जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Other Country

Other Country News

 • वॉशिंग्टन -राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी २०२० च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. पहिली सभा फ्लोरिडात घेतली. सभेला २० हजारांवर लोकांची उपस्थिती होती. ट्रम्प यांनी भाषणाची सुरुवात राष्ट्रवादाने केली. ते म्हणाले, अमेरिकेला पुन्हा महान बनवू. डेमोक्रॅट्स देशाची अर्थव्यवस्था नष्ट करून टाकतील. खरे तर अमेरिकेची बळकट अर्थव्यवस्था पाहून जगाचा जळफळाट होतोय. मी दुसऱ्यांदा अध्यक्ष बनलो तर देशातून एड्स आणि इतर आजारांचे उच्चाटन करून टाकेन, असे आश्वासन...
  June 20, 11:14 AM
 • मालावी- अफ्रिकेतील सर्वात मोठ्या नियासा जंगलामध्ये काही वर्षांपासून हत्तीची मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्यामुळे प्रशासनाने जंगलाची सुरक्षा वाढवली आहे. त्यामुळे मागील एक वर्षांपासून येथील एकाही हत्तीची शिकार झालेली नाही. मोजांबिकच्या उत्तर भागात असणारे हे जंगल क्षेत्रफळाच्या दृष्टीने स्वित्झरलंडपेक्षाही मोठे आहे. प्रशासनाला आलेले हे यश खूप महत्वाचे आहे, कारण, 2010-12 दरम्यान अफ्रिकेमध्ये एक लाखांपेक्षा अधिक हत्ती शिकाऱ्याद्वारे ठार करण्यात आले होते. हे शिकारी मुख्यतः दातांसाठी...
  June 19, 04:36 PM
 • गंगटोक- उत्तर सिक्कीममध्ये सोमवारी ढगफुटीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांना पुराचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. अनेक ठिकाणांना पाण्याचा तडाखा बसला आहे. भूस्खलनामुळे रस्ते वाहून गेले आहेत. वाहतूक ठप्प झाली आहे. ढगफुटीनंतर तिस्ता नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे खालच्या प्रदेशांत पाणीच पाणी आहे. डिक्चूमध्ये एनएचपीसीचे एक विश्रामगृह नदीच्या पाण्यात वाहून गेले आहे. उत्तर सिक्कीममध्ये तिंगवाँग व साक्योंग पेंटाँग गावाला जोडणारा एक झुलता सेतू उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे...
  June 19, 10:39 AM
 • वाॅशिंग्टन- अमेरिका पुढील आठवड्यापासून लाखाे अवैध निर्वासितांना देशाबाहेर काढायला सुरुवात करेल, असे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी साेमवारी सांगितले. ट्रम्प यांनी स्थलांतरित रहिवासी व सीमा शुल्क विभागाचा उल्लेख करत टि्वटरवर म्हटले की, येत्या आठवड्यात अमेरिकेत अवैध पद्धतीने घुसलेल्या लाखाे अवैध विदेशींना आयसीई बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. ते जेवढ्या घाईत घुसले हाेते तेवढ्याच तत्परतेने त्यांना बाहेर काढले जाईल. त्यांनी यासाेबत सांगितले की,...
  June 19, 10:37 AM
 • जपान - चीनमध्ये दुहेरी भूकंपाच्या दुसऱ्याच दिवशी जपान धरणीकंपाने हादरले. जपानमध्ये मंगळवारी 6.4 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. यानंतर वेळीच प्रशासनाकडून सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आला होता. परंतु, काही वेळातच हा इशारा परत घेण्यात आला आहे. या भूकंपाने विविध शहरांमध्ये 16 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, चीनमध्ये सोमवारीच दुहेरी भूकंप झाला. यामध्ये 11 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी जपानला भूकंपाचा हादरा बसला आहे. भूस्खलनाची शक्यता,...
  June 19, 10:28 AM
 • लंडन -ब्रिटनमध्ये आता महिलांना काम करताना आणि पुरुषांना आराप करताना दाखवण्यास किंवा महिला कार पार्क करू शकत नसल्याचे दाखवणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे. तज्ञांच्या मते, महिला आणि पुरुष समानतेच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. ब्रिटनच्या अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स अॅथॉरिटीनुसार (एएसए) नवे नियम लागू झाल्यावर महिलांना व्यवस्थित ड्रायव्हिंग करता येत नाही असे दाखवणाऱ्या किंवा महिलांना साफसफाई करताना आणि पुरुषांना सोफ्यावर आराम करत असताना दाखवणाऱ्या जाहिराती कमी होतील. अशा...
  June 18, 11:45 AM
 • कॅरो - इजिप्तचे बडतर्फ माजी राष्ट्राध्यक्ष मोहंमद मोर्सी यांचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला. कोर्टात सुनावणी सुरू असतानाच ते अचानक कोसळले. अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच शवविच्छेदनात त्यांच्या शरीरावर कुठल्याही स्वरुपाच्या मारहाणीचे किंवा कापल्याचे निशाण नाहीत. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता असे सांगितले जात आहे. 67 वर्षीय मोहंमद मोर्सी यांना हेरगिरीच्या आरोपांनंतर 2013 मध्ये पदावरून बडतर्फ करण्यात आले होते. तेव्हापासूनच ते तुरुंगात...
  June 18, 11:08 AM
 • खार्तूम(सुडान)- येथे सध्या एका मोहिमेने सोशल मीडियावर चांगलाच जोर धरला आहे. या मोहिनेचे नाव ब्लू फॉर सुडान असे आहे. सोशल मीडिया युझर्स लोकशाही आणि देशाच्या हितासाठी ब्लू फॉर सुडान असे हॅशटॅग लिहून निळ्या रंगाचा फोटो शेअर करत आहेत. तसेच, ट्विटरवर युझर्सने आपला प्रोफाइलसुद्धा निळा फोटो ठेवला आहे. ही मोहीम मोहम्मद मत्तार यांच्या समर्थनात सुरू आहे. मत्तार हे 3 जून रोजी दोन महिलांना वाचवताना सुरक्षा रक्षकांकडून मारले गेले होते. Those who are taking part in spreading #BlueForSudan. The color blue came from a warm hearted, martyrs known as, Mohammed Hashim Mattar, my cousin who has passed...
  June 17, 04:18 PM
 • वॉशिंग्टन - अमेरिकेत भारतीय वंशाच्या एकाच कुटुंबातील 4 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. वेस्ट डेस लोवा प्रांतातील वेस्ट डेस मोइनेस शहरात राहणाऱ्या कुटुंबावर अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार, शनिवारी हल्ला करण्यात आला. सीएनएनच्या वृत्तानुसार, या गोळीबारात मृत्यूमुखी पावलेल्या कुटुंबियांमध्ये 44 वर्षीय चंद्रशेखर शंकरा, 41 वर्षीय लावण्या आणि 15 व 10 वर्षांच्या दोन मुलांचा समावेश आहे. या हत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. यासंदर्भात सविस्तर तपास सुरू आहेत. अमेरिकेतील मीडिया...
  June 17, 11:07 AM
 • झा अंकारा-दुष्काळ, जमिनीची धूप इत्यादी अनेक कारणांमुळे जगभरात दरवर्षी २४ अब्ज टन सुपीक मातीचा ऱ्हास हाेत असल्याचा धक्कादायक दावा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटाेनियाे गुटेरस यांनी केला आहे. दुष्काळ तसेच इतर अनेक गाेष्टींमुळे माेठ्या समस्या निर्माण हाेत आहेत. त्याचा फटका माेठ्या लाेकसंख्येला बसत आहे. सुपीकता जाऊन त्याचे रुपांतर काेरडवाहू जमिनीत हाेताना दिसू लागले आहे. भारतात ही समस्या भयंकर बनली आहे. त्यावर उपाययाेजना करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने काही याेजना हाती घेतली आहे....
  June 17, 10:35 AM
 • सेऊल -जगातील सर्वात धोकादायक सीमा पहिल्यांदाच पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. दक्षिण कोरिया व उत्तर कोरियादरम्यान ही सीमा असून जगातील सर्वात धोकादायक सीमा म्हणून आेळखली जाते. आता दक्षिण कोरिया सरकारने पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सीमेवरील लष्करेतर क्षेत्रातील तीन भाग सामान्य नागरिकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी गँगवोन प्रांतातील चेरोवनमध्ये दुसरा भाग येतो. हा भाग देश-परदेशातील पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. आधीच या सरहद्दीवर पर्यटक मोठ्या संख्येने...
  June 16, 10:53 AM
 • लागाेस-दीर्घकाळ अफेअर असले तरी फसवणूक करणाऱ्या एखाद्या पतीस पत्नीला घटस्फाेट मागण्याचा काहीही अधिकार नाही. केवळ पीडित पक्षच कायद्याच्या आधारे वेगळे हाेण्यासाठी अर्ज करू शकताे, असे सेऊल येथील दिवाणी न्यायालयाने स्पष्ट केले. प्रसिद्ध दिग्दर्शक हाँग साँग सू की यांनी दाखल केलेल्या घटस्फाेटाच्या याचिकेवर त्यांनी हा निर्णय दिला. ही याचिका स्वीकारल्यास महिला कमकुवत हाेतील, असा तर्क न्यायालयाने दिला. ५८ वर्षीय हाँगने २०१६ मध्ये घटस्फाेटासाठी अर्ज दिला हाेता. तेव्हा त्यांच्या चित्रपटात...
  June 16, 10:46 AM
 • वॉशिंग्टन - अमेरिकेच्या एरिजोना येथील वाळवंटात उष्णघातामुळे 6 वर्षीय भारतीय मुलीचा मृत्यू झाला. अमेरिका बॉर्डर पेट्रोलच्या मेडिकल परीक्षकाने सांगितले की, घटनेवेळी मुलीची आई तिला इतर शरणार्थिंकडे सोपवून पाणी घेण्यासाठी गेली होती. एरिजोनाच्या ल्यूकविलच्या पश्चिम भागात अमेरिकी बॉर्डर पेट्रोलने बुधवारी मुलीला शोधून काढले. गुरप्रीत कौर असे मुलीचे नाव आहे. ती लवकरच आपला 7 वा वाढदिवस साजरा करणार होती. शरणार्थी मेक्सिकोमार्गे अमेरिकेत प्रवेश करतात रिपोर्ट्सनुार गुरप्रीत आणि तिची आई...
  June 15, 02:54 PM
 • कराकास-व्हेनेझुएलात महागाई खूप वाढली आहे. खाण्यापिण्याच्या वस्तूपासून दैनंदिन जीवनात वापरात येणारे सामानही लाखो रुपयांत विकत मिळते आहे. त्यामुळे लोकांना पिशव्या भरून नोटा न्याव्या लागत आहेत, अशी परिस्थिती आहे. देशातील महागाईची बिकट अवस्था पाहून सरकारने १०, २० व ५० हजारांच्या नोटा छापण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत येथील सर्वात लहान नोट ५०० बॉलीव्हर्स होती. व्हेनेझुएलाच्या केंद्रीय बँकेने नव्या नोटांबाबत घोषणा करताना म्हटले, येथील लोकांकडे खाण्यापिण्यासाठी पैसे नाहीत आणि...
  June 15, 11:22 AM
 • बिश्केक-शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीआे) बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व किर्गिस्तानचे राष्ट्रपती सुरोनबे जीनबेकोव्ह यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. बैठक अला अर्चा प्रेसिडेन्शियल पॅलेसमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उभय नेत्यांत आरोग्यासह ६ क्षेत्रात सामंजस्य करार झाले. सुरुवातीला मोदींनी बैठकीच्या प्रारंभी शानदार आतिथ्य, स्वागत समारंभाबद्दल राष्ट्रपती सुरोबने यांचे आभार व्यक्त केले. मोदी म्हणाले, आमचे उद्दिष्ट आरोग्य सहकार्य बळकट करणे आहे. त्यासाठी मोदींनी...
  June 15, 09:07 AM
 • बिश्केक -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्या उपस्थितीतच पाकला घेरले. पाकचा थेट उल्लेख न करता मोदी म्हणाले, दहशतवादाला प्रोत्साहन, आर्थिक मदत करणाऱ्या देशांना जबाबदार धरले पाहिजे. दहशतवादाचे कायम उच्चाटन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आवाहन भारत करत आहे. दहशतवादापासून संपूर्ण जगाला मुक्त करण्यासाठी जगभरातील मानवतावादी शक्तींना आता एकत्र यावेच लागेल. अनिच्छेने केले हस्तांदोलन : परिषदेच्या पहिल्या दिवशी...
  June 15, 08:58 AM
 • बिश्केक(किर्गिस्तान)- शंघाई सहयोग परिषद(एससीओ) च्या उद्धाटन समारंभ गुरुवारी पार पडले. यावेळी नरेंद्र मोदी, शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिनसहित अनेक देशांचे नेते उपस्थित होते. एका क्रमाने त्यांनी समिट हॉलमध्ये प्रवेश केला. एक-एक नेते आत प्रवेश करत होते, तेव्हा इतर नेते उभे राहून त्यांना योग्य तो सन्मान देत होते. पण यावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी उलटेच कृत्य केले. जेव्हा इतर नेते आत येत होते, तेव्हा पाकिस्नाचे पंतप्रधान खालीच बसून राहिले. इम्रान यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर...
  June 14, 07:07 PM
 • मेलबर्न- सचिन तेंडुलकरने खेळाचे साहित्य बनवणारी ऑस्ट्रेलियातील कंपनी स्पार्टनविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. सचिनने आरोप लावला आहे की, कंपनीने त्यांच्या वस्तुंच्या विक्रीसाठी सचिनचे नाव आणि फोटोंचा वापर केला. सचिनने यासाठी स्पार्टनकडून 20 लाख डॉलर(14 कोटी रूपये) च्या रॉयल्टीची मागणी केली आहे. सचिन आणि स्पार्टनमध्ये करार झाला होता- रिपोर्ट्स न्यूज एजंसी रॉयटर्सने कागदपत्रांच्या माध्यमातून दावा केला आहे की, 2016 मध्ये सचिन आणि स्पार्टन कंपनीमध्ये एक करार झाला होता. याअंतर्गत एक...
  June 14, 05:23 PM
 • फैक्ट चेक डेस्क - फेसबुकवर एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये दोन कार दिसत आहेत. या फोटोसोबत लिहिले आहे की, सौदी अरेबियातील वाढत्या तापमानामुळे कार वितळत आहेत. आम्ही याची पुष्टी केली असता वेगळेच सत्य समोर आले. काय झाले व्हायरल? एका फोटोत दोन कार दिसत आहेत. यात कारचा पाठीमागचा भाग वितळला आहे. यामध्ये लिहिले आहे की, सौदी अरेबियाचे तापमान 50 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. फेसबुकवर अनेक युझर्संनी या फोटोला शेअर केले आहे. यामुळे हा फोटो आहे फेक आम्ही केलेल्यापडताळणीतही माहिती चुकीची...
  June 14, 04:43 PM
 • बिश्केक(किर्गिस्तान)- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी शंघाई सहयोग परिषद (एससीओ)मध्ये भाषण केले. या दरम्यान त्यांनी दहशदवादाविरूद्ध एकत्रीत येणावर भर दिला. मोदी म्हणाले की, दहशदवादाला पाठिंबा देणाऱ्यांनाही जबाबदार ठरवले पाहिजे. यासाठी भारत एक आंतरराष्ट्रीय परिषद बोलवणार. मोदींनी गुरुवारी द्विपक्षीय बैठकीत चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेत दहशदवादाच्या मुद्द्यावर चर्चा केली. एससीओमध्ये नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानच पंतप्रधान इम्रान खान यांच्यात कोणतीच भेट झाली नाही....
  June 14, 03:39 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात