जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Other Country

Other Country News

 • वॉशिंग्टन- अमेरिकेत गेल्या २१ दिवसांपासून सुरू असलेल्या शटडाऊनचा तिढा सुटलेला नाही. इतिहासातील विक्रमाची या काम बंदीने बरोबरी केली आहे. याअगोदर १९९५ मध्ये १६ डिसेंबर ते ६ जानेवारी १९९६ दरम्यान २१ दिवसांपर्यंत सरकारी काम ठप्प केले होते. २२ डिसेंबर रोजी यंदा अमेरिकेत सरकारी काम व्यापक प्रमाणात ठप्प झाले. मेक्सिको सीमेवरील भिंतीचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. त्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर हे शटडाऊन सुरू झाले होते. सीमेवर भिंत...
  January 12, 10:22 AM
 • सिंगापूर- सिंगापूरमध्ये राहणारी ४५ वर्षीय जेमी चआ पेशाने एक हवाई सुंदरी आहे. मात्र, ती परीसारखे जीवन जगते आहे. एका प्रवासदरम्यान तिची भेट घटस्फोटित पती नुर्डियन कुआसाशी झाली होती. नुर्डियन एक अब्जाधीश उद्योजक आहेत. जमी स्किन केअर आंत्रप्रेन्योर असून दोन मुलांची आई आहे. यासोबत ती सोशल मीडिया स्टारही आहे. आपल्या अनोख्या बॅग कलेक्शनमुळे तिला इन्स्टाग्रामची राणी म्हणून ओळखले जाते. सर्वात आकर्षक वस्तूमध्ये क्रॉकोडाइल स्किन डायमंड बॅग असून तिची किंमत ५ लाख डॉलर्सपेक्षाही जास्त आहे....
  January 12, 10:06 AM
 • टोकियो- जपानमध्ये येणाऱ्या प्रत्येक विदेशी पर्यटकाला ९ डॉलर (६३० रुपये) आंतरराष्ट्रीय पर्यटन कर भरावा लागणार आहे. हा कर दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक पर्यटकाला भरावा लागणार आहे. यामुळे जपानला ३२ हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. या रकमेचा वापर पर्यटन इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी करण्यात येणार आहे. हा कर व्यवसायासाठी जपानमध्ये आलेल्यांवरही लागू हाेणार आहे. या कराची रक्कम विमान भाड्यातच वसूल केली जाणार आहे. जपान अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पर्यटनाला आर्थिक...
  January 12, 09:42 AM
 • वॉशिंग्टन - अमेरिकेतील रहिवासी 21 वर्षीय तरुणी एंड्रियाचे लव्ह लेटर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एंड्रियाने हे पत्र विमानात लिहिले होते, जे तब्बल 50 हजार वेळा शेअर करण्यात आले आहे. लोकांना या लव्ह स्टोरीची रायटर एंड्रियाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. रेडिटवर केले पोस्ट एंड्रियाच्या सिकनेस बॅग (उलटीसाठी वापरले जाणारे) वर लिहिण्यात आलेले लव्ह लेटर विमानाच्या एका सफाई कर्मचाऱ्याला मिळाले होते. या महिलेने सांगितले की, मागच्या वर्षी मी जेव्हा एकदा विमानाची सफाई करत होते, तेव्हा...
  January 11, 11:35 AM
 • काठमांडू - नेपाळमध्ये एक महिला आणि तिच्या दोन मुलांचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाला. विवाहितेला पीरियड्स सुरू असल्याने झोपडीत झोपण्यासाठी मजबूर व्हावे लागले होते. तिच्यासेाबत तिची दोन मुलेही होती. झोपडी गरम ठेवण्यासाठी शेकोटी सुरू होती, परंतु धुरामुळे श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. नेपाळमध्ये पीरियड्स सुरू असताना महिलेला अस्पृश्य मानले जाते आणि तिला या काळात कुटुंबापासून वेगळे राहावे लागते. झोपडीत झोपायला केले मजबूर - काठमांडू पोस्टच्या रिपोर्टनुसार, ही घटना नेपाळच्या...
  January 11, 11:00 AM
 • वाॅशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प हे मेक्सिकाे सीमेवर भिंत उभारण्याच्या पार्श्वभूमीवर देशातील शटडाऊनची स्थिती संपवण्यासाठी बाेलावलेली बैठक मध्येच साेडून निघून गेले. या बैठकीत मेक्सिकाे सीमेवरील भिंतीसाठी निधी मंजूर न झाल्याने नाराज हाेत ट्रम्प यांनी ही बैठक अर्ध्यातच साेडली. याबाबतची माहिती स्वत: ट्रम्प यांनी टि्वट करून दिली आहे. ही बैठक डेमाेक्रॅटिकच्या नेत्या नॅन्सी पेलाेसी व चक शूमर यांच्यासाेबत आयाेजित करण्यात आली हाेती. मात्र, ही बैठक म्हणजे वेळ वाया...
  January 11, 09:36 AM
 • मॉस्को- रशियाच्या राजधानीत एका भुयारी वाहतूक मार्गावर पूर आल्याची घटना घडली आहे. सध्या देशात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्यातच जमीन खचल्याने महामार्गावर पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे काही वेळ वाहनांचा खोळंबा झाला होता. रशियात गुरुवारी उणे सात अंश तापमान होते. सतर्कतेमुळे अपघात टळले भूगर्भातील पाण्याचा साठा अचानक बोगद्यात आला तेव्हा अनेक वाहन चालकांना काय चालले आहे, हे समजलेच नाही. मात्र सतर्कता बाळगत वाहनचालकांनी गाड्या चालवल्या. त्यामुळे अपघात टळले. सतत धावणारा हा भुयारी...
  January 11, 09:26 AM
 • वॉशिंग्टन- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस (५५) यांनी पत्नी मॅकेंझीला (४८) बुधवारी घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरू शकतो. संपत्तीची विभागणी झाल्यास मॅकेंझी जगातील सर्वात श्रीमंत महिला बनू शकतात, तर जेफ बेजोस सर्वात श्रीमंत व्यक्तीचे किताब गमावू शकतात. वॉशिंग्टनमधील कायद्याचा विचार करता लग्नानंतर मिळवलेल्या संपत्तीची वाटणी घटस्फोटानंतर पती-पत्नीत सम प्रमाणात होते. ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार, जेफ बेजोस यांची एकूण...
  January 11, 07:19 AM
 • क्वालालंपूर - अनेकांना घरात पाल दिसल्यासही भीती वाटते. कित्येक लोक बाथरुममध्ये कॉकरोच पाहून ओरडत बाहेर निघतात. परंतु, एखाद्या घरात चक्क मगर घुसली असेल तर? मलेशियात राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीसोबत असेच काही घडले. मलेशियातील केलांटन प्रांतात राहणाऱ्या नादियाच्या घरात एक मगर घुसली. सुरुवातीला पाहिल्यास मगरीने काहीच हालचाल केली नाही. तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला नाही. यानंतर नादियाने जे काही केले ते पाहून अख्खे हैराण आहे. तिनेच सोशल मीडियावर व्यक्त केलेला किस्सा आणि त्यावेळी...
  January 11, 12:01 AM
 • न्यूयॉर्क - केवळ जगातील नव्हे, तर इतिहासातील सर्वाथ धनाढ्य व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असलेले अॅमेझॉन डॉटकॉमचे जेफ बेझोस घटस्फोट घेत आहेत. लग्नाच्या 25 वर्षांनंतर त्यांनी आपल्या पत्नीला घटस्फोट देत असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघे एकत्रित राहत नव्हते. संयुक्तरित्या जारी केलेल्या पत्रकात दोघांनी म्हटले, की आम्ही लोकांना आमच्या आयुष्यातील घटनाक्रमाबद्दल सांगू इच्छित आहोत. परिवार आणि मित्र मंडळींना यासंदर्भात आधीच माहिती होती. गेल्या काही दिवसांपासून...
  January 10, 01:00 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानच्या पेशावर येथे लाइव्ह डान्स परफॉर्मन्स सुरू असताना खून करण्यात आला आहे. या ठिकाणी एक ट्रान्सजेंडर नाचताना तिला गोळ्या झाडण्यात आल्या. परफॉर्मन्सचा व्हिडिओ शूट केला जात असताना ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात टिपली आहे. लाइव्ह मर्डरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रान्सजेंडरचे नाव दानिश असे सांगितले जात आहे. दानिशने काही दिवसांपूर्वीच खैबर पोलिसांना एक तक्रार दिली होती. तसेच आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगताना संरक्षण देखील मागितले होते....
  January 10, 12:25 PM
 • लंडन- कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या झोपेच्या समस्येने जगभरातील कंपन्या त्रासल्या आहेत. त्यामुळे पूर्ण झोप घेणाऱ्यांना काही कंपन्या प्रोत्साहन देत आहेत, तर काही कार्यालयातच झोपण्याची व्यवस्था करत आहेत. अमेरिकेतील धोरणात्मक थिंक टँक समजली जाणारी रँड कॉर्पोरेशनने कमी झोपेमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीच्या आकलनासाठी ५ देशांमध्ये सर्वेक्षण केले. त्यात अमेरिका दरवर्षी सर्वाधिक २९ लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसत आहे. हे तेथील जीडीपीच्या २.२८% आहे. जपानमधील नुकसान जीडीपीच्या सुमारे ३% आहे. लोक...
  January 10, 11:58 AM
 • वॉशिंग्टन- अमेरिकेतील नेब्रास्का येथे राहणाऱ्या स्कॉट मॉर यांना एक महिन्यापूर्वी स्ट्रोक आला होता. यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. अनेक दिवस त्यांच्या मेंदूकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने डाॅक्टरांनी त्यांचा ब्रेन डेड घोषित केला. त्यानंतर त्यांची लाइफ सपोर्ट सिस्टिम बंद केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्कॉट शुद्धीवर आले. डॉक्टरांनी स्कॉट शुद्धीवर येणार नसल्याचे घोषित केल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी आशा सोडली होती. स्कॉटची मुलगी प्रेस्टन म्हणाली, माझे वडील आता...
  January 10, 11:35 AM
 • बर्लिन- संपूर्ण युराेपात तुफान बर्फवृष्टी हाेत असून, अल्पाइन भागाला बर्फाच्या वादळाचाही फटका बसला आहे. त्यामुळे युराेपातील सुमारे ३० देशांवर माेठा परिणाम झाला आहे. यात सर्वात वाईट स्थिती जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, नाॅर्वे, स्वीडन, ग्रीस, नेदरलँड आदी देशांत निर्माण झाली असून, अनेक माेठ्या शहरांत ४ ते ८ फुटांपर्यंत बर्फ साचला आहे. साेबतच ५० किमी वेगाने वारे वाहत असल्याने एक हजारपेक्षा जास्त विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय रेल्वे व रस्ते वाहतूक सेवाही ठप्प झाली आहे. रस्त्यांवर...
  January 10, 11:27 AM
 • न्यूयॉर्क - अमेरिकेतील सर्वात कुख्यात खूनींपैकी एक स्कॉट डोझिअरने (48) तुरुंगातच आत्महत्या केली. विशेष म्हणजे, त्याला मृत्यूदंड अटळ होता. तरीही दुसऱ्यांच्या हातून जीव देण्याऐवजी त्याने आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला. प्रत्यक्षात त्याला आपल्याच कृत्यांबद्दल स्वतःची किळस आली होती. जेलमध्ये राहून मृत्यूदंड मिळण्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा मी आपले आयुष्य खुद्द संपवेन असे तो लिहून गेला. ब्रिटिश दैनिक द मिररने त्याच्या मरण्यापूर्वी घेतलेली मुलाखत, त्याची शेवटची इच्छा यासंदर्भात वृत्त...
  January 10, 11:14 AM
 • पॅरिस - फ्रान्सच्या राजधानी गतवर्षीच उघडलेले देशातील पहिले न्यूड रेस्तरॉ आता बंद पडले आहे. या ठिकाणी येणाऱ्या कुठल्याही ग्राहकाला कपडे (अंतर्वस्त्र सुद्धा) घालण्याची परवानगी नव्हती. कपडे घातलेल्यांना यात प्रवेश दिला जात नव्हता. सोबतच, फक्त फोन किंवा ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांनाच येथे जागा दिली जात होती. परंतु, कालांतराने या ठिकाणी ग्राहकांची संख्या कमी झाली. गेल्या काही महिन्यांपासून या रेस्तरॉमध्ये कुणीच येत नव्हते. अखेर रिकाम्या खुर्च्या पाहून मालकाने आपले दुकान बंद करण्याचा निर्णय...
  January 10, 12:03 AM
 • मेलबर्न - ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात असलेल्या भारतासह इतर देशांच्या दूतावास परिसरात बुधवारी संशयास्पद पार्सल सापडले आहेत. यासंदर्भातील माहिती मिळताच अग्निशन, रुग्णावाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेलबर्नमध्ये असलेल्या 10 आंतरराष्ट्रीय दूतावास परिसरात हे संशयास्पद पार्सल आले होते. त्यांचा पत्ता लागला नसल्याने वेळीच पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन दलाला सतर्क करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पोलिसांनी जारी...
  January 9, 11:27 AM
 • लंडन- ब्रिटिश आर्मीने भरतीसाठी जाहिरात दिली आहे. सेल्फीचे शौकीन, व्हिडिओ गेम खेळणारे, साध्या गोष्टीवरून चिडणाऱ्या तरुणांसाठी या जागा असल्याचे म्हटले आहे. यासाठी लष्कराने पहिल्या महायुद्धातील पोस्टरवरून प्रेरणा घेऊन २०१९ चे पोस्टरसुद्धा काढण्यात आले आहेत. यावर मोठमोठ्या अक्षरांत तरुणांना रोजच्या सवयीचा उल्लेख आहे. लष्कराला कोणत्या खुबी हव्या आहेत, याचीही माहिती दिली आहे. उदा. सेल्फी काढणाऱ्यांसाठी वर स्पष्ट लिहिले आहे, सेल्फी अॅडिक्ट्स, त्यानंतर तुमच्या आत्मविश्वासाची गरज, तसेच...
  January 9, 10:53 AM
 • सिडनी- अमेरिकेत स्कीन केअर प्रॉडक्ट कंपनीच्या सीईओने जॅकलिन अॅडेस (३१) या तरुण महिलेस नापसंती कळवली. त्याचा राग येऊन त्या महिलेने सीईओला १ लाख ५९ हजार संदेश पाठवून त्याला धमक्या दिला. पोलिसांनी सांगितले, फ्लोरिडामध्ये राहणारी ही महिला ब्यूटिशियन आहे. डेटिंग अॅपद्वारे त्याची व तिची ओळख झालेली होती. यावेळी सीईओने तिला नकार दिला. त्यानंतर महिलेने त्याला संदेश पाठवणे सुरु केले. तिने कंपनीत जाऊनही गोंधळही घातला. आपण सीईओच्या पत्नी आहोत, असेही ती म्हणत होती. पोलिसांनी सांगितले, या महिलेस...
  January 9, 10:51 AM
 • हाँगकाँग- व्हिएतनामला जाणाऱ्या तेलवाहू जहाजाने मंगळवारी अचानक पेट घेतला. अग्निज्वाळांचा भडका वाढल्याने प्रचंड स्फोट झाला. त्यात मालवाहू जहाजावरील एकाचा मृत्यू झाला तर तिघे बेपत्ता असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही घटना हाँगकाँगच्या दक्षिणेकडील लाम्मा बेटाच्या सागरी क्षेत्रात घडली. हाँगकाँग सरकारने तातडीने अग्निशमन दलाचे पथक सागरी क्षेत्रात रवाना केले. इंधन भरण्यासाठी हे जहाज विश्रांती घेत असताना जहाजावर हा आगडोंब उसळला. बचाव मोहीम सुरू असून खलाशांची नेमकी संख्या समजली...
  January 9, 10:38 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात