जाहिरात
जाहिरात
Home >> International >> Other Country

Other Country News

 • इंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर रोज अतिशय विचित्र प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातच एका व्यक्तीने हातावर ड्रिल मशीन वापरल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यात दिसणारी एक व्यक्ती आधी असह्य वेदनांनी ओरडत होती. त्याच्या हातात एक स्क्रू घुसले होते. आधीच त्या वेदना आणि स्क्रू काढताना त्याच्या थ्रेडपासून हाताच्या आतील त्वचेला आणखी त्रास होणार हे निश्चित होते. परंतु, त्या व्यक्तीने दुसऱ्या हातात ड्रिल मशीन घेतली आणि ज्या हातावर स्क्रू घुसले होते त्यावर मशीन लावूनउलटे फिरवून बाहेर काढले....
  January 28, 12:03 AM
 • व्हिएना - युरोपियन राष्ट्र ऑस्ट्रियात एका व्यक्ती आपल्या घरामध्ये खोदकाम केले. त्याच दरम्यान त्याच्या हाती एक अंगठी लागली. अंगठी सापडताच त्या व्यक्तीला जमीनीत आणखी काही असणार असा संशय झाला. थोडेसे खोदकाम केल्याने अंगठी सापडली आता नक्कीच आपल्याला खजिना सापडणार अशी त्याला अपेक्षा होती. त्याच अपेक्षेने त्याने आणखी खोदकाम केले. परंतु, यानंतर जे समोर येत गेले ते पाहून तो प्रचंड घाबरला. त्याने वेळीच पोलिसांना घटनास्थळी बोलावले आणि यासंदर्भातील माहिती जगासमोर आली. ही घटना काही...
  January 28, 12:01 AM
 • वॉशिंग्टन - अमेरिकेतील एका कंपनीने जगातील पहिले स्पेस हॉटेल विकसित केले आहे. अंतराळात बनलेल्या या हॉटेलात जाऊन परतण्यासाठी 12 दिवस लागतील. सोबतच, तेथे एकावेळी फक्त 6 व्यक्तींच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 2021 मध्ये हे हॉटेल अंतराळात स्थापित केले जाणार आहे. सोबतच, 2022 पासून ते पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज होईल. या आलीशान हॉटेलात राहून परतण्याचे सौभाग्य फक्त बोटांवर मोजता येण्याइतक्या लोकांना मिळणार आहे. कारण, या स्पेस ट्रिपसाठी जाण्यास इच्छुक असलेल्यांना प्रत्येकी 67 कोटी...
  January 27, 03:01 PM
 • मनिला - फिलिपाइन्सच्या जोलो प्रांतात रोमन कॅथोलिक चर्चला लक्ष्य करून दहशतवादी हल्ला करण्यात आला. संडे मास (रविवारची प्रार्थना) करण्यासाठी या चर्चमध्ये लोक जमले होते. त्याचवेळी बॉम्बस्फोट घडला. यात किमान 19 जणांचा मृत्यू झाला असून इतर 50 जण जखमी आहेत. एकाचवेळी दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. घटनास्थळी बचाव मोहिम सुरू असून यासंदर्भात सविस्तर तपास केला जात आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला बॉम्बस्फोट जोलो येथील चर्चमध्ये झाला. पोलिस आणि सुरक्षा रक्षक आत धावून गेले आणि...
  January 27, 11:53 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक महिला ड्रायव्हर सीटवर बसलेली दिसत आहे. अचानक कार थांबते आणि समोरच्या व्यक्तीला राग येतो. तो रागाच्या भरात कारच्या काचेवर जोरात बुक्का मारतो. त्यामुळे काचेला तडे जातात. हा व्हिडिओ कॅलिफोर्नियाचा असल्याचे सांगितले जात आहे.
  January 26, 02:59 PM
 • काबूल- तालिबान व अमेरिकी अधिकाऱ्यांतील वाटाघाटी गुरुवारी सलग चौथ्या दिवशी सुरू असल्याची माहिती तालिबान्यांकडून देण्यात आली. अफगाणिस्तानातील १७ वर्षांचा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न केले जात आहेत. तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्लाह मुजाहिद यांनी दोन्ही बाजूंकडून चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. कराराला अंतिम रूप मिळाल्यानंतर आम्ही यासंदर्भात सविस्तर बोलू, असे झबिहुल्लाह म्हणाला. अमेरिकी तुकड्यांच्या परतीबाबत दोन्ही बाजू विविध मुद्द्यांवर चर्चा...
  January 25, 09:37 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - हा धक्कादायक व्हिडिओ रशियातील एका शहरात टिपल्याचे सांगितले आहे. यामध्ये एक ट्रक बर्फाळ परिसरातील रेल्वे रुळावर थांबलेला दिसून येतो. या ट्रकचा टायर रुळांमध्ये अडकला होता. त्यामुळे, पुढे जाणे शक्यच होत नव्हते. त्याचवेळी एक भरधाव मालगाडी आली आणि एका झटक्यात ट्रकचा अर्धा भाग हवेत उडाला. अवघ्या काही सेकंदांत ट्रकचे तुकडे रस्त्यावर पसरले. त्याच ठिकाणी कारमध्ये थांबलेल्या एका कुटुंबाने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. तोच आता सर्वत्र व्हायरल होत आहे. कुटुंबियांनी...
  January 25, 12:04 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - अवघ्या एक वर्षे आणि सात महिन्यांच्या एका चिमुकल्याने जे केले ते ऐकूण आपणही त्याला दाद द्याल. अलोंड्रा टॉरस एरिस असे या मुलाचे नाव असून तो मेक्सिकोच्या मॉन्टेरी रुग्णालयात त्याला न्युमोनियावर उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, काही तासांतच त्याची प्रकृती बिघडली आणि डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले. त्याचा जीव वाचवणे अशक्य होते. अशात त्याच्या आई वडिलांनी मुलाच्या दोन्ही किडनी आणि लीव्हर दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे तीन चिमुकल्या...
  January 25, 12:01 AM
 • वॉशिंगटन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वार्षिक स्टेट ऑफ द युनियन भाषण देण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत शटडाऊन हटवला जात नाही तोपर्यंत संबोधित करणार नाही असा पावित्रा ट्रम्प यांनी घेतला. तर दुसरीकडे, काँग्रेसच्या (संसद) सभापती नॅन्सी पेलोसी यांनी राष्ट्राध्यक्षांना स्टेट ऑफ द युनियन संबोधनासाठी पाठवलेले औपचारिक निमंत्रण रद्द केले आहे. सरकारी सेवा सुरळीत करण्यासह केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वेतन पुन्हा सुरू करण्यात यावा असे सभापतींनी सांगितले आहे. अमेरिकेचे...
  January 24, 02:35 PM
 • मॉस्को- रशियातील सर्वात वयोवृद्ध महिला नानू साओवाचे काकेशसच्या डोंगराळ भागात नुकतेच निधन झाले. तिचे वय १२८ वर्षे इतके होते. रशियात उपलब्ध असलेल्या सरकारी आकडेवारीनुसार नानू साओवा सर्वात वृद्ध महिला होती. तिचे वय खरे मानले तर तिचा जन्म रशियाचे शेवटचा झार निकोलस द्वितीय गादीवर बसण्यापूर्वी झाला होता. दोन वर्षापूर्वी तिचे नाव रशिया बुक ऑफ रेकॉर्डस््मध्ये देशातील सर्वाधिक वयस्क महिला अशी नोंद झाली होती. रशियातील बोल्शेविकच्या क्रांतीच्या वेळी नानू २७ वर्षाची होती तर १९९० -९१ मध्ये...
  January 24, 10:37 AM
 • वॉशिंग्टन- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या सिनेटर कमला हॅरिस यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या केवळ २४ तासांत त्यांच्या पक्षाला निवडणुकीसाठी सुमारे १० कोटी रूपये (१५ लाख डॉलर) निधी उभारण्यात यश मिळाले. भारतवंशीय उमेदवाराने अल्पावधीत एवढा निधी उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेत निवडणुकीचे आतापासून वारे वाहू लागले असून ५४ वर्षीय हॅरिस यांनी २०२० मध्ये विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी त्यांनी...
  January 24, 08:06 AM
 • इस्तंबूल- इस्लामिक देश तुर्कीतील सर्वात मोठे शहर इस्तंबूलची महापालिका शहरातील महिलांना खाण्या-पिण्यासह वागण्या-बोलण्याची पद्धत शिकवण्यासाठी नियम बनवल्यामुळे वादात सापडली आहे. सभ्य महिलांनी आइस्क्रीम चाटून खाऊ नये. तसेच संपूर्ण तोंड उघडून इतरांशी बोलू नये. असे करणे योग्य दिसत नाही. यामुळे आपल्या देशाची परंपरा व संस्कृतीवर चुकीचा प्रभाव पडत असून, देशात येणाऱ्या पर्यटकांत देशाचे नाव खराब होते. असे होऊ नये म्हणून महापालिका महिलांना हे करण्याच्या पद्धती शिकवेल, असे या नियमांत म्हटले...
  January 24, 08:05 AM
 • रोम - भारतात घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सामान्य किंवा मध्यमवर्गीय लोकांसाठी घर एक स्वप्नच राहिले आहे. अशात एक युरोपियन देश इटलीतील शहर फक्त 82 रुपयांत घरे विकत आहे. इटलीच्या अगदी समुद्रकिनारी असलेल्या घरांची मार्केट व्हॅल्यू अब्जांमध्ये असेल. परंतु, निसर्गरम्य ठिकाणी असलेली ही घरे प्रशासन अगदी विनामूल्य विकत आहे. या शहराचे नाव सॅमबुका असून प्रशासनाने ही ऑफर ठेवण्याचे एक खास कारण आहे. सॅमबुका इटलीचे एक छोटेसे किनारपट्टीलगतचे शहर आहे. एकेकाळी हे शहर लोकांनी गजबजलेले होते....
  January 24, 12:06 AM
 • अबुजा- नायजेरियात गेल्या दहा वर्षांपासून बेरोजगारीत वाढ होते आहे. त्यामुळे तरुणांनी बेरोजगारी संपुष्टात आणण्यासाठी व प्लॅस्टिकचा योग्य वापर व्हावा म्हणून एक उत्कृष्ट योजना आखली अाहे. यात त्यांनी प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यात माती व खडे भरून घरे व पाण्याची टाकी बांधण्याचा नवा उद्योग सुरू केला आहे. अशा बाटल्यांपासून तयार केलेली घरे ७.३ रिश्टर स्केलच्या भूकंपातही पडणार नाहीत, असा तज्ज्ञांचा दावा आहे. एक प्लास्टिकची बाटली नष्ट होण्यास ४५० वर्षे लागतात. तसेच बाटल्यांपासून...
  January 23, 05:38 PM
 • वॉशिंगटन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हट्टामुळे देशातील सर्वात मोठी तपास संस्था एफबीआय अपंग बनली आहे. शटडाऊनला एक महिना उवटला तरीही ट्रम्प आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मेक्सिकोच्या सीमेवर साडे पाच अब्ज अमेरिकन डॉलरची भिंत उभारली जात नाही, तोपर्यंत शटडाऊन सुरूच राहील असे त्यांनी स्पष्ट केले. अशात शटडाऊनमुळे अमेरिकेतील 8 लाख केंद्रीय कर्मचारी (FBI सह) बिनपगारी काम करत आहेत. त्यांना दैनंदिन कामे करणे आणि मोहिमांवर जाणे सुद्धा कठिण बनले आहे. देशात होणाऱ्या दरोडा, अमली...
  January 23, 12:30 PM
 • मॉस्को- काळ्या समुद्रात दोन मालवाहू जहाजांना लागलेल्या आगीत किमान १४ जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण बेपत्ता आहेत. ही तेलवाहू जहाजे भारतीय, तुर्की खलाशांना घेऊन जात होती. ही घटना रशियाजवळील काळ्या समुद्रात घडली. रशियापासून काही अंतरावरील सागरी क्षेत्रात सोमवारी दोन जहाजांवर ही घटना घडली. पहिल्यांदा एका जहाजाला आग लागली. नंतर ती दुसऱ्या जहाजापर्यंत पोहाेचली. एका जहाजात नॅचरल गॅस, तर दुसऱ्या जहाजातून टँकर वाहून नेले जात होते. ही मालवाहू जहाजे मूळची टांझानियाच्या मालकीची आहेत. कँडी...
  January 23, 11:14 AM
 • वाॅशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रपतिपदाच्या कार्यकाळास दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, या दोन वर्षांच्या कार्यकाळात ट्रम्प यांनी ८,१५८ वेळा खोटी किंवा दिशाभूल करणारी वक्तव्ये केल्याचा दावा वाॅशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने केला आहे. संबंधित वृत्तपत्रानुसार ट्रम्प हे पहिल्या वर्षी रोज सरासरी ५.९ वेळा खोटे बोलले, तर दुसऱ्या वर्षी हा आकडा तिप्पट वाढून १६.५ झाला. वाॅशिंग्टन पोस्ट ने आपल्या दाव्याच्या पुष्टीकरिता फॅक्ट चेकर्सच्या डेटाचा हवाला दिला...
  January 23, 11:13 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - सीफस बन्साह (70) हे कदाचित जगातील एकमात्र असे राजे असतील जे कार मॅकेनिकही आहेत. दुहेरी भूमिका करणारा हा आहे घाना आणि टोगो या 20 लाख लोकसंख्या असलेल्या दोन देशांचा राजा. बन्साह स्काइपच्या माध्यमातून आपल्या जनतेवर राज्य करतात. त्यांना टोगोमध्ये सुपीरियर अँड स्पिरिच्युएल चीफ ऑफ इवे पीपल असे संबोधले जाते. त्यांचे पूर्ण नाव राजा टोगबे न्गोरयिफीआ सीफस बन्साह असे आहे. 2000 मध्ये बन्साह यांचा विवाह जर्मनीची ग्रॅबिएलशी झाला होता. त्यांना कार्ली आणि कथरीना असे दोन आपत्य आहेत....
  January 23, 12:02 AM
 • लंडन- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह काही राज्यांत ईव्हीएम हॅकिंग करून निवडणुका जिंकण्यात अाल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते गाेपीनाथ मुंडे यांना याबाबत कल्पना हाेती, म्हणूनच त्यांची हत्या करण्यात अाली, असा खळबळजनक दावा कथित भारतीय सायबर एक्स्पर्ट सय्यद शुजाने केला. दुसरीकडे, विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे यांनी सांगितले की, गोपीनाथ मुंडे यांचा अपघात की घात, हा संशय होता. नव्या खुलाशामुळे त्या संशयाला पुष्टी मिळते. हे प्रकरण एका मोठ्या नेत्याचा मृत्यू अाणि देशातील निवडणुकांशी...
  January 22, 04:52 PM
 • तायपेई - तैवानची बिकीनी क्लाइंबर म्हणून प्रसिद्ध असलेली गिगी वू हिचा डोंगर सर करण्याचा प्रयत्न करत असताना मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर बिकीनी घालून डोंगर सर करतानाचे फोटो अपलोड करून तिने जगभरात प्रसिद्धी मिळवली होती. अशाच एका मोहिमेसाठी ती बिकीनीवरच निघाली होती. परंतु, खराब हवामानामुळे थंडीने गारठल्याने तिचा मृत्यू झाला. तर काहींच्या मते, ती पडली होती आणि जखमी झाली होती. यानंतर तिचा मृत्यू झाला. इतक्या थंडीत फक्त बिकीनीवर डोंगर चढण्याचा प्रयत्न करत असताना तिला हायपोथर्मिया झाला....
  January 22, 12:58 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात