 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात